नवीन लेखन...

राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो….



राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो…. राजे असा कंटाळा करून चालणार नाहीमाझ्याशिवाय तुमच्याशीखरे कुणीच बोलणार नाही’गाईड’होण्याची संधीहीमी कशाला हुकवतो?राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतोसुरूवात शिवनेरीपासून?की,रायगडापासून करायची?उलटी की सुलटी?कोणती मळवाट धरायची?असे कोड्यामध्ये पडू नका,कुणालाच उपदेश नको,”आपापसात लढू नका”तेव्हाही पटले नाही,आत्ताही पटणार नाही.मरतील पण सवयीपासूनमागे कुणी हटणार नाही.म्हातारीच्या मरणानेकाळ बघा कसा सोकावतो?राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो.. शिवबा घडवायचा असेल तरत्यासाठी जिजाऊ असली पाहिजेशहाजीच्या मनामध्येही आस ठसली पाहिजे.पण आजकाल हे सारेघडताना दिसत नाहीतुमचे चरित्र वाचायला गोड वाटतेपण पचनी पडताना दिसत नाही.पोकळ मराठी बाणा तरबघा स्वत:लच फ़सवतोराजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो… ते बघा नवे देशमुख,ते बघा नवे देशपांडे,वतनदारीसाठी टपलेले आहेतत्यांच्या आतली काळी माणसंखादीमध्ये लपलेले आहेत.पराक्रमाला तोड नाहीकर्तुत्वाला जोड नाहीमहाराष्ट्राच्या भल्याचीस्वार्थापुढे ओढ नाहीम्हणूनच तर सह्याद्रीआपला माथा झुकवतोराजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो… ज्यासाठी जान की ’बाजी’ लावावीतोच खिंडीमध्ये गाठतो आहेपिसाळांचा सूर्याजी तरइथे दर फ़ुटा-फ़ुटाला भेटतो आहे.”आधी लगीन कोंढाण्याचे”म्हणण्याचीआज तानाजीत हिंमत नाहीबापजाद्यांच्या पराक्रमांचीआज रायबाला किंमत नाही.इतिहास राहिला नाहीजो तो सोईप्रमाणेआज इतिहासाला वाकवतो.राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो… आपलेच आपल्याला लुटायलालागलेपरक्यांची आवश्यकता नाहीपरक्यांनीच लुटले पाहिजेहा
काही त्यांचाच मक्ता नाही.डोळे मिटलेल्या मांजरीचेसारे नखरे कळत आहेतमनातल्या मनात शायिस्तेखानाची बोटे अजून वळवळ्त आहेत.आपलाच गनिमी कावाबघा आपल्यालाच कसा चकवतो?राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो…

तो बघ प्रतापगड सांगतोय,इथेच पराक्रम घडला होता.अफ़जुल्याचा कोथळाबाहेर पायथ्याशी पडला होता.अजूनही अफ़जुल्यातो पराक्रम सांगतो आहे.आम्ही आमची अक्कलउगीच वेशीला टांगतो आहे.मेलेल्यांशी वैर धरूनकुणी अफ़वा इथे पिकवतोराजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो… तो बघा ज्याचा प्रदेश,तिथेच त्याचा किल्ला आहे.इष्टप्रधान मंडळाचाफ़ायदेशिर सल्ला आहे.ज्याचा त्याचा झेंडा आहेज्याची त्याची राजमुद्रा आहे.सुखी माणूस तोच,ज्याच्या अंगी खादीचा सदरा आहे.डोक्यावरून पाणी चाललेयजो तो आपल्यापुरते चुकवतोराजे, चला तुम्हाला

तुमचा महाराष्ट्र दाखवतो… शिवा काशिद,मुरारबाजी,नेताजी,हिरोजी आणि मदारीआता भेटाण्याची आशा नाही.जीवाला जीव

देण्याची,मावळ्यांना आता नशा नाही.खूप झाल्या सेना,खूप झाले सेनापती,सैनिका-सैनिकांची वाटणी आहे.वाईट वाटण्याचे कारण नाही,आजच्या राजकारणाचीहीच धाटणी आहे.निष्ठा दाखवायची खुमखुमी येतापटकन डिजिटल बॅनर डकवतोराजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो… पुरंदरच्या तहाची परंपराआजकाल जोरात पाळली जाते.परस्परांचा फ़ायदा असेल तरराजकीय लढाईही टाळली जाते.राजकीय मांडवली झाली की,पाच वर्षापुरते तरी भागते.राजे,छाव्याला जामीन ठेवायला,वाघाचे काळीज लागते.दुसर्याच्या जळत्या घरासामोरआज आम्ही आपले कपडे सुकवतो.राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो… राजे,यांना शहाणे समजू नका,हे तर चक्क बावळे आहेत.तुम्हाला केलेय देव त्यांनी,तुमची इथे देवळे आहेत.लाज वाटते म्हणून सांगतो,आम्ही पदरचे रेटत नाही.तुळजा भवानीने तलवार दिलीच कशी?आमच्या बंडखोर मनाला पटत नाही.खरा इतिहास राहिला बाजूला,ओळखा कोण ह्या कंड्या पिकवतो?राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र द
ाखवतो… शेतकर्यांची अवस्था अशी की, जसा वेढ्यामध्ये पन्हाळा आहे.बारा महिने तेरा त्रिकाळत्यांच्या आयुष्य़ात उन्हाळा आहे.राजे,चूकुनही बघू नकात्यांची अवस्था कशी आहे?विषासाठी पैसा नसेल तरघराच्या आढ्याला फ़ाशी आहे.व्याजाने व्याज वाढत जातेतरीही विचारतात,हप्ता का थकवतो ?राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो…

सरकार म्हणाले शिका,पोरं इथले शिकले आहेत.शिक्षणाची दुकाने तरवढ्या-वघळीला टाकले आहेत.सिंहगडाखालचा पराक्रम तरखरोखरच बघण्यासारखा होता.रेव्ह पार्टीच्या थोबाडावरउच्चभ्रुपणाचा बुरखा होता.येतील तसे दिवसआपला महाराष्ट्र धकवतो.राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो… जसे राजकारणाचे,तसे साहित्याचेही झाले आहे.सहकाराला स्वाहाकाराचेबकासुरी रूप आले आहे.आया-बहिणींच्या इज्ज्तीचीसमस्या तर जटील आहे.नाक्या-नाक्यावर उभाजणू रांझ्याचा पाटील आहे.लोकशाहीचा पाईक मी,तुमच्या राजेशाहीसमोरमाझा माथा टेकवतो.राजे, चलामी तुम्हालातु तुमचा महाराष्ट्र दाखवतो… -सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)मोबा. ९९ २३ ८४७ २६९

आणखी वाचण्यासाठी माझा ब्लॉग

— सूर्यकांत डोळसे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..