सातारा तालुक्यात धावडशी हे छोटेसे गाव आहे. या गावातील १५ शेतकर्यांनी एकत्र येऊन गावातील विहिरी जोडण्याचा नवा विचार मांडला. सर्वानुमते योग्य नियोजन होऊन विहिरी जोडण्याचा निर्धार पक्का झाला. पाऊसकाळात पावसाचे प्रमाण चांगले असले तरी उत्तरेकडील मेरूलिंगच्या डोंगराकडील शेती पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असते. पावसाळा संपल्यावर शेतीसाठी जाणवणारे
पाण्याचे दुर्भिक्ष संपविण्यासाठी या तरूणांनी विचार करण्यास सुरुवात केली. सातार्यातील सामाजिक कार्येकर्ते डॉ.अविनाश पोळ यांचे मार्गदर्शन त्यांना मिळू लागले. गावातील पोलीस पाटील ज्योतिराम पवार आणि त्यांच्या सहकार्यांनी पुढाकार घेतला आणि विहिरी जोडण्याचे काम सुरू झाले.सुरुवातीला या कामाला एकमुखी पाठिंबा मिळाला नाही. पण तरुणांनी प्रयत्न सुरू ठेवले. आपल्या विहिरीत पाणी आहे, आपले भागते, पण इतरांना ते का द्यायचे, असा प्रश्न येथे उपस्थित झाला. तरीही अतिरिक्त पाणी इतरांना देण्याची मानसिक तयारी तरुणांनी करून घेतली. जलवाहिनी ज्या दिशेने जाणार, त्या परिसरातील १५ शेतकरी खातेदारांनी या विचाराला मान्यता देऊन आपला सहभाग नक्की केला. कागदावरची योजना प्रत्यक्षात आणायला सुरुवात झाली.गावातील ओढय़ानजीक दोन विहिरींत पाण्याचे प्रमाण इतर विहिरींच्या तुलनेत चांगले होते. जसजसे डोंगराकडे जाल तसतसे विहिरीतील पाण्याचे प्रमाण कमी-कमी होत होते. जुन्या तळ्यातील पाणीही वाहून ओढय़ाला जायचे. हे वाया जाणारे पाणी आणि आजूबाजूच्या कूपनलिकांचे अतिरिक्त पाणी ओढय़ाजवळील दोन विहिरींमध्ये घ्यायचे. या दोन विहिरींपासून डोंगराच्या दिशेने जलवाहिन्या टाकून त्यातील पाणी कमी पाणी असणार्या विहिरींमध्ये टाकायचे. तेथून ते गरजेप्रमाणे शेतकर्यांना द्यायचे. असे धोरण या तरुणांनी अवलंबिले.विहिरी जोडण्याच्या य
ा नाविण्यपूर्ण उपक्रमाच्या यशस्वीतेमुळे गावातील सहभागी शेतकर्यांना पाण्याचा समान पुरवठा होऊ लागला. या उपक्रमाच्या यशस्वीतेनंतर कोरडवाहू क्षेत्र बारमाही होणार आहे, १५० ते २०० एकर क्षेत्रांत बारमाही पिके घेण्याची क्षमता निर्माण करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे गावातील ८४ शेतकर्यांना पाणी मिळणार आहे. या पाण्यामुळे आंबा,
सीताफळ अशी फळबाग लागवड होण्यासही मदत होणार आहे. तसेच वांगी, भेंडी, मिरची व इतर भाजीपाला उत्पादन वाढण्यासही मोलाची मदत होणार आहे. सोयाबीन, घेवडा, आले, भुईमूग, भात, ज्वारी, गहू, हरभरा या पिकांच्या क्षेत्रात निश्चित वाढ होईल. पाण्याच्या उपलब्धतेमुळे या परिसरात झेंडू, ग्लॉडिओलसची फुले बहरणार असल्याने गावातील शेतकरी सुखावला होता. इतर शेतकरीही या उपक्रमाचे अनुकरण करण्यास पुढे येऊ लागले आहेत.
— बातमीदार
Leave a Reply