नवीन लेखन...

शायर निदा फाजली

होशवालों को खबर का, आ भी जा ए सुबह आभी जा… या गाजलेल्या गजलांचे शायर सुप्रसिद्ध उर्दू शायर निदा फाजली.त्यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९३८ रोजी झाला.निदा फाजली यांचे पिता मुर्तुज़ा हसन हे सुध्दा कवी होते. त्यांचे बालपण ग्वालियरमध्ये गेले होते. तेथेच त्यांनी आपले शिक्षण पुर्ण केले त्यानंतर ते शायरीकडे वळाले. देशाच्या फाळणीवेळी कुटुंबीयांसोबत पाकिस्तानात न जाता, भारतातच राहण्याचा निर्णय घेणाऱ्या निदा फाजली यांनी ग्वाल्हेर कॉलेजमधून पदव्युत्तर पदवी घेतली होती. सूरदास यांच्या एका कवितेनं प्रभावित होऊन त्यांनी शायर व्हायचं ठरवलं होतं आणि प्रतिभेच्या जोरावर त्यांनी साहित्यक्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण केलं होतं. मा. निदा फाजली यांच्या कविता म्हणजे, आयुष्याच्या प्रत्येक परिघातून दु:खाला अन् वेदनेला छेदणारी अनुभूती होती. एकदा मा.निदा फाजली गंभीर आजारी पडले होते, त्यांना रुग्णालयात भरती केले होते. त्यांच्या आजारपणाची बातमी त्यांच्या चाहत्यांना बेचैन करून गेली. याच चाहत्यात एक नाव होतं राजकोटच्या सह्वीस वर्षे वयाच्या मालती जोशींचे ! ह्या देखील पेशाने गायिका होत्या. त्या एका कार्यक्रमानिमित्त मुंबईला आल्या होत्या आणि त्यांना निदांच्या आजारपणाबद्दल कळले. त्या अस्वस्थ झाल्या आणि निदांना भेटायला गेल्या. या भेटीचे रुपांतर मैत्रीत आणि पुढे जाऊन नात्यात झाले. त्यांनी लग्न केले. निदांच्या अखेरच्या क्षणापर्यंत मालती जोशी त्यांच्या सावलीसारख्या सोबत होत्या. त्यांना एक मुलगीही झाली. निदांनी तिचं देखणं नाव ठेवलं, ‘तहरीर’ ! म्हणजे लेखनशैली, लेहजा !

त्यांचे अनेक गझला, शायरी गाजल्या. त्यातलीच, ‘कभी किसी को मुकम्मल जहां नहीं मिलता’ या गझलेनं लोकप्रियतेचं शिखर गाठलं. ‘सरफरोश’मधील ‘होशवालों को खबर क्या…’ ही तरुणाईच्या ओठांवर रुंजी घालणारी गझलही निदा फाजली यांच्या लेखणीतूनच साकारली होती. मा.निंदा फाजली यांच्या ‘खोया हुआ सा कुछ’ या काव्यसंग्रहासाठी १९९८ मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. भारत सरकार ने पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले होते. मा.निदा फाजली यांचे ८ फेब्रुवारी २०१६ रोजी निधन झाले.

निदा फाजली यांचे काही शेर
क्याम हुआ शहर को कुछ भी तो दिखाई दे कहीं, यूं किया जाए कभी खुद को रुलाया जाए
घर से मस्जि द है बहुत दूर चलो यूं कर लें, किसी रोते हुए बच्चेद को हंसाया जाए

