नवीन लेखन...

वणवा खरचंच पेट घेत आहे….. वगेरे कांही नाही

/>

वणवा खरचंच पेट घेत आहे….. वगेरे कांही नाही

 

 

Date: 2010/3/21Subject: वणवा खरचंच पेट घेत आहे….. वगेरे कांही नाही

 

महाराष्ट्रात आता अनेक बड्या कंपन्या येतायत, चित्रपट निर्मितीमध्ये उतरातायत आणि टि .व्ही. , रेडीओ मध्ये सुद्धा उतरतायत. त्यांची यादी पुढीलप्रमाणे :-१) रिलायन्स उद्योग समूह (अनिल अंबानी) हे ३ मराठी टि.व्ही. चॅनल्स काढतायत :बिग गौरव (मनोरंजन वाहिनी, सिरियल्स ,वगैरे साठी)बिग चित्रपट (झी टॉकीज सारखं, दिवसभर फक्त चित्रपट)वणवा खरचंच पेट घेत आहे….. वगेरे कांही नाही बिग मराठी न्यूज (२४ तास बातम्या)

 

 

२) सहारा मराठी ( सिरियल्स )३) 9X मराठी ( २४ तास बातम्या ) शक्यता कमी आहे.४) संध्या म्रराठी५) आमची मुंबई ( २४ तास बातम्या )६) TV 9 ( २४ तास बातम्या )७) P7 ( २४ तास बातम्या )८) संगीत मराठी ( २४ तास गाणी, MTV सारखं )९) मित्र मराठी ( २४ तास गाणी , MTV सारखं )१० ) शाईन मराठी ( २४ तास गाणी, MTV सारखं )११ ) कार्टून नेटगोल्ड ( २४ तास कार्टून्स )तर अशी सगळ्या प्रकारची एकूण १३ ते १५ टि. व्ही. चॅनल्स घडाधड सुरु होणार आहेत.याचा अर्थ ‘फरक पडतोय’ …. त्यांना मराठी माणसाची किंमत कळायला लागली आहे….. वणवा खरचंच पेट घेत आहे……..

 

 


 

वाचा विचार करा कृती करा !! माय मराठी असा वरील प्रमाणे विचार करणाऱ्याला माफ कर ते काय विचार करत

आहेत यांचे त्यांना भान नाही

 

वणवा खरचंच पेट घेत आहे…..

वगेरे कांही नाही

 

 

हा धंदा आहे. त्यांना मराठी भाषेचे प्रेम वगेरे , महत्व कांही नाही. कारमुणूक करून पैसा मिळवणे एवढी मराठी चनल्स सध्या चालू आहेत त्यांनी मराठीचे काय भले केले ? मराठी माणूस उगीच कोणत्याही गोष्टीला भुलतो. एव्हढी साहित्य संमेलने भरतात त्याने मराठी चा काय फायदा झाला. केवळ ५-७ टक्के लोकांना मिरवता यावे हाच उद्देश पूर्ण होतो. जो पर्यंत मराठीत तांत्रिक, बँकिग वैद्यानिक, गणिता करता लागणारे इंग्रजीला पर्यायी सोप्पे मराठी शब्द भांडार समृद्ध होत नाही तो पर्यंत मराठी दुय्यमच राहणार यात शंका नाही. यावर प्रतिक्रिया अवश्य द्या आणि त्याच बरोबर पर्यायी शब्द भांडार कसे वाढेल या करता ठोस यंत्रणा उभी करावी लागेल.तरच मराठीला भविष्य आहे.

 

 

धर्म ही अफूची गोळी आहे हे सत्य मानलं तर मालिका या अधिक प्रभावी अफूच्या गोळ्या म्हणाव्या लागतील. बाहेरच्या सगळ्या संवेदना बधिर करण्याची शक्ती त्यांच्यात आहे. भानामतीसारखा त्यांचा जालीम परिणाम होतो. महिला पडद्यावरच्या खोटय़ा जगालाच वास्तव मानतात व वास्तवातली दुनिया विसरू पाहतात. खोटय़ा कथा, खोटय़ा समस्या व त्यावरील खोटे उतारे हे दाहक वास्तवापेक्षा त्यांना केव्हाही चांगले वाटते. शिवाय जे काही आहे ते अध्र्या तासात संपणार. त्यानंतर लगेच चॅनेल बदलून ‘लाफ्टर चॅलेंज’बघायला मोकळे. हुकमी हसू व हुकमी आसू. घरातील व आयुष्यातील टेन्शन्स, आर्थिक विवंचना, प्रापंचिक अडचणी, नोकरीतील राजकारण,पतीशी रोजची भांडणं, दूषित वातावरण, मुलांचे प्रॉब्लेम्स, शारीरिक दुखणी, नातेसंबंधांतील ताणतणाव, न सुटणारे प्रश्न, झालेली कोंडी या सगळ्यांपासून सुटका हवी असेल तर मालिकेत गुंतून राहायचं, बाहेरच पडायचं नाही. कांजिवरम साडय़ा, दागदागिने, चेहऱ्यावर रंगरंगोटीची पुटं, आलिशान घरं यातून डोकावणारे तकलादू, गोंडस, पंचतारांकित दु:ख काही काळ तरी विसरायला व फडताळात शिताफीने दडवून ठेवायला मालिकेसारखं साधन नाही. त्या जितक्या जास्त बघाव्यात तितकं वास्तव दूर ठेवता येतं.

 

 

मला हे जमायचं नाही, करायचं नाही, खोटं आयुष्य मी जगू शकत नाही, कटू सत्यापासून मी पळू शकत नाही, पळू इच्छित नाही. मी माझं दु:ख पोसाळत कुरवाळत बसतो. फुंकर घालून निखारा तेवत ठेवावा तसं मी दु:ख तेवत ठेवतो, जिवंत ठेवतो. पण हे तरी चांगलं आहे असं कोणी सांगितलं? मालिकेसारखा बाह्य, वरवरचा, पलायनवादी उपचार व आत्मताडन, आत्मपीडा करून घेऊन त्या कैफात झिंगून कालक्रमणा करणं यात चांगलं काय आणि वाईट काय, याचा फैसला तरी कोण करणार?

 

— ठणठणपाळ

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..