आमच्या भारतातअनेक आदर्श परंपरा कोणताही गाजावाजा न करता वर्षानुवर्षे अविरतसुरू आहेत. उदात्त हेतुने सुरू झालेल्या परंपरांचा कार्यकारण भाव नव्या पिढीला सांगता येत नसला तरी, चिकीत्सक वृत्तीने अभ्यास केल्यास त्याचे महत्व लक्षात येईल. “देणार्याने देत जावे, घेणार्याने घेत जावे, घेणार्याने एके दिवशी देणार्याने, हातघ्यावे.” हया काव्य पंक्तींचा प्रत्यय आणु न देणारा आणि दानाची परंपरा अविरत सुरू ठेवणारा मौजा वासाळामेंढा ता.नागभीड, जि.चंद्रपुर (महाराष्ट्र) येथील श्रावणी सप्ताह एक जीवंत उदाहरण होय. प्रत्यक्ष अन्नदान करून दानाचा पाठ सांगणार्या वासाळामेंढा गावाची लोकसंख्या फक्त ९५० (आबालवृद्ध) एवढी आहे. स्वातंत्र्य पूर्वकाळात बागल नावाच्या जमिन दाराच्या अधिपत्या खाली असल्याने या गावाला बागलमेंढा नावानेही ओळखले जाते. जमीनदाराच्या वरवंटयाखाली भरडल्या गेलेल्या या गावातील लोकांची आर्थिक स्थिती सामान्यच आहे. वासाळामेंढा येथे १५० ते २०० वर्षापासुन श्रावणी सप्ताहसुरू आहे, या सप्ताहाच्या काळात हनुमान मंदीरात घटस्थापने पासुन सतत सातदिवस अखंड टाळमृदंगाचा गजर सुरू असतो. हे हनुमान मंदीर सुरूवातीला लाकडी वासे आणि गवताच्या छपराचे होते, कालांतराने कौलारू छप्पर आणि आता सिमेंट काँक्रीटमध्ये रूपांतरीत करण्यात आले आहे. सप्ताह समाप्तीच्या दिवशी पाच ते सहा हजार लोकांना भोजन दान दिले जाते. भोजनासाठी लागणारे धान्य व पत्रावळी ग्रामस्थ स्वतः मंदीरात पोहचवितात, गावामध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तीला आग्रहाने भोजन करविले जाते. या कार्यक्रमाला लागणार्या एकुण खर्चाचे मुल्यांकन मनुष्यबळासह एक लक्ष रूपयापर्यंत असते.
हया श्रावणी सप्ताहाला व्यापक स्वरूप आणण्याचे श्रेय ह.भ.प. श्रीकिसन लहू गायकवाड (ह.भ.प. दोडकुजी महाराज कोर्धा यांचे शिष्य) यांना जाते. वारकरी परंपरा जपणारे किसनजी गायकवाड आणि तुकाराम मनुजेंगठ यांनी लोकांमध्ये आध्यात्म रूढ करण्यासाठी मोलाचे काम केले. यामुळे गावामध्ये अनेक वारकरी निर्माण झालेत, याच कारणाने वासाळामेंढा गावाला बुवाचा मेंढा (संतांचा) या नावानेही ओळखले जाते. श्रावणजी भाकरे, निवृत्ती मोना शेंडे, सुकरूजी गायकवाड, दामोधर स.हजारे, दया रामडु. टेकाम, मुखरू मं. सोनुले, वामन नागोसे, नारायण गो.गायकवाड, विश्वनाथ भाकरे, ऋषीगावतुरे, एकनाथ गावतुरे ही मंडळी आजही वारकरी परंपरा जपत आहेत. किसनजी गायकवाड यांच्या बाबत अशी आख्यायिका सांगीतली जाते की, सुरूवातीला ते शिकारीहोते. गावा शेजारील जंगलात शिकार करतांना, प्रणयधुंद व काममग्न हरणाचे जोड पेकिसनजींच्या हातुन मारले गेले. या जोडीतील नर लींग बाहेर ठेवूनच गतप्राण झाले, हे दृश्य बघीतल्या नंतर किसनजींच्या मनावर दुरगामी परीणाम झाला, उरलेले आयुष्य आध्यात्म आणि परोपकार यासाठी जगण्याचा निश्चय करूनच घरी परतले. त्या क्षणा पासुन शिकारीला रामराम ठोकुन, आध्यात्माची कास धरली. तुकाराम जी जेंगठे हयांनी भारतातील हरीद्वार, ऋषीकेश, बद्रीनाथ, काशी, प्रयाग, रामेश्वरम्, जगन्नाथपुरी, पंढरपुर, देहु, आळंदी, त्र्यंबकेश्वर अशा विविध तिर्थस्थळांची यात्रा केली, यात्रे दरम्यान त्यांनी रामेश्वरम् येथुन एक शिळा आणली व मंदीरात ठेवली. ही शिळा पाण्यावर तरंगते, पाच ते दहा हजार वर्षां पुर्वी प्रभु श्रीरामाने समुद्रावर बांधलेल्या सेतुचा पुरावा देत मंदीरात आहे. ज्यांना दर्शन घ्यावयाचे आहे, त्यांनी वासाळामेंढा हनुमान मंदीराच्या विश्वस्तांच्या परवानगीने बघावे.
असे प्राचीन संदर्भ आणि त्यांना जपणार्या प्राचीन परंपरा जिथे आजही सुरू आहेत त्या गावाला, व त्या सुरू करणार्या महात्म्यांना कोटी कोटी दंडवत प्रणाम !!!
— नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश
Leave a Reply