29. लग्न आणि आपला समाज
काही दिवसापूर्वी एक लग्नपत्रिका माझ्या पाहण्यात आली. त्या लग्नपत्रिकेत वधू-वरांच्या नावासमोर कंसात त्यांच शिक्षणही लिहलेल होत. दोघांचही शिक्षण सारखंच होत मला वाटत त्यांच वय, समाजातील आर्थिक स्तर, जात-धर्म, रंग,उंची शारिरीक बांधा ही सारखाच असावा त्याचबरोबर त्यांच्या आवडी-निवडी आणि व्यसनेही सारखी असावीत येथे व्यसने हा शब्द मी दारू वगैरे पिण्यासंदर्भात वापरलेला नाही. सांगायच तात्पर्य इतक लग्न ठरण्यापासून ते होईपर्यत समानतेला फारच मह्त्व आहे आपल्या समाजात म्ह्णूनच तर आपल्यापेक्षा कमी शिकलेल्या तरूणाशी लग्न करण्याचा निर्णय एखाद्या तरूणीने घेतल्यास लोक नाक मुरडतात. बायको नवरयापेक्षा जास्त शिकलेली असल्यास त्यांचा संसार बरा होत नाही या अंधश्रध्देने ग्रासल्यामुळे. लग्नामुळे आपल्या देशात दोन जीव कमी एकत्र येतात त्यापेक्षाही बाकीच्याच गोष्टी अधिक एकत्र येताना दिसतात त्या कोण-कोणत्या वगैरे चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. संसार म्ह्णजे बैलगाडी आणि नवरा बायको त्या बैलगाडीची दोन चाक एक कोलमडला तरी संसाराची बैलगाडी पुढे जात नाही पण हे सार तो पर्यत ठिक होत जोपर्यत बैलगाडीच चाक बदलता येत नव्ह्त आणि आता बैलगाडीचा नाही तर विमानाचा जमाना आहे.
आज लग्नात दागदागिण्यावर, कपड्यालत्त्यावर, लग्ना दरम्यान होणार्या सर्वच कार्यक्रमावर आणि विधींवर लाखो रूपये मध्यम वर्गीय आणि पाण्यासारखा पैसा अतीश्रीमंत लोक उधळ्तात. ज्यांची तो उधळायची ऐपत आहे त्यांनी तो उधळायला काहीच हरकत नाही पण सामाजिक जाणिव वगैरे काही प्रकार असतो की नाही. असो पण हातावर पोट असणारे आणि बेताची मिलकत असणारेही जेंव्हा लग्नावर प्रसंगी कर्ज काढून खर्च करतात तेंव्हा त्यांच्या मुर्खपणावर हसू येणार नाही तर काय ? म्ह्णूनच आजकाल काही प्रेमवीर कोर्टात किंव्हा देऊळात लग्न करणे पसंद करतात पण त्यातही काही महाभाग असे असतात पळून जावून कोर्टात- देऊळात लग्न झाल्यानंतरही सर्व अलबेल झाल्यावर समाजाच्या भितीने पुन्हा विधीवत लग्न करतात तेंव्हा त्यांच्या बुध्दीची कीव कराविशी वाटते. लग्नावर होणारी लाखोची उधळ्पट्टी न करता त्या पैशाचा वापर समाजाच्या सोडा निदान स्वतःच्या हितासाठी करावा असं ही कोणाला वाटत नसेल तर ते आश्चर्य नव्हे तर मागासलेपणाचच लक्षण म्ह्णावं लागेल. विधीवत लग्नात घेतल्या जाणार्या आणा-भाका आज कितीजण पाळतात देव जाणे की त्या फक्त चित्रपटातील नायक – नायिकाच पाळ्त असाव्यात बहुदा. काही लग्नात तर ती विनाकारण रडी गाणी लावलेली असतात प्रत्यक्षात सर्वाच्या चेहर्यावरून आनंद ओतू जात असतो.
समाजात एक वेळ्च्या अन्नाला महाग झालेले हजारो लोक असताना लग्नाच्या मेजवानीत जी अन्नाची नासाडी केली जाते ती आपल्या देशाला परवडणारी नाही. कोणत्याही लग्न समारंभातील एक ताट तरी रस्त्याच्या कडेला राह्णार्या अथवा भिक मागणार्याकाडे जातो का ? पोट भरलेल्यांची पोट भरून लोक कसल पून्य मिळवितात ते देवच जाणे. लग्न खरं म्ह्णजे शूभ कार्य पण याच कार्यात काही लोक दारू आणि मटणावर ताव मारत असतात. विधीवत लग्न झाल्यावर काय होत दोघांना कायद्याने एकत्र येण्याचा मार्ग मोकळा होतो. कोर्टात लग्न केल्यानेही तेच होत. सध्याच्या परिस्थितीत लाखोची उधलपट्टी करूनही झालेल लग्न किती दिवस टिकेल याची खात्री नसताना त्यावर होणारा खर्च एखाद्या सामाजिक संस्थेला देणगी म्ह्णून दिल्यास अथवा त्याचा उपयोग सामाजिक कार्यासाठी केल्यास वधू-वरांना जरा जास्तच शुभ आर्शिवाद मिळ्तील त्यामुळे त्यांच लग्न ही टिकेल आणि संसारही सुरळीत होईल नाही का ?
— निलेश बामणे
मो. 9029338268
Email-nileshbamne10@gmail.com
Leave a Reply