नवीन लेखन...

रेखाटलेला महाराष्ट्र…

वैभवशाली इतिहासाचा गौरवशाली कर्तृत्वाचा महाराष्ट्र राज्याचा सुवर्ण महोत्सव उत्साहात, दिमाखात वर्षभर साजरा करण्यात येत आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने देखिल राज्याची प्रगती विविध प्रकाशनांच्या माध्यमातून जनतेसमोर आणली आहेत. या प्रकाशनांच्या मालिकेतील एक वैशिष्टयपूर्ण परंतु वेगळेपण जपणारे आणि रेखाटनांच्या माध्यमातून स्थानपेचा इतिहास उलगडणारे महाराष्ट्र ‘स्टेट इज लॉन्चड’ या एम. आर आचरेकर

यांच्या पुस्तिकेचे मराठी प्रतिरुप ‘असा जन्मला महाराष्ट्र’.राज्याच्या स्थापनेच्या क्षणचित्राचे कलात्मक नजरेतून तयार केलेल्या असा जन्मला महाराष्ट्र या पुस्तिकेचे प्रकाशन नुकतेच मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते झाले. या पुस्तिके मध्ये २७ एप्रिल ते १ मे १९६० या कालावधीत महाराष्ट्र निर्मितीच्या ऐतिहासिक क्षणांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला आहे. राज्य स्थापनेनिमित्ताने रात्यात चार दिवस मोठा उत्सव सर्वत्र साजरा करण्यात आला होता. यावेळी आयोजित कार्यक्रमांची ही सर्व रेखाटने आहेत. हे रेखांकन करण्यासाठी खास ख्यातनाम चित्रकार व कला दिग्दर्शक एम.आर.आचरेकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. केवळ पेन्सिलच्या एका फटकार्‍याच्या माध्यमातून ही रेखाटने तयार केली आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात राजा – महाराजांनी आपली चित्रे एम.आर.आचरेकर यांच्याकडून करवून घेतली होती. लंडनचा राजा पंचम र्जार्जच्या राज्याभिषेकाच्य रौप्य महोत्सवी सोहळ्याचे चित्रण करण्यासाठी तत्कालीन ब्रिटीश सरकाने त्यांना खास लंडनला पाठविले होते. छायाचित्रण व लिथोग्राफी यामध्येही त्याना उत्तम गती होती. आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, बॉम्बे आर्ट सोसायटी, सिने आर्ट डायरेक्टर्स ऑफ इंडिया, ह्या संस्थांचे काही काळ ते अध्यक्
होते. लोकमान्यता आणि राजमान्यता मिळालेल्या या प्रतिभाशाली कलावंतास केंद्र शासनाने पद्मश्री किताबाने गौरविले आहे. अशा या आचरेकरांनी तयार केलेल्या रेखाटनांचे प्रारंभी म्हणजेच १९६० साली महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र स्टेट इज लॉन्चड’ या नावाने इंग्रजी भाषेत एक पुस्तिका प्रकाशित केली होती. या पुस्तिकेची वेळोवेळी होणारी मागणी लक्षात घेवून दोनवेळा त्याचे

