नवीन लेखन...

व. पु. ची अशीच एक भन्नाट कविता

माझं घर तसं तीन खोल्यांचेच होतं- आजोबांपासून नातवापर्यंत भरलेल होत

पोपट, कुत्रा, मांजरांनाही मुक्तद्वार होतं- घरादाराला कधीही ’लॉक’  नव्हतं..

तरीही माझ जीवन सुखाच होत ||१||

आजोबांच स्थान घरात सर्वोच्च होत- स्वयंपाकघर आजीच्या ताब्यात होत,

पाहुण्यांचे येणे-जाणे नित्याचेच होत- आई-बाबांना एकमेकांशी बोलताही येत नव्हत..

तरीही माझ जीवन सुखाच होत ||२||

घरासमोर छोटंसं अंगण होत- तुळस, प्राजक्ताला तिथे फुलता येत होत,

दारात रांगोळी काढणे अनिर्वाय होत- विहिरीवरून पाणी भरण कष्टाचं होत,

तरीही माझ जीवन सुखाच होत || ३ ||

आंघोळीला लाईफ़बॉय साबण असायचा, माणसापासून म्हशीपर्यंत सगळ्यांनाच चालायचा,

दात घासायला कडुलिंबाचा फ़ाटा लागायचा- दगडाने अंग घासण फ़ारस सुसह्य नव्हतं

तरीही माझ जीवन सुखाच होत || ४ ॥

पायात चप्पल असण सक्तीच नव्हतं- अंडरपॅट बनियनवर फ़िरण जगन्मान्य होतं

शाळेसाठी मैलभर चालण्याच अप्रूप नव्हतं- मोठ्यांना सायकलशिवाय दुसर वाहन नव्हत..

तरीही माझ जीवन सुखाच होत || ५ ॥

शाळेत गुरुजनांप्रती आदर होता- घोकंपट्टीला दुसरा पर्यायच नव्हता,

पाढे पाठांतराचा आग्रह सर्वत्र होता- छडी हे शिक्षकाचं लाडक शस्त्र होतं..

तरीही माझ जीवन सुखाच होत || ६ ॥

शाळेत गरीब श्रीमंत हा भेदभाव नव्हता, –नादारी सांगण्यात काही संकोच नव्हता,

अंगणात येवून शिकणाराही एक वर्ग होता –  कलांना “भिकेचे डोहाळे” असच नाव होते,

तरीही माझ जीवन सुखाच होत || ७ ॥

नव्या कपड्यांचा लाभ लग्न-मुंजीतच व्हायचा – पाटाखालच्या इस्त्रीला पर्याय नसायचा, 

शाळेचा युनिफोर्म थोरल्याकडूनच मिळायचा – तिन्हीसांजेला घरी परतणे सक्तीच होते,

तरीही माझ जीवन सुखाच होत || ८ || 

वळचणीत चिमण्यांच्या पिढ्या नांदायाच्या – पोपटांचा थवा झाडावर विसावायचा,

कुत्रा, मांजर, डुकरानी गाव भरलेला असायचा – उंदीर, डास, ढेकुण यांचे सार्वभौम्या राज्य होत..

तरीही माझ जीवन सुखाच होत || ९ ||

पुस्तकातले प्राणी अचानक रानात दिसायचे – घाबरगुंडी उडाली तरी ते आपलेच वाटायचे,

उरलेले प्राणी नंतर पेशवेपार्कात भेटायचे – नौनवेज खाण हे तर माहितीच नव्हत,

तरीही माझ जीवन सुखाच होत || १० ||

शाळेत अभ्यासाला खूप महत्व होते- नंबरावर बक्षीस/छड्या यांचे प्रमाण ठरत असत, 

कॉपी, गाईड, क्लासेसना स्थानही नव्हत – वशिल्याने पास होण माहितीच नव्हत,

तरीही माझ जीवन सुखाच होत || ११ ||

गावची जत्रा  हीच एक करमणूक असायची – चक्र – पाळण्यात फिरण्यात मजा मिळायची, 

बुढ्ढीके बाल, गाठीशेवेची तोंडलावणी व्हायची – विमानातला फोटो काढण चमत्कारिक होत,

तरीही माझ जीवन सुखाच होत || १२ ||

गावाबाहेरच जग हिरवागार असायचं – सगळ्या नद्यांचे पाणी स्वच्छच असायचे, 

पावसाळ्यात ढगांनी आकाश भरायचं – प्रदूषण, पर्यावरण वगैरे माहितीच नव्हत,

तरीही माझ जीवन सुखाच होत || १३ ||

  

