नवीन लेखन...

वेळेची एक संकल्पना

 



वेळ ही एक हालचाल ( Movement ) समजली गेली आहे. वेळ कधीच स्थीर नसते. जगाच्या चक्राप्रमाणे ती फिरत असते. प्रत्येक हालचालीसाठी वेळ लागते. त्यामुळे वेळ व हालचाल अर्थात Time and Movement ह्या एकच समजल्या गेल्या. हे शारीरिक स्थरावर.

मानसिक स्थरावर ही संकल्पना वेगळी ठरते.

दोन प्रश्न आहेत. १) काय ?अर्थात काय असावे . २) कसे ? अर्थात कसे असावे.

स्वच्या ( Self ) वा मनाच्या ( Mind ) गरजा, वासना, इच्छा सतत “काय आहे”, हे जाणण्याचा प्रयत्न करुन, “कसे असावे” ह्या संकल्पनेंत जातात.

” काय आहे ” हे समजण्याने वासनेचे प्रश्न सुटत नाही. वासना ( Desire ) ही एक नैसर्गिक गुणधर्म जन्माच्या उपजत असते. “काय आहे ” ह्या विचारांत बदल होवून स्वतःसाठी, मनासाठी ” काय असावे ” हा विचार येऊ लागतो. म्हणजे ” काय असावे ” ही मनाची वा स्वतःची वासना. हा बदल, हा संघर्ष हाच स्वचा मुळ पाया आहे.

वासना ( Desire) व अहंकार (Ego ) हे मुळ निसर्गानी दिलेले स्वभाव आहेत. देहाच्या जगण्यासाठी, अत्यंत महत्वाचे गुणधर्म. ह्याच चैतन्यमय गुणधर्मामुळे कोणत्याही परिस्थितीवर मात करुन, देह अर्थात जीवन जगविले जाते. निसर्ग जे देऊ करतो, त्याला ” काय आहे ” ही समज असते. जे आहे तसे. हा त्याचा सरळ व सोपा अर्थ. हे जगण्यासाठी, जीवनासाठी पूर्ण असते. परंतु आमच्या वासनेला फाटे फुटून ” काय आहे” ऐवजी ” कसे असावे ” हा विचार पक्का होऊ लागतो. “काय आहे” मध्ये किमान गरज असते. परंतु ” कसे असावे ” ह्याला मर्यादा नसतात. निसर्ग देत असलेले “काय आहे” व देह मनाला ( Self ) वाटते ” कसे असावे ” हाच मुळ संघर्षनात्मक मुद्दा असतो. उदा. अन्न, पाणी, हवा, जमीन, इत्यादी निसर्गाने दिलेल्या आहेत. मानवाने त्या “कशा असाव्यांत” ह्या कल्पनेने अनेक बदल केलेत.

स्वचा ( Self ) दुसरा गुणधर्म म्हणजे इच्छा ( Will ). इच्छा होण्याची वा इच्छा बदलण्याची. इच्छा कांहीतरी होण्याची. इच्छा कांही तरी बदलण्याची. इच्छा होत जाणे, इच्छा बदलत जाणे. हा गुणधर्म. इच्छेला आम्ही लहानपणापासून जाणले असते. आमच्या वाढीत. मग ती आर्थिक, सामाजिक, वा धार्मिक असो. आमच्या ध्येयांत इच्छेचा सहभाग असतो. एका विचारावर दुसर्‍या विचाराने ताबा करणे, एका वैचारीक हलचालीवर दुसऱ्या वैचारीक हलचालीने ताबा मिळविणे हे इच्छा करते.

” मी माझ्या विचारावर ताबा मिळवला पाहीजे ” ह्यांत मी व विचार भिन्न आहेत. म्हणजे माझा संबंध विचाराशी असतो. तसे दोन्हीही एकरुप वाटतात. विचार म्हणजे ते ज्ञान ज्यांत आठवणी ( Memaries ) आणि ( Experiences ) अनुभव ह्यांची साठवण असते. एक विचार — हा सतत दुसर्‍या विचारावर ताबा करणे. (Control ) आकार देणे ( Shape ) अथवा अमान्य करणे (Deney ) ही क्रिया करीत असतो.

२ समजण्यासाठी थोडे भिन्न करु या. Self म्हणजे माझ्यांत मी वेगळा असून, जो सर्व गोष्टी बघतो, जाणतो, तो वेगळा Observer अर्थात बघणारा असतो. Observer जवळ म्हणजे बघणाऱ्याजवळ गेलेल्या, जमा झालेल्या आठवणी व अनुभव होय. हीच आठवणीची विचारांची साठवणूक.

