शेल्टर आर्केड हौसिंग सोसायटी लिमिटेड , प्लॉट नं. २६, सेक्टर ४२, सीवूड्स (पश्चिम) नेरूळ , नवी मुंबई. सीवूड्स मधील सर्वच रहिवाशांना परिचित असलेली हि सोसायटी आहे. आणि सर्वच रहिवाशांना माहित असेल कि या सोसायटीमध्ये बहुसंख्य मुस्लीम समाज जास्त प्रमाणात आहेत. त्यामानाने हिंदू किंवा इतर धर्मीय अल्प् संख्यांक आहेत. हा लेख लिहिताना माझा असा कोणताही हेतू किंवा उद्देश नाही कि जेणेकरून हिंदू किंवा मुस्लीम यांच्या मधील दरी निर्माण व्हावी, व एका देशातच नव्हे तर एका सोसायटीत राहून एकमेकाबद्दल गैरसमज किंवा वाद निर्माण होतील असे लिखाण करणे. परंतु प्रत्येक वेळी आम्ही जे अनुभवतोय किंवा भोगतोय त्याबद्दल माहिती देणे व यातून सर्वांनी काहीतरी चांगला किंवा योग्य असा पर्याय सुचवावा कि जेणे करून हिंदू मुस्लीम वादाचा उगम किंवा सुरवात आमच्या पासून होऊ नये.
खर तर मी हिंदू किंवा मुस्लीम किंवा कोणत्याही धर्माचे प्रतिनिधित्व करत नाही नव्हे तसा माझा मानस हि नाही. कारण मी केवळ एकच धर्म मानतो व तो केवळ मानवता (माणुसकी) किंवा त्यापुढे जावून सांगावेसे वाटते तो एक धर्म म्हणजे केवळ भारतीय, खर तर धर्म म्हणजे काय ? याबाबत माझे विचारच असे आहेत कि माणसाला एकत्रित राहण्यास योग्य व सर्वांचे हित होईल अशी आचारसंहिता,. जसा कि भारत देश एक आहे त्यातील कायदे सर्वांच्या हिताच्या दृष्टीने हितकारी आहेत. मग आम्हाला त्याबद्दल संशय का ? किंवा ते पाळण्यास आम्ही एवढे उदासीन का ? कारण आहे सर्वांचे मानवनिर्मित धर्म, मग आमचे पूर्वांपार आलेले धर्म म्हणजे जात होय केवळ जात हाच शब्द येथे योग्य वाटतो कारण धर्म कधीच कोणाचा मत्सर किंवा द्वेष शिकविणार नाही कारण त्याचे संस्थापक इतक्या निकृष्ट प्रतीचा विचार करणारच नाहीत . जसे कि मोहमद पैगंबर, येशू, शंकराचार्य , भगवान बुद्ध , महावीर जैन , गुरु गोविंद सिंग किंवा झुलेलाल असोत अजूनही धर्म गुरु किंवा धरम संस्थापक असतील पण त्यांचा विचार किंवा धर्माची कल्पना जेवढी पवित्र होती त्याचा हल्लीच्या जाती पाती वरील अधारित धर्माचे नक्कीच काहीही देणे घेणे नसावे . भाई चारा सर्वाना हवा पण तो आमच्या साठी इतरांनी करावा अशी वृत्ती प्रत्येक जात – पात मानणा-यांची बनली आहे. अविचाराने किंवा ख-या धर्माचा सार न समजावून घेताच एक कट्टर धर्म रक्षक अशी पदवीघेण्याची जशी आपापसात स्पर्धाच चालू असते. व त्यातूनच मुजोर व धाकटशाही वृत्ती तयार होवून बळी तो कान पिळी. असे वर्तन अविचारी लोक करतात येथे असे म्हणण्यास हरकत नसावी असा मनुष्यच केवळ आपल्या धर्म संस्थापकांचा आदर करत नसून तो त्यांची अवहेलनाच करत असतो. व तोच मानवतेचा खरा शत्रू होय.
हे सर्व लिखाणाचा उद्देश खालील एक उदाहरण वाचल्या नंतरच कळून येईल …..
