जय देव, जय देव, जय जय शिवराया ।
या, या अनन्य शरणां, आर्या ताराया ॥ धृ ॥
अर्थ :- हे शिवराया तुझा जयजयकार असो.
तुझ्याशी अनन्य शरण झालेल्या आर्यांचे (भारतीयांचे) तारण करण्याकरता, त्यांच्यावरील आलेल्या संकटांचे निवारण करण्याकरता तु ये. (धृवपद)
आर्यांच्या देशावरी म्लेच्छांचा घाला ।
आला आला सावध हो शिवभूपाला
।
सदगदीता भूमाता दे तुज हाकेला ।
करुणारव भेदूनी तव हृदय न का गेला ॥१॥
:- या आर्यभूमीवर इस्लामचे आक्रमण आले आहे त्या मुळे हे भूमीच्या पालनकर्त्या शिवराया तू सावध हो. सद्गतित कंठाने ही भूमाता तुजला आळवत आहे. हा करुणाघन असा आवाज तुझे हृदय भेदून टाकीत नाही काय ? (१)
श्रीजगदंबा जी तव शुंभादीक भक्षी ।
दशमुख मर्दूनी ती श्रीरघुवर संरक्षी ।
ती पूता भूमाता, म्लेंच्छा ही छळता ।
तुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता ॥२॥
:- शुंभ निशुंभ यांचे निर्दालन करणारी ही जगन्माता. दशानन रावणाचे मर्दन करुन या जगदंबेचे रक्षण श्रीरामांनी केले. असे सपूत ही भारत माता प्रसवली. अशी ही भारतमाता इस्लामच्या छळाने गांजून गेलेली आहे. हे शिवराया तुझ्या शिवाय दुसरा तारणहार या मातेला कोण आहे बरे ?
त्रस्त आम्ही दीन आम्ही, शरण तुला आलो ।
परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो ।
साधुपरित्राणाया, दुष्कृती नाशाया ।
भगवन भगवदगीता सार्थ कराया या ॥३॥
:- अतिशय त्रस्त झालेले आम्ही दीन लोक तुझ्या शरणास आलेलो आहोत. पारतंत्र्यामुळे आम्हाला मरणकळा आलेली आहे. संत सज्जनांच्या संरक्षणाकरता दैत्यांच्या नाशाकरता परमेश्वर अवतार घेतो असे गीतावाक्य आहे. श्रीकृष्णाचे हे वाक्य सार्थ ठरवण्याकरता हे शिवराय तुम्ही या. (३)
ऐकुनिया आर्यांचा धावा गहिवरला ।
कर
ुणोक्ते स्वर्गी श्री शिवनृप गहिवरला ।
ुणोक्ते स्वर्गी श्री शिवनृप गहिवरला ।
देशास्तव शिवनेरी घेई देहाला ।
देशास्तव रायगडी ठेवी देहाला ।
देश स्वातंत्र्याचा दाता जो झाला ।
बोला तत् श्रीमत् शिवनृप की जय बोला ॥४॥
:- आर्यमंडळाचा पृथ्वीवरील धावा ऐकून स्वर्गाधिष्ठीत तो शिव राजा गहिवरुन
गेला. या देशासाठीच तो शिवनेरी गडावर जन्म घेता झाला अन् देशासाठीच रायगडावर देह ठेवता झाला. या देशाला स्वातंत्र्य प्रदान करता झाला.
अशा शिवराजाचा जयजयकार करा. बोला, छत्रपती शिवाजी महाराज की जय ! (४)
– स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (१९०२ -पुणे )
— स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
Leave a Reply