शहद जीने का मिला
करता हैं थोडा थोडा
जानेवालो के लिये
दिल नही तोड़ा करते
आपल्यापैकी अनेकांनी ही गझल ऐकली असेल.जीवनाचे तत्त्वज्ञान सहज सोप्या साध्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला आहे यात.यातील शब्द फक्त प्रियकर/प्रेयसी(मितवा) साठी नाही.थोडे बारकाई ने पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल की ही गोष्ट जीवनात प्रत्येक ठिकाणी लागू पडते.
जे हातचे गमावले त्याबद्दल माणसाला हुरहुर नि हळहळ वाटावी आणि जे हातात आहे त्याचे योग्य मोल मात्र त्याला करता येऊ नये.हा निसर्गाचा मनुष्याला एकप्रकारचा शापच आहे.
बस एक परिक्षा,नाही आले अपेक्षित मार्क्स,नाही आलो आपण मेरिट लिस्ट मध्ये,सोबतच्या मित्रांसोबत नाही झालो आपण क्लास वन.म्हणून काय प्रयत्न सोडून द्यायचे?एवढ्याशा गोष्टीने माघार घ्यायची?बस हरलो आता आपण,आपली लायकी नाही नाही ही परिक्षा पास होयची असा न्यूनगंड करुन घ्यायचा?
आशाभंगासारखे जगात दुसरे दु:ख नाही हे जरी खरे असले तरी जीवनात स्वप्न पाहण्याचा आनंदही आहे आणि स्वप्नभंगामुळे होणारा विषादही आहे.पण भावनांवर ताबा नसेल तर आपण कधीच सुखी होणार नाहीत.
रॉबर्ट केनडी म्हणतात,ज्यांच्या अंगी मोठ्यात मोठे अपयश पचविण्याची ताकद असते, त्यांनाच मोठ्यात मोठे यश मिळविता येते.आणि तुमचा दृष्टीकोण तर चांगला आहे.समाजसेवेसाठी तुम्ही या क्षेत्राकडे वळला आहात.थॉमस जेफरसन नेहमी म्हणत,”योग्य मानसिक दृष्टीकोण असलेल्या मनुष्याला त्याच्या ध्येयापासून कोणीही रोखू शकणार नाही.
त्यामुळे विद्यार्थी मित्रहो,या दु:खातून बाहेर या.अजून खुप काही करण्यासारखे आहे आयुष्यात.आनंदाने जीवन गाणे गात-गात पुढे-पुढे जा.मनुष्य जळत राहिला तर त्याला दिवसा अथवा रात्री कधीही विश्रांती लाभणार नाही.
शेवटी एकच सांगेल,ना तर मी तुम्हांला पेटून उठायला सांगणार आहे,ना लढायला सांगत आहे.बस्स तुम्ही जे स्वप्न पाहिले आहे.त्यासाठी जगा.स्वत:वर प्रेम करा. आपल्या स्वप्नांवर प्रेम करा.मग बघा तुम्ही कसे कामाला लागतात..
नोकरी मिळविण्यासाठी अभ्यास करु नका.ती तर अशिक्षित मुलांना ही मिळते.गरज म्हणून अभ्यास करा,आवड आहे म्हणून नको.आपली आवड तर नेहमी बदलत राहते.आज पूजा तो कल कोई और दूजा.जसे शरीराला रोज अन्नाची गरज आहे.तसे आपल्याला अभ्यासाची गरज आहे.
महान विचारवंत सॉक्रेटिस म्हणतात,” जेव्हा तुम्हांला एखाद्या गोष्टीची नितांत गरज असते.तेव्हा ती मिळविण्यासाठी तुम्ही काहीही करु शकतात.आयुष्यात कोणतेही ध्येय असू दे,ते मिळविण्यासाठी दुर्दम्य इच्छा असेल तर ते ध्येय कितीही कठिण असले तरी अप्राप्य कधीच नसते..
आपल्या अभ्यासांच्या पुस्तकांवर आजच लिहून ठेवा,’Im your Big Fan’,पहा मग ते पुस्तक तुमच्यावर किती प्रेम करते.
धन्यवाद..
— दीपक गायकवाड
Khoop aawadale.
धन्यवाद
Thank you for motivating us…
धन्यवाद