वाढलेले केस माझे पाहुनी
एका बाईस वाटले मी आहे टपोरी ….
लागतं असता तिचाच धक्का मला बसमध्ये
म्हणते मला उगा रहा उभा सरळी मनीच म्हणालो मी आहे
शेंग चवळीची सरळच तू का झालीस भोपळा फुलुनी …आला होता राग भयंकर पण !
बाजूला उभी होती सुंदर परी म्हणूनच सावरले मनी…
म्हणते मला उगा रहा उभा सरळी मनीच म्हणालो मी आहे
शेंग चवळीची सरळच तू का झालीस भोपळा फुलुनी …आला होता राग भयंकर पण !
बाजूला उभी होती सुंदर परी म्हणूनच सावरले मनी…
स्वत:शीच म्हटले घातले
आवर ह्या परीने माझ्या रागाला
नाहीतर झाले असते आज भांडण सकाळी सकाळी ….
आले असते लक्षात त्या सहज परीच्या
रागावल्यावर मी होतो जमदग्नी …
साधा भोळा शांत रहावे नजरेत मी तिच्या म्हणून घातले
आवर माझ्या रागाला सहजी…
आज झाली ती परी गुरु माझी माझ्या रागावर नियंत्रण
मिळविण्याची शिकवण देणारी …
त्यासाठी राहीन मी आयुष्यभर
अनोळख्या त्या परीचा ऋणी….
कवी – निलेश बामणे
— निलेश बामणे
Leave a Reply