दिवाळीमध्ये भेसळ तेलापासून आपले व आपल्या कुटुंबियांच्या आरोग्याचे संरक्षण करा
रिफाइंड तेल आरोग्यास तारक कि मारक ?
तेल रिफाइंड करण्याची
प्रक्रिया पाहूया :
तेल रिफाइंड करण्याची
प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे
१) कच्च्या तेलामध्ये प्रथम गॅसोलीन
मिसळून तेलाला पातळ करतात.
“गॅसोलीन” हे “रॉकेलसारखे” एक रसायन आहे.
२) त्यानंतर त्यात हॅग्झेन नावाचे
रसायन घालून पुष्कळ ढवळले जाते.
यामुळे तेलातील शरिराला आवश्यक असणारी “स्निग्ध द्रव्ये, जीवनसत्त्वे, प्रथीने, आणि खनिजे” नष्ट होतात.
3) नंतर गॅसोलीन आणि हॅग्झेन यांचा दुर्गंध नष्ट करण्यासाठी तेल ३०० अंश फॅरनाइट तापमानावर उकळले जाते.
४) तेलाचा रंग सुधारण्यासाठी याला ब्लीचिंग केले जाते. यामुळे
“बीटा कॅरोटीन आणि क्लोरोफिल” ही शरिरातील “कॉलेस्टेरॉल” घटवणारी “आवश्यक तत्त्वे नष्ट” होतात.
५) त्यानंतर डिगमिंग नावाच्या प्रक्रियेने तेल पातळ केले जाते.
६) पुन्हा तेलाचा दुर्गंध नष्ट करण्यासाठी तेल ४६४ अंश फॅरनाइट तापमानावर गरम केले जाते. असे तेल खराब होऊ नये, म्हणून त्यात प्रिझर्वेटीव्झ् घातली जातात.
एकदा गरम केलेले तेल परत वापरू नये, अशी आपली परंपरा आहे.
रिफाइंड तेल आपल्याकडे येण्यापूर्वी कमीत कमी २ वेळा मोठ्या तापमानावर उकळलेले असते, तसेच त्यामध्ये हानीकारक विषारी द्रव्ये घातलेली असतात. शासनाच्या एका कराराद्वारे खाद्य तेल आस्थापनांना कोणत्याही खाद्य तेलामध्ये विशिष्ट प्रमाणात पाम तेल (Palm oil) मिसळण्याची सूट मिळाली आहे.
असे रिफाइंड तेल खाल्ल्यानेच आज रक्तदाब, कर्करोग, थॉइरॉड, संधीवात यांसारखे आजार/ विकार बळावत आहेत.
२. रिफाइंड तेलाला पर्याय :
रिफाइंड तेल कधीही वापरू नये. त्याऐवजी घाण्यावर काढलेले शेंगदाणा, सुर्यफुल इ. कच्चे खाद्य तेल आरोग्यासाठी सर्वांत चांगले आहे.
म्हणून आपल्या गावात
किंवा शहरात कुठे तेलाचे घाणे आहेत का ? याचा शोध घेऊन तेथे
तेलबिया देऊन स्वतः तेल काढून घ्यावे.
लाकडी घाण्यावरचे शुध्द तेलाचा वापर आहारात करावा.
संकलन
गोवारी गोगटे अशोक
महाड रायगड
संदर्भ..शरीराचा PH
आरोग्यदूत या WhatsApp Group वरुन साभार
आरोग्यदूत व्हॉटसअॅप ग्रुप चा contact no मिळेल का ?
वरील लेख छान व माहितीपूर्ण.