व्यथा वार्धक्याची
नको नको ते लाजिरवाणे जगणे आता आम्हालाअर्थही नसतो असल्या भेकड दुबळ्या जीवनाला
दुखणे खुपणे चालू असते त्याची कटकट सगळ्यांनाअसुनी अडचण सदा वाटते घरच्या सर्वही लोकांना
गरजे पुरते जवळी येतील ठाऊक आहे आम्हालाप्रेमाचा तिथ शब्दही नसतो वा मायेचा ओलावा
आम्ही भुकेले प्रेमासाठी नातवंडे ती भूक पुरवितीअंधारातील प्रकाश तारे उजळविति जीवन गगनाला
अनिल आपटे
— अनिल आपटे
Leave a Reply