मेंदू कार्य करुन प्रत्येक क्षणाची हलचाल अर्थात विचार यांची साठवणूक करतो. जसे प्रसंग, जसा अनुभव तशा विचार लहरी उत्पन्न होऊन ज्ञानेद्रियाच्या मार्फत मेंदूत जमा होतात. आणि साठवल्या जातात. वासना ( Desire ) आणि अहंकार ( Ego ) जे मुळ गुणधर्म आहेत, ते जीवला कर्म करण्यास चेतना देतात. तरी हे सर्व शरीर गुणधर्माप्रमाणे होत जाते. येथे ” मी ” म्हणजे स्वतः ह्या भागाची भूमिका नसते. ” मी ” फक्त उर्जा देण्याचे काम करतो. म्हणून ” मी ” वा स्वतः ( Self ) वेगळा आणि त्याच्या विचार लहरी, past, memories, experiences ह्या वेगळ्या. ज्याला आपण ( Observer ) बघणारा म्हटले आहे. ध्यान प्रक्रियेमध्ये हा Observer ( विचार शक्ती ) देहा मधल्या ( उर्जा शक्तिला –प्राणाला ) अर्थात Observer ला जाणण्याचा प्रयत्न करतो. मी स्तः ( Self ) आणि माझा देह ह्या भिन्न संकल्पना आहेत. मी ( I ) म्हणजे आत्मा आणि देहातील मेंदू, बुद्धी, मन हे घटक येतात. त्यामुळे देहाचे कार्य वेगळे, आत्म्याचे अर्थात मीचे भिन्न समजण्यासाठी “तू “चे कार्य म्हणजे देह बुद्धीचे कार्य. व “मी ” चे कार्य म्हणजे आत्म्याचे कार्य. आत्मा स्वतः कार्य करीत नसतो. तो फक्त प्राणरुपी चेतना देतो. यंत्रामधल्या विजेप्रमाणे.

म्हणजे माझी बुद्धी, मन, विचार हीच बघणारी Observer बनते. मी (I ) हा मलाच

( Me ) ला वेगळा करतो. मी मलाच बघतो.

माझा देह ( ज्यांत मन, बुद्धी, विचार, इत्यादीचा सहभाग आहे. ज्याला Observer म्हणजे बघणारा म्हटले आहे. हा कुणाला बघतो. तर मला स्वतःलाच. म्हणजे माझ्या प्राण शक्तीला. ज्याला आत्मा संबोधले आहे. म्हणजे मी मलाच बघण्यासारखे, जाणण्यासारखे आहे. कुणीतरी व्यक्ती आरशामध्ये स्वतःला बघतो. येथे आरशामुळे तो आपली छबी वा प्रतिमा आपणच बघत असतो. हे बाह्य झाले. मी ” आत ” कसा आहे, कोण आहे, याचे ज्ञान होणे हे देखील त्याच प्रमाणे म्हणजे आरशांत स्वतःची प्रतिमा बघण्या सारखेच आहेत. मी आणि आरशातील प्रतिमा वेगळ्या आहेत.तरी आपण म्हणतो की मीच मला ह्या अरशांत ( प्रतिमा रुपाने ) बघतो. जर देहांत देखील तशाच दोन प्रतिमा असल्याप्रमाणे आहेत. एक मी जो सर्व बघणारा. (Observer) आणि मला त्या बघीतल्या जाणाऱ्या observed प्रतिमेलाच बघायचे आहे. अर्थात जाणावयाचे आहे. ह्या Observed ला रंग रुप आकार नाही. त्याचे फक्त अस्तित्वच असते. ह्या अस्तित्वाला मला जाणावयाचे आहे. समजायचे आहे. म्हणजे त्या consciousness ला अनुभवायचे आहे. जेंव्हा एखादी गोष्ट वा घटना मी बघतो, त्याच वेळी मला ह्याची पुर्ण कल्पना असते. की तीच घटना वा गोष्ट माझ्या व्यतरिक्त कुणीतरी दुसरा देखील बघत असतो. आपण म्हणताना म्हणतोकी तो ईश्वर तेच बघत असेल. ईश्वर अर्थात अज्ञात शक्ती. माझ्या बाबतीत, सर्वांच्या बाबतीत ती शक्ती माझ्यामध्येच वास करते. ती हे सारे जाणते वा बघते. म्हणजे जे मी बघतो, जाणतो, हे त्या माझ्याच मधल्या अव्यक्त व्यक्तीलाही समजते. आता माझे प्रयत्न असेल की मी त्या माझ्यातच असलेल्या मला जाणणऱ्या शक्तीला बघायचे, जाणायचे, अनुभवायाचे आहे. मी मलाच हा जाणण्याचा प्रकार आहे. To experience the self consciousness or objectless awareness

३ एक ” स्व ” चा म्हणजे माझा गुणधर्म म्हणजे स्वतःलाच बघणे, जाणणे, हा. तोच बघणाराची भुमिका करतो. बघणारा म्हणजे Observer. ज्यानी बघीतले आहे. बघणारा म्हणजेच ज्यानी गेलेला काळ बघीतला. त्याचे साठलेले ज्ञान, आठवणी, अनुभव ह्या साऱ्या गोष्टी. मी ( I ) हा मलाच ( Me ) बघतो, जाणतो हे होते. जसे मी तुला बघण्याचा, जाणण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे माझ्यातला बघणारा ( Observer ) मलाच बघतो, जाणतो. एक साक्षी भावाने मीच मलाच समजण्याचा जाणण्याचा, अनुभवण्याचा, बघण्याचा प्रयत्न करतो. बघणारा मीच आणि द्दष्य देखील मीच. Observer आणि Observed मीच असतो. ह्याचाच अर्थ मी कोण आहे हा जाणण्याचा प्रयत्न.

