नवीन लेखन...

राग दरबारी

सत्तेचा सारीपाट वेगवेगळे रंग दाखवतो. असेच काही रंग सरत्या आठवड्यात पहायला मिळाले. काहीशा अनपेक्षितपणे महाराष्ट्राच्या सत्तेतले कारभारी बदलले गेले. एव्हाना सारे काही शांत होत आहे. काहीजणांना मात्र घडल्या प्रकाराने भलतेच वाईट वाटले. अशी काही ज्येष्ठ नेतेमंडळी मंत्रालयाजवळ जमली आणि त्यांच्यात गिले-शिकवे काव्यात मांडण्याचा सिलसिला सुरू झाला. त्याची ही काल्पनिक हकिकत…मंत्रालयाजवळील

हॉटेल सम्राटजवळ नारायण राणे उभे होते. जवळच विलासराव देशमुखही उभे होते. विलासराव नारायणरावांकडे नाराजीने पाहात होते. ना तुला ना मला घाल तिसर्‍याला अशीच अवस्था केली ना? असे डोळ्यांच्या भाषेतून ते नारायणरावांना विचारत होते. नारायणराव वेगळ्याच चिंतेत होते. प्रभाताई देवाघरी गेल्यात. आता आपल्याला कोणता गॉडफादर राहिलेला नाही… दिल्ली दरबारी वजन टाकायचे तरी कोणाच्या जोरावर? विलासराव तर शायरी करायच्या मूडमध्ये होते. मन मोडले की बरेचजण शायरीच्या मूडमध्ये येतात, त्यातलाच हा एक भाग. विलासराव गात होते,आतुरलो मी मुख्यमंत्रिपदाला लातुरलो मी खुर्चीला…नव्हे मी आदर्श नव्हे मी लवासा मी तर सार्‍यांनाच नकोसानारायणराव विलासरावांच्या काव्यावर टाळ्या वाजवतात. सम्राट हॉटेलच्या पलीकडून छगनराव भुजबळ एन्ट्री करतात. ते वेगळ्याच तणावाखाली आहेत. नारायणराव छगनरावांजवळ जातात आणि त्यांना विचारतात, काय प्रॉब्लेम आहे? नॉलेज सिटीत काही कमी-जास्त झालंय का?नारोबा, आमचे उपमुख्यमंत्रिपद गेले की ! व्यथित अंत:करणाने भुजबळ उत्तरतात. नारोबा अशी हाक नारायणरावांना मारणारे फार लोक आलम दुनियेत शिल्लक नाहीत. तो अधिकार एके काळी फक्त बाळासाहेबांचा होता. परंतु शिवसेना सोडल्यावर नारायणरावांना कोणीही नारोबा म्हणून बोलावू लागले होते. त्यामुळे छगनरावांनी आपल्या

ा नारोबा म्हटल्याचे दु:ख त्यांना वाटले नाही. उलटपक्षी छगनरावांना आपल्याबाबत किती आपुलकी असल्याचेच त्यांना वाटत राहिले. छगनराव डोळे पुसत जवळ येतात आणि म्हणतात, विलासराव आपल्याला सार्‍यांनीच वाळीत टाकले हो. तुम्ही मराठा म्हणून आणि मी मराठेतर म्हणून! माझं दु:ख कोण समजणार? मी तर सिंधुदुर्ग

