भगवान शिवाची पूजा करणारे शिवभक्त आणि विष्णू अर्थात भगवान श्रीकृष्णांची भक्ती करणारे वैष्णव यांच्यात आपापल्या इष्ट दैवतांच्या श्रेष्ठत्वाबद्दल पूर्वी नेहमी वाद-विवाद होत असल्याचे आपण वाचले असेल. अर्थात हिंदू धर्म प्रसारकांच्या मते हा वाद निरर्थक असून परमेश्वर एकच असून त्याची भक्ती करण्याचे आवाहन आजपर्यंतच्या अनेक किर्तन-प्रवचनकारांनी जनतेला केले आहे. मात्र
शिव श्रेष्ठ की विष्ण? या प्रश्नाचे इस्कॉनने (आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ) दिलेले उत्तर अभ्यासले तर हा वाद किती निरर्थक आहे आणि विष्णू हेच कसे श्रेष्ठ आहेत, हेे लक्षात येईल.भगवान शिव आशुतोष अर्थात त्वरित प्रसन्न होणारे दैवत आहे. तर भगवान विष्णूंची आपल्या भक्तांवर जेव्हा कृपा होते, तेव्हा विष्णूभक्ताला अनेक संकटांची परीक्षा द्यावी लागते. पांडवांच्या साथीला भगवान श्रीकृष्ण होते तरीही त्यांना अनेक संकटे झेलावी लागली. याविषयी धर्मराज युधिष्ठीर महाराजांनी भगवान श्रीकृष्णांना एकदा विचारले की, हे भगवंत, आपण आमच्या सोबतीला असतानाही आम्हाला इतकी संकटे का येता आहेत? त्यावर भगवान श्रीकृष्णांनी उत्तर दिले, प्रिय युद्धिष्ठीर महाराज ही माझी आपल्यावर विशेष कृपा आहे. याविषयी कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम या ग्रंथात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे, की मनुष्य दुःख आणि संकटात असला तर भगवान श्रीकृष्णांची जास्त प्रेमाने आळवणी करतो. सुखात असलेल्या मनुष्याला भगवंतांची सहसा आठवण येत नाही. एकटा प्रामाणिक कृष्णभक्त मात्र यासाठी अपवाद आहे. विष्णूंची भक्ती करणार्या भक्तांना नेहमी संकटे, हाल-अपेष्टा आणि प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जावे लागत असल्याचे आपण नेहमी पहातो. भक्त प्रल्हाद, भक्त पुंडलिक, जगद्गुरु संत तुकोबाराय, संत ज्ञानेश्वर मा ली, मीराबाई आदी अनेक संत आणि भक्तांचा इतिहास न
रेखालून घातल्यास याची जाणीव होते. दुसरीकडे भगवान शिवाचे भक्त खूपच धनवान, श्रीमंत असल्याचे आपण पहातो. याचे कारण भगवान लवकर प्रसन्न होऊन आपल्या भक्ताची मनोकामना पूर्ण करतात. शिवलिंगाची नियमितपणे पूजा करणार्या शिवभक्ताचे लवकर कल्याण होते. तो स्वतःसाठी मोठा बंगला, गाडी, नोकर-चाकर आदींसह संपत्ती जमवून स्वतःचा विकास करतो. मात्र विष्णुभक्तांच्या मतानुसार हा विकास नसून ही फसवी प्रगती आहे. कारण हे सर्व मृत्यूनंतर आपल्याबरोबर नेता येत नाही. विष्णुभक्तांची प्रामाणिक भक्ती त्यांना या सृष्टीचे सर्वोच्च नियंत्रक भगवान श्रीकृष्णांचे निवासस्थान असलेल्या परमधाममध्ये घेऊन जाते, असे भगवद् गीतेत स्वतः भगवान श्रीकृष्ण सत्यप्रतिज्ञेद्वारे सांगतात. पुराणात आपण शिवभक्तांच्या, ज्यांना असुरही म्हटले जाते, अशा भक्तांच्या कथा वाचल्या तर शैव्य आणि वैष्णवामध्ये कोण श्रेष्ठ आहे, हे ध्यानात येईल. वृकासूर नावाच्या एका असुराने भगवान शिवाला प्रसन्न करून त्यांच्याकडून इच्छित वर प्राप्त करून घेण्यासाठी अशीच घोर तपश्चर्या केली होती. अग्नी प्रज्वलित करून त्यामध्ये स्वतःचे मांस सुरीने कापून ते तो अग्नीला अर्पण करीत असे. अनेक घोर तपश्चर्यांपैकी ही एक तपश्चर्या असून अनेक भक्त अशी तपश्चर्या त्यावेळी करायचे. गेली आठ दिवस अशी तपश्चर्या करूनही भगवान शिव प्रसन्न होत नाहीत, हे पाहिल्यानंतर वृकासुराने आपले शिर कापून अग्नीला अर्पण करण्याचा त्याने निर्णय घेतला. हे पाहून भगवान शिवाला त्याची दया आली आणि प्रसन्न होऊन वर मागण्याचे सांगितले. त्यावर वृकासुराने अगदी असुराला शोभेल, असाच वर मागितला. आपण ज्याच्या डोक्यावर हात ठेवू तो तात्काळ मरून जावा, असा वर त्याने मागितला. भगवान शिव शब्दा अडकल्याने त्यांनीही तथास्तु म्हटले. त्यानुसार वृकासूर ज्याच्या डोक्
यावर हात ठेवील तो प्राणी मरत असे. या वराचे सामर्थ्य लक्षात आल्यानंतर वृकासुराने भगवान शिवाची पत्नी पार्वतीलाच प्राप्त करण्याच्या दुष्ट हेतुने भगवान शिवाच्या डोक्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न केला. भितीने थरथर कापत भगवान शिव सैरावैरा पळत सुटले. इतक्यात सृष्टीचे सर्वोच्च नियंत्रक भगवान श्रीकृष्ण एका साधुच्या रुपाता आले आणि वृकासुराला म्हणाले, तुला भगवान शिवांनी दिलेला वर खरा की खोटा हे पहाण्यासाठी इतके कष्ट करण्याची गरज नाही. तु आपल्या डोक्यावर हात ठेवून भगवान शिवाच्या वराची प्रचिती का पहात नाही? हे ऐकून त्याने मागचा पुढचा विचार न करताच स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला आणि क्षर्णाधात त्याची अनंत शकले हाऊन तो मरण पावला. अशा रीतीने वृकासुराच्या तावडीतून भगवान शिवाची सर्वोच्च नियंत्रक भगवान श्रीकृष्णांनी प्रार्थना केली. आता आपणच ठरवा शैव आणि वैष्णवात श्रेष्ठ कोण?
— balasaheb Shete
Leave a Reply