पांघरुणात गुरफटून ठेवणारी ,झोपेच्या मोहात गुंतविणारी थंडी हळुहळु आपला निरोप घेऊ लागली आहे. ऊबदार वाटणाऱ्या ऊन्हाचा प्रवास आता तापणाऱ्या उन्हाच्या दिशेनं सुरु झाला आहे.
साहित्यात हा वसन्त ऋतू कितीही आल्हाददायक सांगितला असला तरीही व्यवहारात मात्र केवळ डॉक्टरांसाठीच आल्हाददायक दिसून येतो.याच वसंत ऋतूच्या काळात सर्दी ,खोकला,दमा tonsillitis,bronchitis,flue, अनेक साथीचे आजार,त्वचाविकार अश्या अनेक तकारींना जन्म देतो.भूक मंदावते, पचनशक्ती कमी होते,थोडक्यात वेगवेगळ्या आजारांची सुगी जोमात असते.थंडीत साठलेला कफ दोष ऊन्हाने पातळ होऊन हे सगळं रामायण घडवत असतो.
आपल्या आजुबाजुला घडणाऱ्या या सगळ्या रामायणाचा त्रास आपल्या चिमुरड्यांना होत असतो.त्यातच परीक्षांचा काळ दत्त म्हणून ऊभा राहिलेला असतो एकूणच परिस्थिती आणीबाणीची असते.या सगळ्या घडामोडींपासून आपल्या कुटुंबाला ‘सुरक्षा कवच’आयुर्वेदाच्या माध्यमातुन देण्याचा प्रयत्न म्हणजेच या लेखाचा खटाटोप .
आयुर्वेदाचं नाव ऐकून “अरे बापरे ,आता काय कडू काढे ?असा प्रश्न मोठे मोठे डोळे करून विचारणाऱ्या माझ्या समस्त मित्रमैत्रिणींसाठी वसंत ऋतूसाठी खास आयुर्वेदाचा हटके अंदाज!
जाता खायचा खाऊ म्हणून फुटण्याचा समावेश करून कफाला bye bye म्हणता येईल.
दुधात थोडीशी सुंठ घालून या वसंत ऋतुसाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवता येईल.
नाष्ट्यामध्ये भाजणीची थालीपीठ,खाकरा,ज्वारीची ऊकडपेंडी,बाजरीचा शिरा,हुलग्याच्या शेंगोळ्या,लाह्यांच्या पिठाचा उपमा यासारखे पदार्थ खाण्यात आले तर या ऋतूतील आजारपणं खूप खूप लांब राहतील.
दुपारच्या snacks साठी वेगवेगळ्या लाह्या,popcorn,राजगिरा वडी, गोपाळकाला,लाह्यांचा चिवडा अशी variety तर सोन्याहून पिवळे.
कढण, कोबीचे सूप,दुधीभोळ्याचे सूप,शेवग्याचे सूप यांचा वापर केला तर साठलेला कफ पडून जाईल.
ज्वारी, बाजरी यांची भाकरी हा आपल्या main course चा भाग या दिवसांसाठी ठरवून करूयात.
शेवग्याची भाजी,शेवग्याचे सांबार,दुधीभोपळा,मेथी,गवार, कुळीथाची ऊसळ म्हणजे औषधांना पर्याय ठरेल.
सीताफळ,द्राक्षे, आईस्क्रीम पासून सध्या चार हातांचे अंतरच बरे.
नाक वहात असल्यास झोपताना हळदीचा धूर आणि नाक बंद झाल्यास ओव्यांचा धूर घेऊन Vicks,nasal drops यांना bye म्हणूयात.
समप्रमाणात एकत्र केलेली पूड छातीला व पाठीला talcum powder प्रमाणे लावून prevention is better than cure याची प्रचिती घेता येईल.
थोडक्यात वसन्त ऋतूचे हे Do’s and Don’ts लक्षात ठेऊयात आणि ‘हृदयी वसन्त फुलताना’ चा आनन्द घेऊयात
Leave a Reply