व्यक्ती आणि समाज परस्परपूरक असायला हवेत कारण ही राष्ट्राची दोन तोंडे आहेत. व्यक्तीने समाजासाठी, समाजाने राष्ट्रासाठी चांगल्या गोष्टी केल्या तरच त्या राष्ट्राची प्रगती होऊ शकते. दोघांपैकी एकानेही आततायीपणा केला की राष्ट्राचे नुकसान होऊ शकते. या संदर्भात भारुड पक्ष्याचे उदाहरण देता येईल. एका मोठ्या सरोवरामध्ये भारुड पक्षी राहतात. त्याला दोन तोंडे होती, मात्र शरीर एकच होते. एकदा भारुड पक्षी सरोवराच्या काठावर आला असता, जवळच्या झाडावरून एक फळ खाली पडले. एका तोंडाने ते लगेच उचलले व ते तो खाऊ लागला. ते फळ फारच मधुर होते, त्यामुळे फळ खाताना ते पहिले तोंड म्हणाले, ” मी आजपर्यंत एवढे सुमधुर फळ खाल्ले नाही. ” ते ऐकून दुसऱ्या तोंडालाही ते फळ खाण्याची इच्छा झाली. त्याने पहिल्या तोंडाला ते फळ देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर पहिले तोंड त्याला म्हणाले, की आपल्या दोघांचे पोट एकच आहे त्यामुळे मी खाल्ले तरी ते याच पोटात जाणार आहे, असे म्हणून त्याने ते संपूर्ण फळ एकट्यानेच खाऊन टाकले.पहिल्या तोंडाच्या अशा वागण्यामुळे दुसऱ्या तोंडाला फार राग आला. त्याने पहिल्या तोंडाला धडा शिकवण्याचा निश्चय केला. दुसऱ्या दिवशी भारुड पक्षी फिरत असताना दुसऱ्या तोंडाला एक फळ सापडले. ते फळ फारच विषारी होते. दुसऱ्या तोंडाने ते खाण्यास सुरुवात केली, त्यावर पहिले तोंड त्याला म्हणाले, की, अरे हे फळ विषारी आहे ते पोटात गेल्यास आपण दोघेही मरून जाऊ. मात्र दुसऱ्या तोंडाने त्याचे म्हणणे मुळीच ऐकले नाही. त्याला पहिल्या तोंडाला धडा शिकवायचा होता. तो म्हणाला, ‘ ‘मी हे फळ खाणारच. तू मला सांगणारा कोण?” असे म्हणून त्याने ते संपूर्ण विषारी फळ खाल्ले. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला व थोड्याच वेळात भारुड पक्षी मरून पडला. एका तोंडाने वाईट हेतूने आततायीपणा केल्याचे फळ त्याला मिळाले होते.
Be the first to comment
महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची
रायगडमधली कलिंगडं
महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...
टिटवाळ्याचा महागणपती
मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...
Leave a Reply