नवीन लेखन...

राजीव गांधी, अफ़जल गूरू, ओमर अब्दुला आणि बॉम्बस्फोट

 ७ सप्टेंबर २०११ रोजी सकाळी १०.१४ वा. दिल्ली हायकोर्ट, गेट क्रं. ५ येथे भीषण बॉम्बस्फोट झाला. हा बाँम्ब एका ‘ब्रिफकेस’मध्ये ठेवण्यात आला होता. स्फोट इतका बलशाली होता की, स्फोटाच्या ठीकाणी चार फुटाहून मोठा खड्डा पडला आहे, या परिसरातील अनेक गाड्यांचेही तुकडे झाले आहे. बांगलादेशातील हरकत-उल-जिहादी “हुजी” (नावातंच जिहाद आहे)

या आतंकवादी संघटनेने स्फ़ोटाची जबाबदारी स्वीकारली आहे. ही जबाबदारी स्वीकारताना “हुजी”ने असे म्हटले आहे की महम्मद अफ़जल गूरू याला देहदंडाची शिक्षा झाली आहे, त्याचा विरोध म्हणून हा भयानक स्फोट घडवून आणला आहे. अफजलची फाशी रहित करावी, अन्यथा देशातील आणखी काही उच्च न्यायालयावर अशीच आक्रमणे करू, अशी धमकी “हुजी”ने भारताच्या मुस्कटात मारली आहे. काँग्रेसचे युवराज घायाळांना भेटण्यासाठी रुग्णालयात आले होते तेव्हा त्यांना जन-उद्रेकाला सामोरे जावं लागलं, त्यांच्या विरोधात भोषणाबाजी झाली. गांधी-नेहरु परिवाराला जन-उद्रेक काय असतो हे वेगळे सांगायला नको.इथे एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे की काही दिवसांपूर्वी राजीव गांधी यांच्या मारेकर्‍यांना क्षमा करण्यासाठी तामिळनाडू विधानसभेत ठरावाचे महानाट्य घडले. दुसरीकडे ओमर अब्दुल्ला यांनी अफ़जल गूरुला क्षमादान द्यावे असे म्हटले आहे. ओमर म्हणतात जर राजीव गांधींच्या मारेकर्‍यांना क्षमादान मिळू शकते तर अफ़जलला का नाही? ओमर अब्दुल्लांचं हे विधान देशद्रोही आहे. कारण राजीव गांधींचे मारेकरी आणि अफ़जल गूरू यांच्यात अंतर आहे. ते असे की राजीव गांधी यांची हत्या जन-उद्रेकामुळे झाली आहे. लिट्टेच्या बंडखोरांनी तामिळनाडूतील श्रीपेरांबदूर येथे आत्मघाती स्फोटाद्वारे राजीव यांची हत्या केली होती. पण त्य ा नंतर त्या बंडखोरांनी स्फोटांची मालीका सुरु ठेवली नाही. या वरुन हेच स्पष्ट होतं की हा निव्
ळ जन-उद्रेक होता. याउलट अफ़जल गूरुने संसदेवर प्राणघाती हल्ला केला. हा त्याचा उद्रेक नसून, ही त्याची आणि त्याच्या पंथबांधवाची प्रवृत्ती आहे. सबंध हिंदुस्थान नष्ट करणे आणि ईस्लामी राजवट स्थापन करणे हा त्यांचा मुळ हेतू आहे. म्हणून अफ़जल गूरु हा देशद्रोही ठरतो आणि त्याचा बचाव करणारेही. ओमर अब्दुल्ला यांनी अफ़जलसाठी क्षमायाचना मागीतली हा उघडउघड राष्ट्रद्रोह आहे. हुर्रियत कान्फ़्रेंस ने आधीच धमकी दिली होती कि जर अफ़ज़ल गूरूला (“गुरु” नाहीं, “गूरू” असे म्हणा. “गुरु” हा शब्द अतिशय पवित्र आहे. काश्मिरमध्ये दुध विकणार्‍या एका जमातीचं “गूरु” हे आडनाव आहे.) फाशी दीली तर काश्मीरमध्ये खूनखराबा होऊ शकतो. ७ सप्टेंबर २०११ रोजी झालेला बॉम्बस्फोट हा सुद्धा अफ़जल गूरुच्या शिक्षेसंदर्भातच होता. यात ओमर अब्दुल्ला यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग असू शकतो, अशी शंका व्यक्त करायला हरकत नाही. पण याबद्दल मिडीया आणि सेक्यूलर लोक काहीच बोलणार नाहीत, कारण ओमर हे पंथाने मुस्लीम आहेत. इथे जर एखादा हिंदु असता तर सर्वांनीच त्याला धारेवर धरले असते. ओमर अब्दुल्ला फ़ारुख अब्दुल्ला यांचा मुलगा आणि शेख अब्दुल्ला यांचा नातू आहे. हे दोघेही राष्ट्रद्रोही आहेत. ओमर यांचा राष्ट्रद्रोह आणुवंशिक आहे. ओमर यांनी मुंबईहून बी. कॉम केले होते, त्यावेळी ते सर्वांचे लाडके नेते, जाणता राजा? शरद पवार यांच्याकडे राहायला होते. २००६ मध्ये ते केंद्र सरकारचा विरोध असूनही “ना”पाकमध्ये जाऊन परवेझ मुशर्रफ़ला भेटून आले. याला काय म्हणावे? हा असला हलकट माणूस आपल्या भारतातल्या एका राज्याचा मुख्यमंत्री आहे, हे लज्यास्पद म्हणावे की हास्यास्पद?विरोधी पक्षांना हीच सुवर्ण संधी आहे काँग्रेसला कोंडीत पकडण् ाची. विरोधी पक्षांनी ओमर अब्दुल्ला यांच्या विरोधात ठोस पाऊले उचलायला हवीत. ओमरने केलेल्या राष्ट्रद
रोही कृत्याबद्दल त्यांचे मुख्यमंत्रीपद काढून घेण्यात यावे. त्यांना समन्स धाडण्यात यावा आणि काश्मिरमध्ये आणीबाणी घोषित करावी. ओमरच्या विरोधात खटला भरण्यात यावा. ७ सप्टेंबर रोजी झालेल्या स्फोटाला प्रत्यूत्तर म्हणून अफ़जल गूरूला आणि अजमल कसाबला तात्काळ फ़ाशी देण्यात यावी. राजीव गांधी यांच्या मारेकर्‍यांसोबतही तसेच करावे. कारण हेतू कुठलाही असो, हत्या ही हत्याच असते. पण असे होईल का? आपल्या भारतातले सगळे राष्ट्रपती इतके सुस्त आणि मठ्ठ आहेत की त्यांना एका फाइलवर सही करायला १०-११ वर्षे लागतात? आपल्या भारतातले गृह मंत्रालय इतके नालायक आहे की कोर्टाचे आदेश आल्यानंतरही एक फाइल पुढे न्यायला ५-६ वर्षे लागतात? स्वातंत्र्यानंतर जर गांधीवाद सोडून आपण सावरकरवाद स्वीकारला असता तर भारताची ही अशी दयनिय अवस्था झाली नसती.

— जयेश मेस्त्री

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..