नवीन लेखन...

लग्न आणि मध्यमवर्ग

मध्यमवर्गीय माणसांच्या आयुष्यातील सर्वात आनंदाची आणि स्मरणात ठेवण्याजोगी कोणती घटना असील तर ती घटना म्ह्णजे लग्न ! मध्यमवर्गीय माणसाच संपूर्ण जीवनच म्ह्णा ना ! लग्न या संकल्पनेच्या आवती – भोवतीच गुंफलेलं असतं. मध्यमवर्गीय माणसाची लग्न या विषयापर्यत पोहचल्यावर सर्वसाधारणतः विचार करण्याची क्षमताच नष्ट होते. त्याची बुध्दी निषक्रीय होते. मध्यमवर्गीय माणसांनीच आजकाल लग्नाचा बाजार मांडलाय आणि त्या बाजाराला काही जोडधंदयांचा आधार ही दिलेला आहे. लग्न या विषयाचा हल्ली काही विचारी अविवाहीत लोकांना विनाकारणच मानसिक त्रास होत आहे आणि त्यांचे पालक समाजाच्या टोमण्यांचा मारा सहन न झाल्यामुळे स्वतःलाही विनाकारण मानसिक त्रास करून घेत आहेत. आपल्या समाजात मोक्ष आणि लग्न याचा संबंध ही लावण्याचा प्रयत्न काही महाभाग करताना दिसतात. आजच्या काळाचा विचार करता जर स्त्री- पुरूष समान मानले तर त्यांना एकमेकांच्या साथीची गरजच काय ? ते ही त्यांना त्यांची गरज वाटत नसताना ! हे खरं आहे की स्त्री- पुरूष एकत्र आल्या खेरीज प्रजनन होऊ शकत नाही पण ज्यांना जगाची लोकसंख्या वाढविण्यात रसच नसेल आणि त्यांच्या दृष्टीने लग्नाशिवाय त्यांचे काही अडत नसेल अथवा त्यांच्या जीवनावर त्यामुळे फारसा परिणाम होत नसेल त्यांच्या लग्नाच्या चिंतेने मध्यमवर्गीय लोक विनाकारण आपल रक्त का आटवितात ? तेच कळ्त नाही. वयाची तिशी ओलांडली की कित्येकांच्या मागे लग्न करण्यासाठी तगादा लावला जातो, त्यांना प्रसंगी तडजोड करण्याचे सल्ले दिले जातात अथवा तसे करण्यास भाग पाडले जाते, प्रसंगी खोट बोलण्याचा आधार घेण्यास सांगितले जाते, आपल्या विचारांशी तत्वांशी तडजोड करायला सांगितले जाते. आपल्या आवडी – निवडी आशा- आकांक्षाना मुरड घालून जगण्यास सांगितले जाते. प्रत्येक बाबतीत त्याला काय होत ?

हा उलट प्रश्न विचारला जातो या प्रश्नाच उत्तर न दिलेल्यांना त्याचा त्रास पुढे आयुष्यभर भोगावा लागतो. समाजात आज जे घटस्फोटाच प्रमाण वाढलयं त्याला हा एक प्रश्न सर्वाधिक कारणीभूत आहे. आजकाल प्रेमविवाह करणार्यांमना सर्व काही माफ असतं पण ठरवून लग्न करणार्यां ना मात्र असंख्य परिक्षांना सामोर जावं लागत जणू काही लग्न केल्यामुळे त्यांना जगातील सर्वात अमूल्य वस्तूच मिळ्णार आहे. अगदी जन्म पत्रिकेतील ग्रहांच्या दशांपासून त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक स्थानांपर्यत, त्यांच्या चालण्या ,बोलण्या, राहण्या – वागण्यापासून त्यांच्या झोपण्याच्या सवयीपर्यत, त्याच्या प्रेमप्रकरणा पासून त्याच्या आजी – आजोबांच्या लपडयांपर्यत, विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. भविष्यात ठरवून लग्न करणार्यां ना लग्न करण्यापूर्वी आपल्या लग्नापूर्वी पर्यतच्या आयुष्यावर एक पुस्तकच लिहून ठेवावं लागेल म्ह्णजे लग्न ठरविताना सोप्प जाईल. आपल्या वयाच्या कोणत्याही टप्प्यावर मनासारखा जोडिदार मिळालाच तर लग्न केल्यास कोणाच काही नुकसान होणार आहे का ? पण लग्नाच्या बाबतीत तडजाड करणारा स्वतःबरोबर इतर अनेकांची आयुष्ये उध्वस्त करायला कारणीभूत ठरत असतो हे मात्र नक्की !

