असं म्हणतात, वाताला मित्राप्रमाणे जिंकावे, पित्ताला जावयाप्रमाणे सांभाळावे आणि कफाला शत्रूप्रमाणे वागवावे.
वाताच्या पथ्यामधे सर्वात महत्वाचा आहारीय पदार्थ म्हणजे तेल.
आपण ज्या प्रदेशात रहातो, त्या प्रदेशातील तेलबियांपासून घाण्यावर काढलेले तेल, अनरिफाईंड तेल कच्च्या स्वरूपात जेवणात घेणे म्हणजे वाताची अर्धी चिकित्सा आहे.
हे तेल प्रदेशानुसार ठरवावे. जसे कोकणात खोबरेल तेल, घाटावर शेंगतेल, युपी मधे सरसोंका तेल, पण प्रदेश बदलून घेतलेले तेल पचायला जड होते.
अंगाला तेल लावले की, त्याला बाह्य स्नेहन, अभ्यंग म्हणतात.
आणि जेवणात वापरायचे ठरवले की ते होते, आभ्यंतर स्नेहन.
स्नेह म्हणजे तेल.
जेवणात आणि जीवनात हे कमी झालंय म्हणून रूक्षपणा, कोरडेपणा वाढलाय.
त्याला उतारा?
आतून बाहेरून स्नेहन. स्वेदन.
वात प्रकृतीच्या रुग्णांनी तेल तूप खाल्ले तरी कोलेस्टरॉल वाढत नाही. वाढणार नाही.
असे तेल कच्च्या स्वरूपात वापरत असताना वर गरम पाणी प्यावे. म्हणजे तेल पचायला सोपे जाते.
तेल वेगवेगळ्या प्रकारे का होईना, पण ते पोटात जावे यासाठी ग्रंथात तब्बल चौवीस प्रकार वर्णन केले आहेत. एवढे त्याचे महत्व लक्षात घ्यावे.
आताच्या माॅड मेडीकल नुसार तेल, तूप, नारळ, शेंगदाणे म्हणजे आरोग्याचे मोठे शत्रू.
काय दिवस फिरवले गेले आहेत पहा, जे उत्तम आहे ते जीवनातून आणि जेवणातून काढून टाकले आणि नको ती विषारी औषधे मरेपर्यंत घ्यायची सवय लावली.
नेहेमी नैसर्गिकरीत्या, आपोआप मलप्रवृत्ती साफ राहील यावर नीट लक्ष ठेवावे. नाहीतर परत वात वाढतो. कोणत्याही रेचक औषधांशिवाय ! पण जर काही चुकीच्या पथ्याने, विशेषतः जेवणातील तेलाचे प्रमाण कमी पडल्याने, वाताच्या आजारात, उतारवयाचा विचार करून, एखादे मृदु विरेचक औषध घ्यावे लागले तर घ्यावे.
“काय म्हणताय ?
संडासचे औषध रोज घ्यायचे ? अहो पण आमचे ते डाॅक्टर म्हणतात, संडासचं औषध घेऊच नये, त्याची सवय लागते म्हणे !”
“त्यांना सांगावं, म्हणावं, संडास साफ होणारं एखादे औषध निसर्गोपचार सल्ल्याने घेतल्यानंतर, आयुष्यभराची औषधं जर बंद होणार असतील तर काऽही बिघडत नाही.
हं, अश्या साध्या उपायांनी जर वात शांत झाला तर, हाॅस्पीटलची बिल मात्र कमी होतील, ( त्यामुळे डाॅक्टरांचं पित्त वाढेल ) हे मात्र नक्की !
— गौरी पाटील
निसर्गोपचार तज्ज्ञ
9820584716
Leave a Reply