कोठेतरी मी वाचले होते
तुमच्या पुढे चालणार्या तिने
आपल्या रेशमी केसावरून
सतत हळूवार हात फिरविला
की समजून जावे ही खूण आहे
तिला तुमच्यात रस असण्याची…
पण माझ्या पुढे चालणार्या तिला
सवयच होती विनाकारण आपल्या
केसांवरून हात फिरविण्याची…
तिच्या रेशमी केसात गुंतून मी
तिच्या मागे चालत राहिलो
आणि जागा झालो तेंव्हा जाणिव झाली
खड्ड्यात पाय अडकून पडल्याची…
माझा मोडलेला पाय बरा होईपर्यत
ती झाली ही होती दुसर्याची…
तिच्या रेशमी केसात गुतंल्यामुळेच
माझ्यावर आजही वेळ येत होती
तिच्या मागून फरफटत जाण्याची…
कवी-निलेश बामणे ( एन.डी.)
— निलेश बामणे
Leave a Reply