काही मध्यमवर्गीय पालक आपल्या पाल्यांच्या लग्ना बाबतीत विनाकारणच स्वतःला मानसिक त्रास करून घेताना दिसतात. प्रत्येक पालकांच्या नजरेत आपली मुलं ही लहान आणि महत्वाचे म्ह्णजे अज्ञानी असतात, भले जग त्यांच्या ज्ञानाच कौतूक करीत असलं तरी ! आपल्या ज्ञानी मुलांवर सतत मानसिक दबाव तंत्राचा वापर करून मानसिक दृष्टया त्यांच खच्चीकरण करतात, त्याचे संभाव्य परिणाम नेहमीच भयावह असतात. असं करणारे पालक स्वतःच तर नुकसान करतातच त्याच बरोबर समाजाच आणि देशाच ही नकळ्त नुकसान करीत असतात. लग्न केल्यामुळेच जीवनाला स्थिरता प्राप्त होते हा विचार करणच सर्वात मोठा गाढवपणा आहे. पुरूष आणि स्त्री यांच्याकडे एक स्वतंत्र जीव म्ह्णून आपला समाज कधी पाहायला शिकणार आहे. लग्न ही एकमेव गोष्ट आहे ज्यामुळे स्त्री-पुरूष समानता प्रत्यक्षात येत नाही आणि येणारही नाही. एकीकडे आपण समलिंगी संबंधाचे अथवा लिव्ह – इन चे समर्थन करीत आसताना प्रत्येकाने विवाह केलाच पाहिजे हा अट्टहास करताना का दिसतोय ? ब्रम्ह्चारी साधू संतांच्या पायावर रोज डोक टेकविणार्यांलना आपली मुल – मुली ब्रम्ह्चर्य पालन करत समाजासाठी काही भरीव कार्य करू इच्छित असतील तर ते पचवायला का जड जातय ? काही लोक असा ही उपदेश करतात ब्रम्ह्चारी रहायचच असेल तर सन्यास घेऊन संसाराचाच त्याग करा ना ! असं म्ह्णणार्यां ना ब्रम्ह्चर्य म्ह्णजे काय ? हे माहितच नसत हा भाग वेगळा. समाजात लग्न न करता एकट जीवन जगणार्यांननी संसारात राहूनच समाजासाठी भरीव कार्य केल्याची आपल्या आजू- बाजूला असंख्य उदाहरणे असताना समाजाकडून लग्नाचा अट्टहास का केला जातोय ? माणूस म्ह्णून जन्माला आला आहात तर लग्न करायलाच हवे ! नाहीतर जन्माला येऊन उपयोगच काय ? तुमच्या मागे तुमच नाव काढणारं कोणी नको का ? लग्न नाही केल म्ह्णजे जीवन वाया गेल्यासारखं नाही का ? जगासाठी नाही तर निदान स्वतःसाठी तरी लग्न करायला नको का ? हे सर्व प्रश्न लग्नाच्या बाबतीत मध्यमवर्गीना सतावतात. खरं पाहता आज या प्रश्नांना काहीही अर्थ नाही. वास्तव हे आहे की आजही मध्यमवर्गीय माणूस लग्नाकडे डोळसपणे पाहायला शिकलेला नाही…

— निलेश बामणे

Avatar
About निलेश बामणे 419 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..