हुतुतू आट्यापाट्याचा खेळ गल्लीत चालायचा – क्रिकेटच्या मैचेस चाळीत व्हायच्या,

बापू नाडकर्णी, चंदू बोर्डेच्या गोष्टी रंगायच्या –  डे-नाईट, ट्वेंटी- २० चे नावही नव्हते,

तरीही माझ जीवन सुखाच होत || १४ ||

प्रवास झालाच तर एस्टीनेच व्हायचा – गचके, ठेचकाळणे याला अंत नसायचा,
ह्ँनडल सोबत फिरकीचा तांब्याही लागायचा – लक्झरी, फर्स्टक्लास एसीच नावही नव्हत,

तरीही माझ जीवन सुखाच होत || १५ ||

दिवाळी खर्या अर्थाने दिवाळी होती – चमन चिडी, पानपट्टी, भुईनळ्या यांची रात होती,

रंगीत तेल, उटणे, मोती साबणाची ऐश होती – लाडू, चकल्या, करंज्या यांचे दर्शन वार्षिकच होत..

तरीही माझ जीवन सुखाच होत || १६ ||

जुनाट रेडिओतून आकाशवाणी बरसायाची – बिनाका गीतामालेने बुधवारची रात्र सजायची,

रेडीवो सिलोनने तारुण्याची लज्जत वाढायची – ताई, नाना हरबा यांच्या इतकाच बालोद्यान असायचा,

तरीही माझ जीवन सुखाच होत || १७ ||

खाण्याच्या बाबतीत भेदभाव केला जायचा – दादाच्या ताटात जास्त शिरा पडायचा,

पानात टाकणार्याच्या पाठीत रट्टा बसायचा – हौटेलात जाणं तर पूर्ण निषिद्ध होत,

तरीही माझ जीवन सुखाच होत || १८ ||

मामाच्या गावाला कधी जाणं-येण होत – धिंगामस्ती करायला नैशनल परमिट होत,

विहिरीत पोहायला तिथेच मिळत होत – भावूबिजेला आईच्या ताटात फारस पडत नव्हत,

तरीही माझ जीवन सुखाच होत || १९ ||

घरातले पुरुष कर्तेसवरते असायचे – बायांना दुपारी झोपणे माहिती नसायचे,

पोराबाळाना गोडधोड सणावारीच मिळायचे – प्रायव्हसीला तिथे काडीचंही स्थान नव्हत,

तरीही माझ जीवन सुखाच होत || २० ||

पाव्हणे रावळे इ चा घरात राबता असायचा – सख्खा, चुलत, मावस असा भेदभाव नसायचा,

गाववाल्यानाही पंक्तीत सन्मान असायचा – पंक्तीत श्लोक म्हणण मात्र सक्तीच होत,

तरीही माझ जीवन सुखाच होत || २१ ||  

आज घराऐवजी लक्झुरीयस फ्लेट आहे – मोपेड, स्कूटर, मोटारचा सूळसुळाट आहे, 

टीव्हीवर शंभर वाहिन्यांचा दनदणाट आहे – फास्टफूड, पार्ट्या, ड्रिंक्स याना सन्मान आहे,

कौटुंबिक सुसंवादाची मात्र वानवा आहे || २२ ||

आज मुलांसाठी महागडी शाळा-कॉलेजेस आहेत – दूध, बूस्ट, कोम्प्लानचा भरपूर मारा आहे,

क्लास, गाईड, कैल्क्यूलेटरची ऐशच ऐश आहे – कपडे, युनिफोर्म. क्रीडासाहित्य हवे तितके आहे,

बालकांच्या नशिबी मात्र  पाळणाघर आहे || २३ ||

आज पतीला ऑफिसात मरेस्तोवर काम आहे – सुशिक्षित पत्नीला करियरचा हव्यास आहे,

एक्स्ट्रा ऐक्टीविटीजना घरात सन्मान आहे – छंद, संस्कार यांच्यासाठी क्लासेस उपलब्ध आहे,

आजीआजोबाना वृद्ध आश्रमाचा रस्ता मोकळा आहे || २४ ||

आज घरात प्रचंड आर्थिक सुबत्ता आहे – मागेल ती वस्तू क्षणात हजार होते आहे,

इन्स्टालमेंट, क्रेडीट कार्डचा सूळसुळाट आहे – सध्या बायवान गेटवनचा जमाना आहे..

म्हणून

पैशावर  समाधान फ्री मिळण्याची मी वाट पहात आहे, 

पैशावर  समाधान फ्री मिळण्याची मी वाट पहात आहे.. || २५ ||

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..