बालपण म्हणजे………..
फुलणे फुलांचे,
बागडणे पाखरांचे.
स्फुंदून आले की,
मायाळू हात मायेचे.
तरुणपण म्हणजे……
भविष्याची स्वप्ने,
आयुष्याचे गीत.
मनमीत गवसता,
नकळत जडलेली प्रीत.
म्हातारपण म्हणजे…….
भूतकाळाच्या स्मृति,
वर्तमानाची काठी.
आणि सरता सरता,
सजलेली ताठी.
— अविनाश रामराव दाभाडे
Leave a Reply