१९६० साली प्रदर्शित झालेल्या स्वयंवर झाले सितेचे या चित्रपटातील हे गीत. चित्रपटाचे दिग्दर्शक होते मधुकर पाठक. अहंमन्य रावण या गीतात लंकेच्या ऐश्वर्याचे आणि ताकदीचे वर्णन करतो. शास्त्रीय संगीताच्या अवकाशात तेजाने तळपणारा ‘स्वरभास्कर’ म्हणजे पंडित भीमसेन जोशी यांनी हे गीत गायले. कवी, गीतकार, पटकथालेखक, कादंबरीकार, गीतरामायणकार अशा विविध स्वरूपात ज्यांची ओळख मराठी साहित्य क्षेत्रात आहे, ते ग. दि. माडगूळकर होते या गीताचे गीतकार. तर संगीत दिग्दर्शन होते वसंत देसाई यांचे.
रम्य ही स्वर्गाहूनी लंका
हिच्या किर्तीचा सागर लहरी, नादविती डंका
सुवर्णकमला परी ही नगरी
फुलून दरवळे निळ्या सागरी
त्या कमलावर चंद्र निजकरे, करीतो अभिषेका
लक्ष्मी लंका दोघी भगिनी
उभय उपजल्या या जलधितूनी
या लंकेचे दासीपद तरी, कमला घेईल का ?
—
Leave a Reply