‘वेदना ”
वेदनेशी असलेल नाथ कधीच तोडायच नसत,ते तुम्हाला तुमच्या अस्तित्वाची आणि पर्यायाने दुसर्याच्या दुःखाशी वेदनेन बघायला शिकवते |.
वेदना जगण्याचा भुत ,भविष्य ,विसरून वर्तमानासी एकरूप व्हायला शिकवते .स्वताच्या वेदना ,दुःख याच्यापलिकड़े असलेल्या तीव्र आणि भयानक सामाजिक वेद्नेशी नात जोडायला शिकवते ,जगन कधीच पूर्ण होत नसत ,जगण्याच्या मैदानात वेदनेच नाण अखंडपने खनानत असत क्षणभंगुर सुखाच्या शक्येतेचा संदेश घेउन .
जगण्याच्या संघर्षात जर कुणाच्या वेद्नेशी नात जोड़ता आल तर बघा ,आयुष्याचा एक काटेरी पण थक्क करणारा क्षण जगता येइल .
जगण्याच्या मैदानात सतत जिंकण्या, हरन्याच्या सवयी मुले जगण्याची मजाच विसरत चाललोय आपण .
खेळ,अभ्यास ,आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात खेळाडूं होवुन स्पर्धा करण्यापेक्षा मानुस बनुन आयुष्याचा आनंद लुटुया.
आयुष्याच्या छोट्या मोठ्या खेळामधे सतत खेळाडूं ,स्पर्धक होण्यापेक्षा कधीतरी प्रेक्षक होउन (जीवनाच्या ) खेळाचा मनसोक्त आनंद लुटुया,
जगन समृद्ध करुया .
@सतीष वाघदरे
Leave a Reply