तर वरील ठिकाणी नमूद केलेली आमची शेल्टर आर्केड हौसिंग सोसायटी येथे जास्त प्रमाणात मुस्लीम सभासद आहेत. ओघानेच सोसायटीचे सर्व कारभार प्रामुख्याने त्यांचे हातातच असतात. आणि कधी नसले तरी संख्यात्मक दृष्टीने सर्व नियमहि केवळ त्यांना हवे तसे असावेत असा त्यांचा मोठा आग्रह असतो तसे नं झाल्यास हवी तसी मनमानी करण्याचा जसा काही आमचा अधिकारच आहे. त्यामुळे सोसायटी चे कायदे केवळ इतर अल्प धर्मियानीच पाळावेत. ते आमच्यासाठी असूच शकत नाहीत कारण आम्ही संख्यात्मक दृष्टीने जास्त आहोत हि भावनाच त्यांना तसे करण्यास प्रतिबंध करत असते. आमची सोसायटी २००२ साली स्थापन झाली. परंतु सोसायटीमध्ये सोसायटीचे सभासद केंव्हाच सार्वमताने निवडले जात नाहीत (ओघानेच बहुमतानेच निवड होते परंतु बहुमत त्यांचेच असते) त्यामुळे भारतीय कायद्यानुसार कायदेशीर निवडणूक होत नाही. मागे एकदा तसा प्रयत्न पण झाला पण भारतीय संविधाना प्रमाणे सोसायटीत पात्र उमेदवार अल्प प्रमाणात असल्यामुळे निवडूक रद्द करून सामोपचाराने सभासद नियुक्त (बिनविरोध पद्धतीने) सभासद नियुक्त केले. केवळ औपचारिकता म्हणून. परंतु कधीही सोसायटीच्या सभासदांच्या सभेमध्ये इतर अल्प धर्मियांचे मताचा आदर किंवा विचारही केला जात नाही. जर एखादा मुद्दा इतर सभासदांनी उपस्थित केला तर एक तर त्याला गप्प केले जाते किंवा वेगळ्या प्रकारे त्याला त्यापासून परावृत्त करण्यास भाग पाडले जाते. केवळ एक भाई चारा समजावून तो माघार घेत असतो. याउलट त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना एखाद्या सभासदाचा विरोध असूनही त्यास तत्वतः मान्यता द्यावी लागते कारण त्याचेकडे पर्यायच नसतो. असेच अजूनही एक उदाहरण म्हणजे बकरी ईद, आजपर्यंत सोसायटी मधील अल्प धर्मियांनी अनेक वेळा विनंती किंवा सूचना कारणही येथे अवैध बकरी आणल्या जातात सोसायटीच्या आवारात ईद पूर्वीच आणून बांधल्या जातात. व इद च्या दिवशी मोठ्या प्रमाणात सोसायटीच्या आवारातच उघडपणे कत्ल (हत्याही) केल्या जातात. अर्थात माझ्या माहिती प्रमाणे भारतीय कायद्यामध्ये यावर प्रतिबंध आहे . अनेक वेळा चेअरमन आणि सेक्रेटरी यांना इतर आल्प धर्मियांनी लेखी विनंती ही केलेली आहे. परंतु इतर अल्प धर्मियांना कधीच ऐकून घेतले जात नाही. तर प्रसंगी धमकावून किंवा जोर जबरदस्ती करून अल्प् धर्मियांचा आवाज बंद केला जातो.
यापुढे मला त्यांच्या धर्म गुरुनाच विनंती करावीशी वाटते कि आपण धर्म रक्षक आहात पवित्र धर्माचे आचरण कसे असावे हे जर आपण आपल्या धर्मियांना परत एकदा शिकवावे. ईश्वर व अल्लाह , शरियत किंवा कुराण किंवा गीता व बायबल यांना प्रमाण मानून जर दुस-यास अहित होईल असे वर्तन करणे व मानवता रसातळाला जाणार नाही याचा विचार करून योग्य तो उपदेश करावा…..
— रामदास नामदेव ढोरमले
Leave a Reply