न्यूयॉर्कमधील भारतीय वकिलातीमध्ये कार्यरत असलेल्या वरिष्ठ राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना त्या आपल्या मुलींना शाळेत सोडण्यासाठी निघाल्या असताना रस्त्यावर अत्यंत अपमानास्पदरित्या अटक करण्यात आली. खोब्रागडे यांच्यावर व्हिसा गैरव्यवहार व मानवी तस्करीचा आरोप ठेवण्यात आला असून यामध्ये दोषी आढळल्यास त्यांना दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. या अटकेमुळे भारतामधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला असून हे प्रकरण इतर प्रकरणांसारखे केवळ निषेध व्यक्त करून नजरेआड करण्यात आलेले नाही. ही एक अत्यंत स्वागतार्ह बाब आहे.
खोब्रागडे यांना अटक करण्यात आल्याचे प्रकरण हे अनेक कंगोरे असलेले गुंतागुंतीचे प्रकरण आहे. खोब्रागडे यांनी घरकाम करण्यासाठी संगीता रिचर्ड या बाईस भारतीय पारपत्रावर अमेरिकेमध्ये आणले. मात्र, अमेरिकन कामगार कायद्यानुसार रिचर्ड यांना जो पगार दिला जाणे अपेक्षित होते; तो न दिला जाता कमी पगार दिला गेल्याचा मुख्य आरोप खोब्रागडे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी अमेरिकेने कायद्याप्रमाणेच सर्व कारवाई करण्यात आली असल्याचा दुटप्पी कांगावा केला आहे. अमेरिकन कायद्याप्रमाणे रिचर्ड हिला 4500 डॉलर्स पगार दिला जाणे अपेक्षित होते; व प्रत्यक्षात तिला अत्यंत कमी ( म्हणजे 500 डॉलर्स!) पगार दिला जात होता. या प्रकरणामधील गुंतागुंत येथे अधिक जटिल झाली आहे.
— श्री.युवराज सदाशिव पाटील उर्फ युवराज
Leave a Reply