जिल्ह्यातला! मालवणी! कोकणी माणसांच्या वेदना कोणाला सांगायच्या? आमचो मच्छिंद्र केव्हाचोच गेलो की हो… नारायणराव शोक करू लागले. तसे विलासराव पुढे होत नारायणरावांच्या पाठीवर थोपटत त्यांना शांत करू लागतात. गेली ज्योत विझोनिया, मग फुंका फुंका तयाला किती, ओता आत घृता, रचोनि समीधा प्रार्था फुले वाहोनी…. विलासरावांची रसवंतीही आता भरभरून वाहू लागते. येथे वाङमयचौर्याचा आरोप करणारे कोणीच नाही. त्यामुळे स्वत:चे किंवा इतरांचे काहीही वापरा, बोलायला येतोय कोण? आपल्या हृदयातील मळमळ बाहेर पडली व ती इतरांना समजली म्हणजे झाले. हेतू इतकाच! छगनराव नाराजीने विलासरावांकडे पाहात होते. या नाराजीचे कारण न समजल्याने विलासरावही कुतूहलाने त्यांच्याकडे पाहू लागलेंघात केला माझा मराठ्यांनीखुर्चीच्या काही तुकड्यांनीमी कंप, मी भूकंप मी सारे काही आहेसारस्वतांनो, मी आग आहेमी एक ज्वालामुखी आहे परंतु सध्या विझलेला आहे…… अशी नारायण सुर्वे यांच्या साहित्याशी समरस होणारी कविता करून छगनराव विलासरावांपुढे शांतपणे उभे राहिले. त्यांनी कविता केलेली पाहून नारायणराव मान खाली घालून त्यांचा मोठेपणा मान्य करतात. कविता करतलो तो मोठा माणूस हो, तेका कशाक छेडायचे? असा विचार ते करतात. कविता करणारा माणूस लहान नसतो, तो मोठाच असतो, हा मुलभूत विचार मच्छिंद्र कांबळी यांनी आपल्या मनात पेरल्याबद्दल एकीकडे ते कृतज्ञही आहेत. त्यावर विलासराव त्यांना विचारतात, कोणाला श्रद्धांज
ी वाहताय हो? नारायणराव आणखीनच शरमिंदे होतात. छगनराव काय बोलणार? स्वत:लाच कोणी श्रद्धांजली वाहतं का? तितक्यात अशोकराव चव्हाण येतात. आता उर्वरीत तिघांमधील शोकाला खरी वाचा फुटते. अशोकरावांचा शोकमग्न चेहरा पाहूनच तिघांचे चेहरे पुन्हा पडतात. आता हॉटेल सम्राटजवळ शायरांची मैफल जमली आहे, असा लोकांचा तर समज होणार नाही ना, या शंकेने छगनराव अस्वस्थ होतात. त्यांची शंका खरी ठरते. अशोकराव शोकविव्हल होत म्हणतात,आदर्श मी, अनादर्श मीबळीचा बकरा मी, कसायाची गायही मीमी आदर्श आहेमी अनादर्शही आहेपृथ्वीचा राजाही मीच आहेअशोकरावांच्या या कवितेवर विलासराव, छगनराव, नारायणराव टाळ्या वाजवतात. आपण काही तरी जगावेगळे केल्याचा भास अशोकरावांना होतो. च्यायला, आपलेच पुतळे आपण उभे करायचे आणि त्यांची पुजाही आपणच करायची? अशोकरावांचा शोक इतरांच्या मनाला भिडणे अशक्यच हते. प्रत्येकाचे दुखणे वेगळेच होते. आपापले दुखणे कोणी किती वेळा व कशा शब्दात व्यक्त करायचे? परंतु पृथ्वी म्हणण्यापेक्षा महाराष्ट्राचा नवा राजा आता आला, असे म्हणण्याचे तिघांच्या ओठांवर आले होते परंतु तिघांनी ते बोलण्याचे टाळले. दिलजलोंका दिल जलाके क्या मिलेगा दिलरूबा… असा विचार तिघांनी केला. त्यामुळे अशोकराव सहीसलासमत राहिले. विलासराव अशोकरावांना पाहून काय बोलणार? विलासरावांना पाहून नारायणराव काय बोलणार? इतक्यात आर.आर. आबा येतात. तासगावकर आबांना पाहून विलासरावांच्या भावनांना ऊत येतो. ते काही बोलणार इतक्यात आबा म्हणतात,भाऊबंदकीने केले मला हैराणजाऊ कुठे मी, सारे जग वैराणकुठे कन्या, कुठे पुतण्याजागा कुठे इतरांसाठी? आम्ही जावे कुठे? आम्ही राहावे कुठे? आम्ही आपले तासगावकर…आबांच्या या बोलण्यावर चौघेजण मान डोलावतात. आपल्या चौघांवर अन्याय झाल्याचा देखावा क
रायची तयारी ते करतात. आबा सम्राट हॉटेलजवळून जायची तयारी करतात. जाता जाता भुजबळांकडे पाहून आबा म्हणतात, तुम्हा बहुजनांमुळे माझे उपमुख्यमंत्रिपद गेले. आता मला कोण वाली?विलासराव म्हणतात, मी कोणाकडे फिर्याद मांडायची? नारायणराव म्हणतात, बाळासाहेब विरोधात गेले, प्रभा रावही गेल्या. आता मी अभिमान बाळगायचा की स्वाभिमान? छगनराव म्हणतात, राजकीय भूकंप करायची ताकद जोपर्यंत माझ्यात आहे, तोपर्यंत मी कोणालाच भीक घालणार नाही. अशोकराव नाराजीने तोंड लपवतात. आपल्यात असा कुठलाही भूकंप करण्याची शक्ती नसल्याचे व केवळ आपण निष्ठावंत असल्याचे मान्य करतात. आश्चर्य म्हणजे विलासराव, छगनराव, नारायणरावही त्यांच्या हो मध्ये हो मिळवतात. आबांचे काही वेगळे सांगायचे का? छगनरावांची बातच वेगळी !

मराठ्यांमध्ये इतर मागासवर्गीयांची पिळवणूक होणारच ना? पण

फिर्याद मांडायची कोणाकडे?

(अद्वैत फीचर्स)

— अद्वैत फिचर्स टिम

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..