अपनी मर्जी से कहां अपने सफर के हम हैं,
रुख हवाओं का जिधर का है उधर के हम हैं

अब खुशी है न कोई दर्द रुलाने वाला
हम ने अपना लिया हर रंग जमाने वाला

इस अंधेरे में तो ठोकर ही उजाला देगी
रात जंगल में कोई शम्म जलाने से रही

कुछ भी बचा न कहने को हर बात हो गई
आओ कहीं शराब पिएं रात हो गई

कभी किसी को मुकम्मरल जहां नहीं मिलता
कहीं जमीं तो कहीं आसमां नहीं मिलता

कोई हिंदू कोई मुस्लिनम कोई ईसाई है
सब ने इंसान न बनने की कसम खाई है

कोशिश भी कर उम्मीेद भी रख रास्ताई भी चुन
फिर इस के बाद थोड़ा मुकद्दर तलाश कर

खुदा के हाथ में मत सौंप सारे कामों को
बदलते वक्तथ पे कुछ अपना इख्तिककार भी रख

तुम से छूट कर भी तुम्हें भूलना आसान न था
तुम को ही याद किया तुम को भुलाने के लिए

संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

प्रसिद्ध मराठी कवी लोकनाथ यशवंत यांनी फाजलींच्या अद्वितीय कालातीत कवितांचा अनुवाद मराठी भाषेत केला आहे.

कवितासंग्रहातील ‘शर्त’ या पहिल्याच कवितेत
तुम्हाला सैन्यात भर्ती व्हायचं आहे?
जरूर व्हा
मात्र लक्षात असू द्या
युद्धाच्या वेळी तुमचा देश जे म्हणेल तेच सत्य असेल
आणि त्या ‘सत्या’साठी
तुम्हाला तुमच्या जीवाशी खेळावं लागेल
तुमच्या मित्रांची
आणि शत्रूंची यादी राजकारण्यांसोबत बदलत राहील.
युद्ध संपल्यानंतर
तुम्ही अमर शहीदही होऊ शकता
किंवा महामूर्खही!!

‘शहरा माझ्यासोबत चल तू’ या कवितेत फाजली म्हणतात-
शहरा,
माझ्यासोबत चल तू
ओरडणाऱ्या, लढणाऱ्या, झगडणाऱ्या
कर्फ्यू, नारे
यांच्या बाहेर निघ तू
तुझ्या शुष्क डोळ्यांत
भरली आहे रेती

वाटते तू अनेक वर्षांत झोपला नाहीस…
या कवितेतून शहरी संघर्षाचे वास्तव्य टिपलेले दिसून येते. कुठलेही शहर असो, दिवसाच काय रात्रीही आपले कार्य बजावत असते अविरत. रात्रंदिवस एक करणाऱ्या शहरात ओरडण्याचा आणि झगड्याचा कायम कर्फ्यु असतो. स्वत:च्या हक्कासाठी नारे असतात. मात्र, माणूस झोपत नाही. माणसांचं संवेदनशील मन मरतं अन् जागृतही होतं. माणसाच्या शक्तीतील फॉस्फरस भरून गेला आहे आता. त्यामुळे तो कधी रडत नाही अन् दचकतही नाही. त्याला प्रचंड आत्मविश्वास असल्यामुळे मोर्चे, जलसे आणि तमाशा नित्याचेच झाले आहे.
‘आत्महत्या’ या कवितेत ते म्हणतात –

काय खूप माणूस होता तो,
खूपच जोरदार तो म्हणायचा –
आईच्या अंधाऱ्या उदरापासून
तर स्मशानापर्यंत एकच रस्ता आहे
ज्यावर आपण चालत आहोत
चाकावर स्वार होऊन झिजत आहोत
आयुष्यभर गुंतत गेला तो स्वत:च्या आतच आत
प्रत्येक क्षणी नवा प्रश्न आणि जगणं कठीण.
संकुचित विचार करणं त्याला आवडत नव्हतं.

