सीतेकरता व्याकुळ झाला
अवतारी चक्रपाणी
अजब ही रामप्रभू कहानी ।।धृ।।
पत्नीहट्ट हा त्याला सांगे
कांचनमृग शोभेल अंगे
मृगयेच्या तो गेला मागे
प्रसंग घेई रावण साधूनी ।।१।।
अजब ही रामप्रभू कहानी
रावण नेई पळवूनी सीता
दिसेन रामा कोठे आता
तरुवेलींना पुसत होता
वाहत होते अश्रु नयनीं ।।२।।
अजब ही रामप्रभू कहानी
बाणी ज्याच्या शक्ती शिवाची
ह्रदयामाजी दया सागराची
त्यालाही दिसे नियती खेची
सामान्यतेच्या मापी तोलूनी ।।३।।
अजब ही रामप्रभू कहानी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
विवीध-अंगी
१***
Path of Knowledge- ज्ञान मार्ग अर्थात ह्या मिथ्या, सत्य नसलेल्या जगाला ओळखण्याचा प्रयत्न करणे. त्याच वेळी स्ववर ‘ मी कोण ‘ ह्याचा शोध घेण्यासाठी लक्ष केंद्रित करणे, मनामधले विचार नष्ट करुन निर्माण होणाऱ्या शांततेची जाणीव ठेवणे हे असेल. ह्यालाच Objectless Awareness म्हणता येईल. अर्थात ध्येय रहीत जाणीव
— डॉ. भगवान केशवराव नागापूरकर
Leave a Reply