श्रुष्टीच्या निर्मात्याने नर, नारी अशा भिन्नलिंगी मानवाची तथा प्राण्यांची उत्पत्ती करतांनाच त्यांना प्रजननाच्या दृष्टीने कामक्रीडेची, लैंगिक सुखाची जाण करून दिली. प्राण्यांमधील शरीरसंबंध आपण लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजण पाहत असतो. परंतू मानवामध्ये गुप्त इंद्रीयांबाबत चर्चा करणे अथवा शरीरसंबंध ठेवणे म्हणजे मोठी लज्जास्पद, शरमेची आणि गोपनिय बाब मानली जाते.
मानवाचे शिस्त लावणे, कामाचे वाटप करणे, विवाह मर्यादा, नाती-गोती ठरविण्यासंदर्भात विशिष्ट सद्वर्तनाचे नियम ठरविले त्यातून धर्म उदयास आला. धर्माचाराप्रमाणे मानवामध्ये विवाह, नाती-गोती, शरीरसंबंध व लैंगिक सुखाच्या बाबतीत विशिष्ट बंधने, नियम व कायदे पाळावे लागतात.
संगणकीय आधुनिक आणि प्रगतशील विज्ञानयुगात सुद्धा लैंगिक सुख, शरीरसंबंध, गुप्त इंद्रीयांबाबत निर्माण होणाऱ्या अडी-अडचणी, गुप्तरोगांबाबत गोपनियता राखली जाते. या संदर्भात पाल्य आणि पालकांमध्ये उघडपणे चर्चा होतांना दिसत नाही. मुलांमधील जीज्ञासुपणामुळे त्यांच्यात विविध लैंगिक शंका निर्माण होणं स्वाभाविक आहे.किंबहुना पालक आपल्या हजरजबाबी पाल्यांच्या लैंगिक शंकांचे निरसन करण्यास कमी पडतात. पालकांना कळत नाही की पाल्यांना काय सांगायचे आणि कसे समजवायचे. त्यामुळे मुलांना काहीतरी थातूर-मातूर उत्तरे देवून गप्प करतात. विशेषत: आजचे पालक नोकरी-व्यासायापाई आपल्या पाल्यांना त्यांच्याशी हितगुज करण्यास वेळ देत नाहीत किंवा त्यांना शक्यही नसते.अशा वेळेस मुलांच्या शंकांचे समाधानकारक निरसन न झाल्याने मुलं त्यातील रहस्य जाणून घेण्यास बेचैन व आतूर झालेली असतात. नैराश्यामुळे पर्याय शोधू लागतात. मग अशी मुलं संगणकाच्या सायबर सुविधांमुळे इंटरनेट तसेच व्हिडीओ पार्लरच्या माध्यमांतून अर्धवट लैंगिकज्ञान मिळवतात. अपूर्ण ज्ञान हे अज्ञानापेक्षा अधिक घातक असते. अज्ञानामुळे वयात येणाऱ्या मुली त्यांच्या प्रथम मासिकस्त्रावाच्या वेळेस अगदी भांबावून जातात. शिवाय प्रौढावस्थेकडे कुच करणाऱ्या मुली-मुलांमध्ये वाढत्या वयोमानानुसार त्यांच्यातील शारीरिक बदल विकसित होतांना अगदी बरकाईने बदलत्या शरीराचे निरीक्षण करत असतात. त्याच काळात त्यांना शारीरिक कुतूहल व एकमेकांबद्दल आकर्षण होऊ लागते.आणि हळूहळू त्यांची लैंगिक वासना जागृत होऊ लागते.इंटरनेट, व्हिडीओ पार्लर सारख्या सुविधांमुळे अश्लील, बीभत्स चित्रपट पाहून, लेखन वाचून त्यांची कामोत्सुकता वाढीस लागते. त्यावेळेस त्यांना हवे असलेले शरीरीकसुख घेण्याचे त्यांचे वय नसते. का
ोत्तेजनाच्या अतिउत्साहामुळे त्यांच्यात लैंगिक मनोविकृती जागृत होऊन त्यांना वायोमर्यादेचे भानसुद्धा राहत नाही. त्यांच्या मनावरील संयम सुटल्यामुळे त्यांच्या कडून विनयभंग, बलात्कारासारखे अपराध घडतांना दिसतात.उदाहरण द्यायचे झाले तर सात अल्पवयीन मुलांनी एका विवाहित महिलेवर बलात्कार केल्याची बातमी वर्तमानपत्रातून वाचायला व ऐकायला मिळाली होती. अशा प्रकारच्या बलात्काऱ्यांना आपण नराधम, लिंगपिसाट म्हणू लागतो. बलात्कारीत पीडितांचे कौर्माय भंग झाल्याने, आब्रू लुटली गेल्याने, समाजात त्यांना दुय्यम स्थान दिले जाते. बलात्कारीत स्त्रिया, कुमारिका एकत्र आत्महत्या करतात किंवा वेश्याव्यावासायाकडे वळणे त्यांना भाग पडते. त्यात भर म्हणून इंटरनेट, व्हिडीओ पार्लर सारख्या सुविधांमुळे ब्लू फिल्मचे प्रदर्शन, विविध दूरदर्शन वाहिन्यांवरून दाखविले जाणारे अश्लील चित्रपट, अर्धनग्न पोषाख, नंगानाच पाहून शालेय मुले-मुली, तरुण-तरुणींना लैंगिक व शारीरिकसुखासंबंधी उत्सुकता वाटू लागते. तर बहुतांशी मुलांमध्ये भय, न्यूनगंड, मनोविकृती, वासनाविकार झपाट्याने वाढत आहे.
