पुस्तक परिचय
खानदेशातील अहिराणी स्त्रीगीतेलेखिका : डॉ. उषा सावंत
बहिणाबाई चौधरी यांच्या गीतांच्या निमित्ताने अहिराणी या खानदेशी बोलीभाषेशी परिचित झालो; परंतु ती खरी अहिराणी नसून खानदेशी वऱहाडी भाषा असल्याचे प्रा. डॉ.
उषाताई सावंत यांच्या उपरोक्त शीर्षकाच्या शोधनिबंधपर पुस्तकातून आपणास ज्ञात होते. एखादी खरी व नवीन माहिती देण्याचे ध्येय या एकाच उदाहरणावरून कसे या पुस्तकास साध्य झाले आहे, ते लक्षात येते.
खरे तर उषाताईंचा हा ग्रंथ आचार्य उपाधीसाठी सादर केलेल प्रबंधाचे संपादित, संक्षिप्त रूपच म्हणावे लागेल. नव्हे तसा तो आहेच. मूळ प्रबंध 500 पानांचा जरी असला तरी ते संपादित करताना त्या संपादन-संस्कारामुळे तो 127 पृष्ठांचा झाला. तरी त्यातील मौलिकता टिकून आहे. हे या ग्रंथाचे यश व वैशिष्ट्यही म्हटले पाहिजे.
बहिणाबाई चौधरी या सर्व प्रसिद्धिपराङ्मुख कवयित्रींचे एक ठोस प्रतिनिधित्व करीत असल्या, तरी खानदेशातील व खेड्यात अजूनही घरोघरी बहिणाबाई आहेत, असा लेखिकेचा दावा आहे. यात कानबाईची गीते, लग्नगीते, गौराईची गीते ही पारंपरिक सणांची स्त्रीगीते येतात. शिक्षिताला सुशिक्षित बनविणाऱया या सर्व बहिणाबाई अशिक्षित असल्या तरी लोकशिक्षिका आहेत, असे विधान लेखिका करते. घराची मंदिरे होण्यासाठी, अंगणांची विद्यापीठे बनण्यासाठी ही स्त्रीगीते उपयुक्त ठरतील, असा लेखिकेचा दृढ आत्मविश्वास आहे.
`
लोकगीते परिवर्तनशील असतात, असे लेखिका अनुभवाने सांगते. बदलत्या काळाचे संस्कार लोकगीतांवर होणे अपरिहार्य असते. `पानीतला मासा, पानीसी बेईमान, पानी जाई सरी, काय लागी परिनाम। असा दृष्टान्त देताना लेखिकेला तो ज्ञानेश्वरांनाही शह देणारा वाटतो. हे लेखिकेचे अहिराणी भाषेवरचे
प्रेम व स्त्रीवादी भूमिकेची मानसिकता बोलते. लोकगीते गेय असतात. ती चाल व वृत्तासहच (ओवीवृत्त) बाहेर येतात. ओवीगायनात कर्नाटकी संगीतशैलीचा प्रभाव लेखिकेला जाणवतो.
खानदेशाची लोकसंस्कृती व लोकगीते या दुसऱया प्रकरणात ज्ञानेश्वरांवरील अहिराणी भाषेच्या प्रभावासंदर्भात एक गीत वानगीदाखल लेखिका उद्धृत करते.
यशोदेना बाय तान्हा माले म्हने होईले वो। जवथीन कृष्ण ग्या तेना वियोगाना घाला।।
झुरू झुरू झाया हाउना पिंजरा। आनपानी माले खाये, झायी निरास।।
अशा पद्धतीची ज्ञानेश्वरांची एक रचना डॉ. दा. गो. बोरसे यांच्या `तापीतरंग’ या पुस्तकातून घेतली असल्याचा लेखिका सोदाहरण उल्लेख करते. तेव्हा बोलीभाषेचे आगळे महत्त्व लक्षात येते. वहीगीते हा लोकगीतांचा अनभिज्ञ प्रकार लेखिका येथे सोदाहरण मांडते.
खानदेशाची दैवते आणि स्त्रीगीते या तिसऱया प्रकरणात कानबाई हे खानदेशचे दैवत. कानबाई-रानबाई उत्सवातील कस्तुरीपूजा म्हणजे मातीची पूजा ही कृषी संस्कृतीचे प्रतीक. गुलाबाई आसरा (अप्सरा) यातील गुलाबाई ही कुवार मुलींची देवता व आसरा जलदेवता ही माहिती पुढे येते. सखाई सप्तशृंगी, एकवीरादेवी अशी आणखी दैवते तपशिलात पुढे येतात.
`खानदेशातील सण, उत्सव व स्त्रीगीते यात ओव्यांमधून सणांचा उल्लेख, त्यातील उत्सव साजरा करण्याच्या पद्धती या ओव्यांमधून येतात. लेखिका संदर्भ देताना पटणारे व न पटणारे संदर्भही देते. `
`अहिराणी स्त्रीगीतांचा भाषिक अभ्यास’ या प्रकरणात या गीतातील रससौंदर्य, भाषासौंदर्य लेखिका मांडते. ओवीची रचनेची रमणीयता व आशयघनता या प्रकरणात काव्यानंदाची प्रचिती कशाकशातून येते, त्याचे नऊ प्रकार सांगितले आहेत
खानदेशातील अहिराणी स्त्रीगीते
लेखक : डॉ. उषा सावंत
प्रतिमा प्रकाशन, पुणे
पाने : १२७किंमत : रुपये ९५/-
—
Leave a Reply