हिवाळ्यात आपण ड्राय स्किनसाठी व्हॅसलिनचा वापर करतो. परंतु या एका व्हॅसलिनचा उपयोग अनेक प्रकारे करु शकतो. फक्त पध्दती बदलावी लागेल.
रात्री झोपण्या अगोदर पापण्यांवर व्हॅसलिन लावून झोपा. तुम्हाला विश्वास बसणार नाही परंतु तुमच्या पापण्या लांब आणि दाट होतील. रात्री झोपताना पायाला व्हॅसलिन लावून झोपा आणि त्यावर सॉक्स घाला. सकाळ पर्यंत तुमचे पाय सॉफ्ट होतील. तुमच्या कोपरांवर रोज नियमित व्हॅसलिन लावा. तेथील स्किन सॉफ्ट राहिल. दिवसातुन अनेक वेळा तुमच्या नखांवर व्हॅसलिन लावत राहा. काही दिवसातच तुमचे नखे सॉफ्ट आणि शायनी दिसू लागतील. ड्राय ओठांवर व्हॅसलिन लावल्याने ओठ सॉफ्ट होतात.
व्हॅसलिनचा उपयोग तुम्ही लिप ग्लॉसम्हणून सुध्दा करु शकता. थोडेसे व्हॅसलिन घेऊन तुम्ही आवडत्या कूल-एड पावडरमध्ये मिक्स करु शकता. तुमचा फेव्हरेट लिप ग्लॉस तयार होईल. मायक्राव्हेवमध्ये एक चॉकलेट बाइट आणि थोडेशी व्हॅसलिन मेल्ट करा. आता हे मिक्स करुन घ्या. तुमचा चॉकलेट लिप ग्लॉस तयार आहे. परफ्यूमचा सुंगध दिर्घकाळ टिकवून ठेवायचा असल्यास सर्वात अगोदर व्हॅस्लीन लावून घ्या आणि त्यावर परफ्यूम स्प्रे करा. पिंपल्सची समस्या असेल तर व्हॅसलिनचा उपयोग करणे फायद्याचे असते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply