<शेत<माझे
<सावल्यांची दाट जाळी हे शेत माझे
<मेघ मनी पावसाळी हे शेत माझे
<श्वेदबिंदूंची आरती हे शेत माझे
<मनभावनांची भरती हे शेत माझे
<कुण्या अप्सरेची काया हे शेत माझे
<मायमाऊलीची
माया हे शेत माझे
<अर्ताहुनी आर्त बोल हे शेत माझे
<अभंगवाणीपरी खोल हे शेत माझे
<न संपणारा लांब रस्ता हे शेत माझे
<राबणाऱ्यांचा शिरस्ता हे शेत माझे
<संजीवनी सरिता हे शेत माझे
<रानकवीची कविता हे शेत माझे
— गजानन मुळे
Leave a Reply