जाणीव ( Awareness ) हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. आपण जे बघतले ते जाणणे. फक्त जाणणे महत्वाचे. ज्यांत तुमचे विचार, विश्लेशन, कल्पना,इच्छा ह्यांचा कोणतांच स्पर्ष नसावा. हे कठीण आहे. अशक्य देखील. कारण तुम्ही Observer असून जाणण्याचा प्रयत्न करणारे आहांत. आणि Observer म्हणजे बघणारा, म्हणजेच अनुभव, ज्ञान, आठवणी, यांचा साठा असलेला. असे तुम्ही जाणणारे फक्त जाणणारेच रहाल कां ज्या जाणण्यामध्ये फक्त जाणणेच ( Awareness ) असेल. बघणेच असेल. परंतु जाणणारा फक्त बघूच शकत नाही. कारण जे दिसेल ते त्याला जाणण्याचा प्रयत्न हा त्याच वेळी होईल. त्याच वेळी तुम्ही Observer व्हाल.

जाणणे ही ( Awareness ) मनाची अशी अवस्था होते की ज्यांत बघणाराला Observer ला दुसरा मार्ग नसतो. कारण त्यांत तुम्ही व्यवहार बघता. क्रिया देता. जे जाणता, जे बघता त्याला तसाच स्विकार करीत नसता.

“मी याचे काय करु ” ? ” हे मी बघीतल्या शिवाय कसा जाणू ” ? म्हणजे तुमची लगेच क्रिया सुरु होते. तुम्ही नुसते जाणणे मान्य करीत नाही. हे काय आहे, कसे आहे, हे जाणत बघण्याचा प्रयत्न होतो. जसे एका सुंदर, सुवासीक, मोहक फुलाचे. तुम्ही फूल बघता. झाडावरुन तोडता. सुवास घेता. त्याच्या पाकळ्या वेगवेगळ्या करीत विश्लेशनात्मक त्या फुलाला बघण्याचा आणि जाणण्याचा प्रयत्न करीतात. म्हणजे ते फुल जसे आहे तसेच न जाणता, तुम्हाला वाटणाऱ्या प्रश्नांची त्या फुलासंबंधी उकलन करण्याचा प्रयत्न होतो.

” ते काय आहे ” ? हेच बघणाऱ्यानी बघावे. परंतु जेंव्हा तुम्ही ” जाणता ” ( Aware ) त्यावेळी तुम्हाला वाटते ” ह्याच्याशी मी काय करु ” ? म्हणजे ते काय आहे, ह्यापेक्षा ते कसे असावे, ह्यांत तुम्ही गुंततात. फुल त्यातील ” सुवास Fragrance ” हेच एक सत्य असते. तेच फक्त अनुभवायचे असते. परंतु फुल काय आहे, सुवास काय आहे, ह्याच्या पासून तुम्ही दुर जाता. सत्य जाणण वेगळ आणि तुम्हाला काय वाटत हे वेगळ. येथेच तुम्ही ” परिस्थितीजन्य सदा संभ्रमी अवस्थेत राहता, हेच खरे ना ” ?

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail- bknagapurkar@gmail.com

विवीध-अंगी ***१४

ध्यान-साधने विषयी–

** ध्यानांत आमचे शरीर व मन शांत आणि केंद्रीत बनते. ज्यात मिळतो आनंद (Joy) , शांतता (Peace), आणि सहजता( Ease). आम्ही जाणीवेत श्वास घेवू शकतो. हे ध्यानांत व इतर वेळी देखील.

** श्वासोच्छासाच्या जाणीवेत (Awareness of breathing ) हे करणे शक्य आहे.

१. मी शरीर मनाला शांत करतो

Breathing in- I calm my body

२. विश्रांत होत चेहऱ्यावर स्मित उमटते

Breathing out- I smile

३. माझ्या बैठकींत मी विचाररहीत होतो

मी फक्त बसतो. जाणतो की मी कोठे आहे

Dwelling in the present movement

४ हा क्षण आनंदाचा (Joy) आहे. स्थिर (Stable) आहे. सहज ( Ease )आहे.

आणि आमच्यांत समावणारा आहे. आमचा श्वास आमच स्मित आणि नैसर्गिक सत्य

I know this is a wonderful moment

** श्वासोच्छास घेताना आम्ही म्हणू-

शांतता — Calming

स्मित, आनंद — Smiling

हा क्षण — Present Moment

विस्मयकारक क्षण — Wonderful moment

** आत ( In ) — बाहेर ( Out )

दिर्घ (Deep

) — हलके ( Slow )

शांत ( Calm ) — सहज ( Ease )

स्मित (आनंद) ( Smile ) — आराम ( विश्रांत वा मुक्त) ( Release)

आताचा क्षण ( Present moment ) — विस्मयकारक क्षण ( Wonderful moment )

हे सहजगत्या व सदैव अनुभवावे, बसता, उठता, चालता, अथवा कोणतेही कार्य करता

— डॉ. भगवान केशवराव नागापूरकर

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..