१९५१ साली प्रदर्शित झालेल्या अमरभूपाळी या चित्रपटातील हे गाणे त्याच्या उडत्या चालीमुळे आजही रसिकांच्या ओठावर आहे. या गाण्याचे स्वर होते गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे. वसंत देसाई यांनी या गाण्याला संगीत दिले. तर गीत होते शाहीर होनाजी बाळा यांचे. कवी, शाहीर होनाजी बाळा यांच्यावरील हा शाहीरपट. १९५२ साली झालेल्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट ध्वनिमुद्रणाचे पारितोषिक मिळालेला हा चित्रपट. या चित्रपटाने खर्या अर्थाने ग्रामीण प्रेक्षक मराठी सिनेमा पाहायला चित्रपटगृहात येऊ लागला.
लटपट लटपट लटपट लटपट
तुझं चालणं ग मोठ्या नखऱ्याचं
बोलणं ग मंजुळ मैनेचं
नारी ग , नारी ग
कांती नवनवतीची , दिसे चंद्राची , प्रभा ढवळी
जाईची रे वेल कवळी
दिसे नार , सुकुमार , नरम गाल , व्ह्ट पवळी
जशी चवळीची शेंग कवळी
दिसे नार सुकुमार , नरम गाल , व्हट पवळी
तारूणपण अंगात झोक मदनाचं जोरात
चालणं ग मोठ्या नखरयाचं
बोलणं ग मंजुळ मैनेचं
नारी ग , नारी ग
रूप सुरतीचा डौल , तेज अनमोल , सगुण गहिना
जशी का पिंजऱ्यातील मैना
हिच्यासाठी कितीकांची जनलोकांत झाली दैना
अशी ही चंचल मृगनयना
हिच्यासाठी कितीकांची जनलोकांत झाली दैना
निर्मळ कोमल तेज ग जैसे तुटत्या ताऱ्याचं
चालणं ग मोठ्या नखऱ्याचं
बोलणं ग मंजुळ मैनेचं
नारी ग , नारी ग
—
Leave a Reply