– जायफळ तुपात उगाळून तयार केलेला थोडासा लेप निजण्यापूर्वी हळूहळू कपाळावर चोळल्यास गाढ झोप येण्यास मदत मिळते.
– पाव चमचा जटामांसी आणि पाव चमचा धमासा चार-पाच तासांसाठी पाण्यात भिजत घालून ठेवून झोपण्यापूर्वी गाळून घेतलेले पाणी प्यायले तर डोके शांत होऊन झोप लागणे सोपे होते.
– ज्यांच्या प्रकृतीला वांगे चालत असेल त्यांनी वांगे भाजून घ्यावे, ते थंड झाले की त्यात मध मिसळून खाण्याने झोप येण्यास मदत मिळते.
– रात्री झोपण्यापूर्वी टाळूवर तेल, कानात श्रुती तेलासारखे तेल, नाकात घरी बनविलेले साजूक तूप किंवा नस्यसॅन घृत टाकण्यानेही शांत झोप लागण्यास मदत मिळते.
– नियमित अभ्यंग तसेच पादाभ्यंग सुद्धा शांत झोपेसाठी साहायक असतात.
– शांत करण्यासाठी संगीताचाही चांगला उपयोग होतो. विशेषतः ‘योगनिद्रा’सारखे शास्त्रीय पद्धतीने विशिष्ट राग व स्वरांचा वापर करून तयार केलेले संगीत व संपूर्ण शरीराला शांत करणाऱ्या सूचना यांचा समन्वय असलेले तंत्रही झोप येण्यास मदत करते. याच्या नियमित अभ्यासाने झोपेची गोळी घ्यायची लागलेली सवयही सुटते असा अनेकांचा अनुभव आहे. भारतीय शास्त्रीय संगीतातील खमाज, दरबारी, तोडी, भैरवी अशा रागांवर आधारित संगीतरचना ऐकल्याने शांत झोप येण्यास मदत मिळते.
– शांत करणारी, मेंदूला शामक अशी काही औषधेही असतात. ब्राह्मी, जटामांसी, मंडूकपर्णी वगैरे वनस्पतींपासून तयार केलेले सॅन रिलॅक्स सिरपसारखे सिरप रात्री झोपण्यापूर्वी घेतल्यास मन शांत होऊन झोप लागते. मानसिक अस्वास्थ्यामुळे व असंतुलनामुळे झोप येत नसल्यास ब्राह्मी स्वरसाचे नस्य, क्षीरधारा, शिरोधारा, शिरोबस्ती वगैरे उपचार करून घेतल्यासही फायदा होतो.
Leave a Reply