नवीन लेखन...

शेतीचे दिवस पालटत आहेत….



  ज्याकाळी या देशात सोन्याचा धूर निघत होता, त्या काळी उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी, हे सूत्र इथे मान्यताप्राप्त होते. शेतीला सर्वोच्च दर्जा दिल्यानेच या देशात सोन्याचा धूर निघण्याइतपत समृद्धी होती, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. नंतरच्या काळात मात्र सगळे गणितच उलटेपालटे झाले. समृद्ध शेती भिकेकंगाल झाली, शेतीचा मालक पै पैसाठी मोताद झाला, परिस्थिती इतकी विकोपाला गेली की शेवटी शेतकर्‍यांना आत्महत्या करण्याची वेळ आली. काळाचे चक्र उलटेफिरल्यामुळे, ज्याच्या घरी सदैव लक्ष्मी नांदायची तो दरिद्री नारायण झाला. ज्याच्या घरी दुध-दुभत्याचा राबता होता, त्याचीमुले-बाळे कोरभर भाकरीसाठी आणि घोटभर दूधासाठी तरसू लागली. हा काळाचाच महिमा म्हणावा लागेल. काळाचे हे सूडउगविणे अद्यापही संपलेले नाही. आजही शेतकर्‍यांच्या नशिबातला अंधार दूर झालेला नाही; परंतु अलीकडील काळात कुठेतरीआशेचा किरण दिसू लागला आहे. शेती आणि शेतकर्‍याला पुन्हा तेच जुने वैभवाचे दिवस परत दिसतील, अशी आशा निर्माणहोऊ लागली आहे. शेतमालाला बाजारात चांगला भाव मिळण्याचे दिवस पुन्हा येत आहेत. विशेषतः फळभाज्यांच्या किमतीज्याप्रकारे वाढत आहेत ते पाहता शेतकर्‍यांनी आपली शेती पद्धत थोडी बदलली तर तेवढ्याच कष्टात तो खूप अधिक पैसा मिळवू शकतो, हे दिसून येत आहे. अर्थात शेतकर्‍यांच्या या उत्थानाला उर्वरित समाजाचा म्हणावा तसा पाठिंबा मिळत नाही, ही खेदाची बाब आहे. कांदा, टोमॅटो, भाजीपाला वगैरेंच्या किमती थोड्या वाढल्या आणि शेतकर्‍यांना घामाचा दाम मिळू लागला कीलोकांमध्ये, विशेषतः सरकारी नोकर किंवा मध्यमवर्गीय लोकांमध्ये ओरड सुरू होते. भाजीपाल्यांची ही वाढती किंमत चुकविण्याची ज्यांची सहज ऐपत आहे, किंबहूना ज्या मंडळींना महागाई भत्ता मिळतो असे लोकच विनाकारण ओरड करून शेतक
्‍या च्याहक्काच्या उत्पन्नात खोडा घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. लोकांना या सगळ्या कृषीमालाच्या किंमती आज अधिक वाटत आहे, याला