परिणामी मुलांचे विद्या-अभ्यासात लक्ष लागत नाही. त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला अडथळा निर्माण होतो. लैंगिक शोषण, रागिंगचे प्रकार वाढलेत. होमो, समलिंगी चाळ्यांचे प्रकार वाढलेत. वेश्यागमन केले जाते. वेश्यागमानामुळे एड्ससदृष्य परिस्थिती निर्माण झालीयं. एड्सच्या भीतीने वेश्यागमन बंध करून दुसरा पर्याय शोधला जातोय आणि तो म्हणजे बलात्कार.त्यामुळे कामवासनेच्या मनोविकृतीने पछाडलेले नराधम नातीगोती विसरून बाल, विवाहित, अविवाहित, वायोवृद्धांवर बलात्कार, विनयभंग करण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. बलात्काराची भावना लैंगिक मनोविकृतीमुळेच निर्माण होते. याचे निव्वळ कारण म्हणजे लैंगिक अज्ञान होय. त्यामुळं बदलत्या परिस्थितीनुसार ११ ते १६ वर्षे वयोगटातील शालेय मुला-मुलींना लैंगिक शिक्षण देणे गरजेचं झालेलं आहे.
लैंगिकसुख ही नैसर्गिक गरज असून त्यासंदर्भात शास्त्रशुद्ध आणि निर्मळ भावना मुलांमध्ये निर्माण करण्यासाठी विशिष्ट वयोमर्यादेच्या नाजूक वळणावर संवाद अथवा चर्चासत्र माध्यमातून तज्ज्ञ व्यक्तिंकडून किंवा डॉक्टरांकडून उघडपणे आवश्यक तेवढेच लैंगिक शिक्षण देण्यास काहीच हरकत नसावी. लैंगिक सुखाची नैसर्गिक गरज, अनैसर्गिक लैंगिक सुखाचे दुष्परिणाम, मुलींमधील मासिकपाळी, विवाह व शारीरिक सुख उपभोगण्यासाठी वयोमर्यादेची आवश्यकता, लैंगिक सुखातील विकृतीने, लैंगिक सुखाचा अतिरेक केल्याने आणि वेश्यागमानामुळे होणारे शारीरिक दुष्परिणाम, लैंगिक सुखासंबंधी भय, भिती, न्यूनगंड, मनोविकृती या बाबत सखोल ज्ञान आणि माहितीचा समावेश लैंगिक शिक्षणात असावा. त्याच बरोबरीने विनयभंग, बलात्कार, छेड-छाड, रागिंग सारखा गुन्हा केल्याने होणाऱ्या फौजदारी दंड, शिक्षेबाबत उदाहरण दाखल्यांसहित सखोल ज्ञान व माहिती शालेय विद्यार्थ्यांना देण्याची अत्यंत गरज आहे. जेणेकरून अशा अपराधाबद्दल त्यांच्या मनात भिती निर्माण होईल आणि या लैंगिक शिक्षणाचा त्यांच्याकडून अतिरेक किंवा दुरुपयोग होणार नाही.
लैंगिक शिक्षणासाठी वेगळ्या शालेय विषयाची गरज नाही. ह्या शिक्षणासाठी वर्षभराच्या विद्याभ्यासातील ८ ते १० तासिकाही पुरेशा आहेत. शिवाय लैंगिकशिक्षण ही व्यक्तिगत गरज असल्याने प्रशोत्तरे किंवा परीक्षेची गरज नाही. याउपरांत जर लैंगिकशिक्षणाकरिता कुणी विरोध करत असेल तर सर्वप्रथम इंटरनेट, व्हिडीओ पार्लर विविध दूरदर्शन वाहिन्यांद्वारे पारदर्शित केले जाणारे हिडीस, अश्लील, बीभत्स चित्रपट, ब्लू फिल्म्स, अर्धनग्न वेशभूषा-शो, नंगानाच सक्तीने कायमचा बंद करायला हवा. नाहीतर भविष्यात वासनांध लैंगिक विकृतीने पछाडलेल्या नराधमांचे बलात्कार व छेडछाड करणेचे, वेश्यागमानाचे प्रमाण वाढेल. त्यात करून गर्भलिंग चीकेत्सेमुळे मुलींना जन्मास घातले जात नाही. स्त्रीभ्रूण हत्या केली जाते. ही बाब अतिशय गंभीर असून स्त्रियांचे प्रमाण घटल्यामुळे भविष्यात नाती-गोती सांभाळली जातील काय? अशा शंकेने मनात घर केल्यास गैर वाटण्याचे कारण नाही. लैंगिक शोषण, बलात्कार, कौमार्यभंग, विवाहपूर्व शरीरसंबंध आणि मातृत्व, आदी अत्याचार होतच राहतील. एड्सचे प्रमाण वाढीस लागेल…आणि एक ना एक दिवस एका भयंकर भयावह अशा विनाशकाल
परिस्थितीला सामोरे जावे लागेल…अशी नुसती कल्पना केलेलीच बरे…नाही का?..तात्पर्य शालेय अभ्यासक्रमातून लैंगिक शिक्षण देणे ही काळाची गरज आहे.
सुभाष रा. आचरेकर, वांद्रे(पूर्व), मुंबई-५१.
— सुभाष रा. आचरेकर
Leave a Reply