आई – बाबांनी आम्हास जीवन दिले
पण जीवन कसे जगावे तुम्ही शिकविले …
आई- बाबांनी आम्हास जेवणाचे ताठ वाढून दिले
ते जेवण कसे आणि किती खायचे तुम्ही शिकविले …
आई – बाबांनी आम्हास संस्कार दिले
पण ते संस्कार कसे टिकवायचे तुम्ही शिकविले …
आई – बाबांनी आम्हास मोठे होताना पाहिले
पण तुम्हीच खऱ्या अर्थाने आम्हास मोठे केले …
आई- बाबांनी ही आमच्याकडे किंचित स्वार्थी अपेक्षेने पहिले
पण तुम्हीच सारे आमच्यासाठी निस्वार्थीपणे केले …
स्वामी तिन्ही जगाचे आई- बाबापुढे झुकले
ते आई – बाबाही आमच्यासाठी तुमच्यापुढे झुकले…
कवी
निलेश बामणे
— निलेश बामणे
Leave a Reply