सांगितले गेले. पण आता यातूनच कितीतरी प्रश्न उभे राहिले आहेत. टाटांसारख्या सरळपणे धंदा करणार्या आणि व्यावसायिक नितिमत्ता जपणार्या उद्योगसमूहाला एका लॉबिंग करणार्या बाईची गरज का भासली? हि त्यांची व्यावसायिक गरज की अगतिकता? अगतिकता असेल तर या देशात सरळपणे धंदा करुच दिला जात नाही हा अर्थ निघतो. व्यावसायिक गरज असेल तर वार्षिक साठ कोटी रुपये मोजल्यावर नक्कीच त्यांना त्यापेक्षा जास्त लाभ झाला असणार नाहीतर दरवर्षी त्यांनी हा खर्च केलाच नसता. शिवाय वर उल्लेख केलेल्या दोन्ही समूहांना एकमेकांची गुपिते दुसर्याला कळतील ही भिती कशी वाटली नाही? का या बाईंपेक्षा दुसरी प्रभावशाली लॉबिस्ट या देशात नव्हती? आणि मग चहाच्या जाहिरातीत चायपानी देऊ नका हे टाटा कसे सांगू शकतात? वार्षिक ३०० कोटी रुपयांचे उत्पन्न या बाईंना केवळ लॉबिंगसाठी मिळत होते. ज्या देशात निम्मी जनता अर्धपोटि असते तिथे एक बाई कोणतेही उत्पादक काम न करता केवळ पटवापटवी करण्यासाठी इतकी प्रचंड रक्कम मिळवते याचा सामान्य लोकांनी काय अर्थ घ्यायचा? एरवी सगळीकडे मिरवणार्या आणि जमिनीपासून दोन बोटे वर चालणार्या मिडियालाही या सरकारबाह्य सत्ताकेंद्र
ा तपास करावा असे का वाटले नाही? खा-उ-जा (खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण) हे परवलीचे शब्द बनलेल्या आपल्या देशात लॉबिंग करुन आपले उखळ पांढरे करुन घेणे हीच आपल्या विकासाची व्याख्या झाली आहे का? आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे या देशातील तथाकथित बोलघेवड्या मध्यमवर्गाने आजतागायत यापैकी एकही प्रश्न कसा उपस्थित केला नाही? का या खा उ जा संस्कृतीमुळे त्यांचा स्वत:चाही विकास झाल्यामुळे त्यांच्याही संवेदना बोथट झाल्या आहेत आणि त्यांना यात काहीच वावगे वाटेनासे झाले आहे? मग भ्रष्टाचाराच्या निर्देशांकात भारत महासत्ता झाला याबद्दल कोणी कोणाला बोलायचे? जाता जाता- वर्षभर राब राब राबून सगळ्या सरकारी अधिकार्यांना तोंड देऊन आणि व्यावसायिक अडचणी झेलून एक लघूउद्योजक वर्षाला एक कोटी रुपयांची उलाढाल करायचे स्वप्नही लगेच साकारू शकत नाही तिथे या बाई लॉबिंग करुन तीनशे कोटी रुपये कमावतात. लघुउद्योजकांनी आपापले कारखाने बंद करुन लॉबिस्ट व्हायचे ठरवले तर?
— कालिदास वांजपे
Leave a Reply