मुक्या मनाने किती उधळावे शब्दांचे बुडबुडेतुझे पवाडे गातील पुढती तोफांचे चौघडे ।।१।।
चौघडे वाजवी अशाच काळी स्मशानशांत जनीजनसमान्यी मान्य पावती राव बहाद्दुर कुणी ।।२।।
स्वत्वाचा संदेश पोचवी लोकमान्य तो जनीसंदेशाचा प्रतिध्वनी तो तरुण विनायक कुणी ।।३।।
मॅंचेस्टरचे कापड जाळूनी भारत भू हालवी जॅक्सन, वायली नरकी लोटूनी आंग्लभूमी लोळवी ।।४।।
उठला आता टाकीत झेपा सह्य वनकेसरी तयाची आंग्लभूमीवरी उडीआणि निसटला जवळी येता मार्सेलीस बंदर हालवी स्वर्गभूमी सुंदर ।।५।।
तो विनायक आता गेला भेटाया बाजीराया मावळच्या तान्हाजीला शिवप्रभूस मुजरा द्यायाआता उरल्या फक्त कथा या देशभक्त वीरा प्रणाम घ्यावा माझा तुम्ही स्वतंत्रतेच्या तेजा ।।६।।
— जयंत वैद्य