कारण हेच आहे की आजपर्यंत

हा सगळा माल अक्षरशः कचर्‍याच्या भावाने विकल्या जात होता. आज भाववाढीविरूद्ध ओरड करणार्‍या सगळ्यांनीच आजपर्यंत शेतकर्‍यांची एकप्रकारे लुटच केली आहे. शेतीमालाला आजपर्यंत कधीही योग्य भावमिळत नव्हता, मिळू दिला जात नव्हता आणि त्यामुळेच आज मागणी पुरवठ्याच्या नियमानुसार थोडा योग्य भाव मिळूलागताच, महागाईच्या नावाने बोंबा मारायला सुरूवात झाली आहे. पूर्वी लोक एखादी वस्तु फारच कमी किमतीत कुणी मागतअसेल तर सहजच, काय “भाजीपाला” समजलात की काय, असे विचारायचे. एखाद्याचे क्षुल्लकत्व दाखवून देण्यासाठी ‘भाजीपाला‘ हा शब्दप्रयोग सर्रास केला जायचा. आता तशी हिंमत कुणी करणार नाही. आज आणि यापुढे कोणताही भाजीपाला ‘भाजीपाला‘ म्हणून विकला जाणार नाही, त्याची योग्य ती किंमत ग्राहकांना चुकवावीच लागेल. तात्पर्य शेतकर्‍यांचे दिवस पालटायला सुरूवात होत आहे; परंतु त्यासाठी शेतकर्‍यांनीही अधिक डोळसपणे शेती करणे गरजेचे आहे. बाजारात कोणत्या मालाची मागणी अधिक असू शकते, कोणत्या मालाला कोणत्या “सिझन” मध्ये चांगला भाव मिळू शकतो, याचा योग्य अंदाज करूनच आपल्या शेतात त्या त्या मालाचे उत्पादन शेतकर्‍यांनी करणे गरजेचे आहे. आपली परंपरागत ज्वारी, गहू, बाजरी, तांदळाची शेती करणे त्यांनी सुरूच ठेवले तर त्यांचे मरण निश्चित आहे. कारण हा सगळा माल गरीबांना दोन-तीन रूपये किलोने विकण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे हमीभाव कितीही फुगविला तरी या पिकांच्या उत्पादनातून शेतकर्‍यांच्या पदरी फारसे काही पडणार नाही; आणि शेतकर्‍यांनीही नेहमी ज्वारीच का पेरायची? ज्वारी ऐवजी पेरणीच्या वेळी बियाणे निवडताना थोडी अक्कलहुशारी वा
परून ज्वारीऐवजी हुरडा पेरला तर कितीतरी अधिक उत्पन्न मिळू शकते. आज बाजारात हुरड्याचा भाव २०० रूपये किलो, म्हणजेच २०००० हजार रूपये क्विंटल आहे. १०० किलो हुरडा सुकवून त्याची ज्वारी केली तर तिचे वजन ५० किलोच भरते आणिज्वारीचा भाव बघता २०००० रूपयांच्या हुरड्यात फक्त ५०० ते १००० रूपयांची ज्वारीच हाती लागते. वीस पट अधिक उत्पन्नदेणारा हुरडा पिकवायचा की परंपरेचे गुलाम होऊन ज्वारीच्याच मागे लागायचे, हे शेतकर्‍यांनी ठरविले पाहिजे. शिवाय हुरड्याचे पिक घेतले तर शेत एक महिना आधी खाली होते, जनावरांना हिरवी वैरण मिळते आणि त्यामुळे त्यांचे दूध वाढते ते वेगळेच. सांगायचे तात्पर्य आज फायद्याची शेती करायची असेल तर शेतकर्‍यांना आपला संपूर्ण दृष्टीकोन बदलणे गरजेचे आहे. शेतीखर्चिक होते ती रासायनिक खते, बियाणे आणि किटकनाशकामुळे; हा खर्च शून्यावर आणायचा असेल तर शेतकर्‍यांनीदुग्धव्यवसाय वाढविणे गरजेचे आहे. म्हशी किंवा जमलेच तर चांगल्या गाई ठेवा, गायीपासून दूध भलेही कमी मिळत असले किंवा त्याचा भाव कमी मिळत असेल तर चक्क त्यापासून तूप तयार करा व ते औषधीसारखे विका. त्याचा भाव अगदी ६००/- रुपये ते १८०० रुपये किलोपर्यंत मिळतो. शिवाय गाईमुळे बैलांची उपलब्धता वाढेल. आज चांगल्या बैलजोडीची किंमत लाखावर गेली आहे आणि चांगली देशी गाय ३० हजाराच्या खाली मिळत नाही. शिवाय या जनावरापासून मिळणारे शेण शेतकर्‍यांच्यारासायनिक खतांचा खर्च कमी करू शकेल. एकदा शेतात गावरान शेणखत पडले तर खर्चिक रासायनिक खते वापरण्याची गरजच उरत नाही, शिवाय रोगराईला आपोआप आळा बसतो, तो वेगळाच! रासायनिक खतांच्या पाठोपाठच किटकनाशके येतात.त्यामुळे किटकनाशकांचा खर्चही वाचेल आणि खर्च वाचणे म्हणजेच नफा वाढणे हे सूत्र आहे. ‘नेटशेड‘चा

