वाहतो फुले माझ्या श्रद्धेची
तुझ्या चरणी हे विठूराया ……….
नसलो जरी वारकरी
भरली वारी नजरेत मी हे विठूराया …..
आलो नाही पंढरीला जरी
साठवलेय तुझ हृदयी हे विठूराया ….
नसलो जरी संत कोणी
तरी जाणलंय मी तुझ हे विठूराया …
ठेवण्याची मस्तक तुझ्या चरणी
एकदातरी इच्छा धरली मनी हे विठूराया …..
करोडो भक्त वेडे तुझ्या भक्तीचे
त्यातील समज एक वेडा मज हे विठूराया ….
दे दर्शन तुझ्या मुखाचे आयुष्यात एकदातरी
ही विनंती आषाढी एकादशीच्या दिवशी
तुझ्या चरणी हे विठूराया ……….
कवी
निलेश बामणे
— निलेश बामणे
Leave a Reply