माणूस एकदा जन्माला आला की, त्याच्या मृत्यूच्या प्रवासाला प्रारंभ होतो. मृत्यू हा अटळ असतो. आईच्या अंधाऱ्या उदरापासून स्मशानापर्यंतचा तो रस्ता असतो. आयुष्यात ज्यांना संघर्षाची प्रार्थना करता येत नाही. तो स्वत:मध्ये गुंतत जातो. स्वत:मध्येच जळत असतो. आपल्या भावनांना वाट मोकळी करण्यास ‘स्पेस’ त्याचेजवळ नसते. त्यामुळे प्रत्येक क्षणात नवे प्रश्न अन् जगणे कठीण होते. संकुचित विचार करणे त्याला जमत नसतानाही आत्महत्येच्या टोकापर्यंत जावे लागते, ही मानवी शोकांतिकाच नाही तर काय?

सहज सोप्या कवितांमधून जीवनाचे तत्त्वज्ञान निदा फाजली यांनी मांडले आहे. वेगवेगळ्या प्रतिमा आणि प्रतीके वापरून उजेडवाटाही दाखविल्या आहेत. ‘ईश्वराच्या या दुनियेला ईश्वरच जबाबदार आहे’ असा प्रवास या काव्यसंग्रहातून दिसून येतोय. युद्ध, प्रार्थना, अब्रू, एकात्मता, सत्य, इलाज, आत्महत्या, मी आज झगडलो, हे रक्त माझं नाही, वडिलांच्या मृत्यूवर, माणसाचा शोध, पासपोर्ट अधिकाऱ्याच्या नावाने, सीमेपलीकडचं, एक पत्र वाचून…, एका उद्ध्वस्त गावाची कथा, मृत्यूचा कालवा, मुंबई, लढाई, बस असेच जग राहा, इथेही आणि तिथेही यासारख्या दर्जेदार कविता वाचकांना अंतर्मुख केल्याशिवाय राहात नाहीत.

माणसात राक्षस आहे
इथेही आणि तिथेही
इश्वर रक्षक आहे
इथेही आणि तिथेही
हिंस्र राक्षसांची
फक्त नांव वेगवेगळी आहे

या कवितेतून मानवाच्या धार्मिक प्रवृत्तीचे दर्जेदार विवेचन करण्यात आले आहे. पृथ्वीवरील लोकांना स्वर्ग, जन्नत ही आयुष्याच्या अंतानंतरची दुसरी आनंदयात्रा वाटतेय. पण, माणूस माणसाजवळ असला तर कधी संवेदनशील तर कधी संवेदनाहीन होतो. तात्पर्य, माणसाला सुख कुठे मिळतेय, याचा शोध स्वत:ला घ्यावा लागणार आहे. एकीकडे टोकाची विषम स्थिती तर दुसरीकडे सम संख्येचा बाजार आज मानवालाच हिणवताना दिसतो. ठेच लागलेला माणूस आणि सुटबुटात वावरणारा माणूस भिन्न पातळीवर दिसून येतो. मनाचा आरसा कुणाला म्हणावा- माणूस धर्म धर्म करतोय, पण स्वत:चे मुडदे पाडतो आणि स्वकेंद्रित विचार करतोय. हे इथेही आणि तिथेही सुरू आहे का? हा प्रश्न वाचकाला ठिकठिकाणी वाचायला मिळतोय. देशाच्या फाळणीमुळे ज्यांचे मनोविश्व उद्ध्वस्त होऊन जाते, अशा अगणित सहृदांना हे पुस्तक लोकनाथ यशवंत यांनी अर्पण केले आहे. चित्रकार संजय मोरे यांची निर्मिती असलेला मुखपृष्ठावरील मानवी मुखवट्यांचा सुबक चेहरा पद्धतशीर वाचकांचे लक्ष वेधण्यात यशस्वी होतो. मात्र, हाच मुखवटा कवितेचे वेगळेपण सांगून जातोय. मा.निदा फाजली यांच्या काव्यावर प्रेम करणाऱ्या मराठी वाचकांसाठी वाचनीय असा हा संग्रह आहे.

माणूस बेजार इथेही आणि तिथेही
मूळ कविता: निदा फाजली
अनुवाद: लोकनाथ यशवंत
प्रकाशक: सृजन प्रकाशन, नवी मुंबई.

संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..