वापर करून शेतकरीचांगले उत्पन्न मिळवू शकतात. १० गुंठ्याच्या शेतात ३ लाखाचे ढोबळी मिरचीचे किंवा फुलांचे पिक घेतल्या गेल्याची अनेकउदाहरणे आहेत. असे प्रयोग शेतकरी करू शकतात आणि सरकारी अनुदानामुळे त्याला फारसा खर्च येत नाही. त्यासोबतचआपल्या मालाच्या विक्रीचे योग्य तंत्र शेतकर्‍यांनी आत्मसात करायला हवे. माल पोत्यात भरून विकायचा की नगाने विकायचा हे आम्हाला ठरवावे लागेल. आमच्या शेतात आम्ही

मधूमक्का पेरला, दलालाला विचारले तर त्याने ३ रूपये कणीस

सांगितले, तो भाव ऐकून सरळ आम्ही निशांत टॉवरसमोर ती कणसे विकायला ठेवली तर ती १० रुपयाने विकल्या गेली. एकूण काय तर केवळ उत्पादनाच्या बाबतीत सजग राहून चालणार नाही, विक्रीचे गणितदेखील त्याने समजून घ्यायला हवे. शेतीचे दिवस पालटत आहेत, परंतु तुम्हाला डोळसपणे वाटचाल करावी लागेल. मजूरांचा खर्च वाचविण्यासाठी छोटी-छोटी यंत्रे/अवजारे/उपकरणे आणणे आणि मजूरीवरचा खर्च कमी करणे, तसेच काही कारण नसताना शहरात राहून खर्चिक जीवन जगण्यापेक्षा शेतावर राहून कष्ट करणे व व्यत्त*ीगत लक्ष देणे, अशा छोट्या छोट्या गोष्टी केल्या पाहिजे. आज जगात सगळ्या गोष्टींचे उत्पादन वाढले आहे.; परंतु उत्पादक जमिनीचे प्रमाण मात्र दिवसेंदिवस कमी होत आहे. औद्योगिकीकरणामुळे, घर बांधण्यामुळे, रस्ते बांधकाम, तर कुठे रासायनिक खतामुळे किंवा अमेरिकेने आपल्या विरूद्ध छेडलेल्या जैविक युद्धामुळे (गाजरगवत आणि वेड्या बाभळीमुळे) उत्पादक जमिनीचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे एक दिवस असा येणार आहे की ज्याच्यावर गवताचे पाते उगवत नाही ती जमिनसुद्धा दोन ते पाच लाख रूपये एकराने विकली जाईल, ज्यात पाणी आहे अशी जमीन २५ लाख रुपये एकराने विकली जाईल. जे शेतकरी किंवा त्यांची मुले नादान, कपाळकरंटे, अदूरदृष्टीचे, आळशी, व्यसनी असतील तेच जमीन विकतील,
ाणे असतील ते असलेल्या जमिनीपैकी थोडी जमीन लागवडीसाठी भाड्याने देतील, तर उर्वरित दोन-तीन एकर जमीन स्वतःच कसतील. त्यात नेटशेड, पॉली हाऊस, डेअरीसारखे प्रकल्प लावतील. येणारे दिवस असेच राहणार आहेत की ज्याच्याकडे शेती असेल त्यालाच आपल्या भुकेची काळजी नसेल, इतरांना मात्र टिचभर पोटासाठी भरभक्कम पैसे मोजावे लागतील. विदेशात आजच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, भारतातही ती येणार आहेच. त्यामुळे शेतकर्‍यांनी वेळीच डोळस व्हावे, आपल्या मुलांना आजूबाजूला डोळसपणे बघायला, ज्ञान घ्यायला पाठवावे, नवे नवे तंत्र आत्मसात करावे, बाजारपेठेचे गणित समजून घ्यावे, हजार लीटर पाणी देणारे बोअर असेल किंवा नसेल तर टँकरने पाणी आणून शेती करणे परवडेल, असे दिवस येणार आहेत आणि ते शेतकर्‍यांना परवडेल कारण ठिबक सिंचनचे वरदान! आमच्या अकोट जवळ असलेल्या चितलवाडीचा एक शेतकरी आहे, विजय इंगळे, त्याने तर आपल्या शेतातील ठिबकचा दहावा वाढदिवस मोठ्या समारंभाने साजरा केला. त्याचे म्हणणे एकच, म्हातारपणात मुले तोंडात पाणी टाकतील की नाही हे