पुर्नमुद्रण ही करण्यात आले होते. राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात मराठी भाषेत ही पुस्तिका आणण्याचे निश्चित करण्यात आले. या चित्रांचे अक्षरांकन करण्यासाठी ज्येष्ठ चित्रकार व सुलेखनकार अच्युत पालव यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी मोठया आनंदाने यास होकार दिला अन ही क्षणचित्रे कलात्मक नजरेतून साकारणारी असा जन्मला महाराष्ट्र या पुस्तिकेची निर्मिती झाली. या पुस्तिकेच्या प्रस्तावनेतच आशय नमूद करण्यात आला आहे. स्वतंत्र महाराष्ट्राच्या निर्मितीचा निर्णय झाला आणि उभा महाराष्ट्र चैतन्याने सळसळून निघाला. मुंबई, नारळी पोफळीच्या झाडांनी वेढलेला सुंदर कोकण, राकट-रांगडा देशभाग, कापूस पिकविणारा विदर्भ आणि ज्योतिर्लिंग विभूषित मराठवाडय़ातील ३ कोटी ३० लाख जनतेने २७ एप्रिल १९६० पासून पाच दिवसांचा आनंदोत्सव साजरा केला. तत्कालीन पंतप्रधान स्वत:च्या आनंदोद्यात्रेत सहभागी झाले. ध्येयवादी आणि ध्यैर्यशाली महाराष्ट्राची देशाच्या कुटुंबातील एक नवा सदस्य म्हणून त्यांनी जगाला ओळख करुन दिली.राष्ट्रीय एकात्मतेच प्रतीक अशी सर्वधर्मीय प्रार्थना सभा, शिवनेरीवरील सोहळा, शिवाजी पार्क आणि गिरगाव चौपाटीवरील पंतप्रधानांच्या जंगी सभा, राजभवनातील मध्यरात्रीच्या सोहळ्यात पंतप्रधानांनी केलेली नव्या राज्याची घोषणा, राज्याच्या पहिल्या मंत्रिमंडळाचा शपथविधी, मुंबईचे भूषण अ
लेल्या जागतिक कीर्तीच्या वास्तुंवरील मनोहारी रोषणाई… या सर्व न भूतो न भविष्यती क्षणांना कलात्मकरीतनने जिवंत केले हा अभूतपूर्व आणि ऐतिहासिक सोहळा आपणासमोर उलगडला आहे पानांतून… या पुस्तिकेमध्ये राज्य निर्मितीचा आनंद साजरा करताना महाराष्ट्रातील महापुरुषांच्या जीवनावर आधारीत देखावे उभारण्यात आले. महात्मा जोतिबा फुले यांच्या अस्पृश्यता निर्मूलन आणि स्त्री शिक्षणाचा संदेश देणारा देखावा त्यापैकीच होता. पुण्यातल एका भव्य सभेत शतायुषी महर्षी अण्णासाहेब कर्वे, सेनापती बापट, एस.एम.जोशी आणि यशवंतरावजी एकाच मंचावर एकत्र आले. ज्या घरात शिवाजी महाराज जन्मले त्या घरासमोर राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. शिवछत्रपती स्मारक समितीचे अध्यक्ष बाळासाहेब देसाई यांच्याहस्ते मुख्यमंत्र्यांना छत्रपतींची प्रतिमा भेट देण्यात आली.या रेखाटनांचा यामध्ये समावेश आहे शिवनेरीवर मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी विराट सभेस मार्गदर्शन केले. मुंबईनगरी सोन्याच्या दागिन्यासारखी उजळून निघाली. सार्वजनिक इमारती आणि घराघरांवर दीपमाळा व आकाश कंदिलांनी रोषणाई करण्यात आली. जणू दिवाळीच साजरी झाली. आजच्या मंत्रालयाची इमारत रात्रीच्या आगळ्या सौंदर्याने खुलून आली होती यासारख्या प्रसंगांचा यात समावेश आहे, तसेच मुंबईचे रहिवासी असलेले, अन्य राज्यातील बांधवही महाराष्ट्र स्थापनेच्या सोहळ्यात एकदिलाने सहभागी झाले. दक्षिण भारतीय बांधवांच्या ६० सांस्कृतिक संघटनांनी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले, शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच जनतेला स्वच्छ, नि:पक्षपाती आणि कर्तव्यदक्ष प्रशासन देण्याची ग्वाही यशवंतराव चव्हाणांनी आपल्या पहिल्या भाषणात दिली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी शप
विधीनंतर सचिवालयात स्वाक्षरी करुन पदभार स्वीकारला अशी महत्वपूर्ण रेखाटने देखील यात पहायला मिळतात.जुने मुंबई राज्य लोप पावल्यानंतर अस्तिवात आलेल्या नव्या महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा हा रेखाटनांचा इतिहास राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात प्रेरणादायी व स्फुर्तिदायक आहे याची प्रचिती असा जन्मला महाराष्ट्र या पुस्तिकेच्या रूपाने येत आहे. . माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने प्रकाशित केलेला हा अनमोल ठेवा तमाम महाराष्ट्रवासियांनाही उपलब्ध करून देण्यात आला आहे. हे सारे वाचल्यानंतर हे पुस्तक संग्रही असायलाच हवे असे वाटते आहे ना तेव्हा संपर्क साधा प्रकाशने शाखा, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई यांच्याशी.(महान्यूजच्या सौजन्याने)

— मनिषा पिंगळे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..