सांगता येत नाही, परंतु हे ठिबक माझ्या तोंडात दरवर्षी पाणी टाकत आहे. भावना अशी पाहिजे, दहा वर्षांपूर्वी विकत घेतलेला ठिबक संच वापरत आहे आणि पुढेही दहा वर्षे तो वापरत राहणार आहे, ही त्याची जिद्द आहे. विजय इंगळेची डेअरी प्रत्यक्ष जाऊन बघावी अशीच आहे, तो जनावरांचे अगदी मूत्रसुद्धा वाया जाऊ देत नाही. १ते २ लाख लीटर जनावरांचे मूत्र त्याच्याकडे जमिनीखाली खोदलेल्या टाकीत कायमजमा असते. ते मूत्र तो ७० एकर शेतीला, ठिबक संचाच्या माध्यमातून देतो, म्हणजेच नत्राचा पुरवठा करतो. संपूर्ण घर शेतीवर राबते. ७०-८० एकर शेतीच्या पाण्याचे व्यवस्थापन तो एकट्याने करतो. अभ्यासू लोकांनी त्याची शेती एकवेळ प्रत्यक्ष जाऊन बघावी. शेतकर्‍यांनी काय बघावे, थोडी वाट बघावी, कळ सोसाव
, आत्महत्येचे विचार झटकून टाकावे, चार हजाराचा कापूस १५ दिवसात सहा हजारावर गेला, तुरीचे भाव वाढले. मी मागेदेखील सल्ला दिला होता की सोयाबिन पेरू नका, परंतु अनेकांनी सोयाबिन पेरले आणि आज ते कमालीचे पस्तावत आहेत. सांगायचे तात्पर्य शेतकर्‍यांनी आता डोळसपणे विविध पिकांचा विचार करायला हवा. त्यात हळद, अद्रक, लसूण, भाजीपाला आणि त्यातही फळ भाजीपाला, पालेभाज्या नव्हे; कारण पालेभाज्या नाशवंत असतात, अशा भरघ स आणि खात्रीचे उत्पन्न देणार्‍या पिकांचा प्रयोग किमान एकवेळ तरी करून पाहायला हरकत नाही. शेतकर्‍यांना मी पुन्हा आवाहन करतो, आजूबाजूला २००-४०० किमी. फिरून या, इतर शेतकर्‍यांची भेट घ्या, नाविन्यपूर्ण शेती करणार्‍यांची शेती बघा; परंपरागत मानसिकतेतून बाहेर या आणि आपली शेतीदेखील गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, सोयाबीन या परंपरागत पद्धतीतून बाहेर काढा. थोडी वेगळी वाट चोखाळण्याची, थोडे धाडस दाखविण्याची गरज आहे. एक किलो कच्च्या मालातून शंभर किलो पक्का माल करणारा कोणताही उद्योग जगाच्या पाठीवर नाही आणि कधी अस्तित्वातही येऊ शकणार नाही. ही किमया केवळ शेतीतूनच साधली जाते, हे शेतकर्‍यांनी लक्षात घ्यावे. थोडी प्रयोगशिलता, थोडी दूरदृष्टी, थोडी व्यापारीवृत्ती आणि थोडीशी प्रक्रिया करण्याची तयारी दाखविली तर शेतीसारखा प्रचंड नफा देणारा उद्योग दुसरा कोणता असू शकत नाही. शेवटी अमेरिकेतला मोठा उद्योजक असो, अथवा भारतातला एखादा गरीब असो, प्रत्येकाची अत्यंत प्राथमिक गरज पोटाची भूक हीच आहे आणि ही भूक भागविण्याचे सामर्थ्य केवळ शेतीत आहे. लोकांच्या भुकेची इतकी मोठी बाजारपेठ उपलब्ध असताना शेतकर्‍यांनी हातपाय गाळून बसण्याची गरजच नाही! त्या भुकेला जर थोडी बहूत प्रक्रिया करून चव मिळवून दिली, तर चमत्कार घडू शकतो. हुरडा भाजून घ्यायला, वांग्याचे भरीत आणि ज्वारीची भाकर कराय
ा; डाळीला फोडणी तर मिरची ठेचायला कुठलेही तंत्रज्ञान लागत नाही तर हवी असते थोडी कल्पकता व कुटुंबाची साथ; ही साथ मिळवायची की भांडणात आयुष्य घालवायचे हे ज्याचे त्यांनी ठरवायचे आहे.

— प्रकाश पोहरे

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..