लपून सावली आड पृथ्वीच्या पाहतो चंद्र आमावस्येच्या दिवशी जसा चांदणीकडे
पाहतो तसा मी लपून रात्रीच्या काळोखा आड प्रकाशातील तुझ्याकडे
आहेस तू उत्तर ध्रुव आणि मी दक्षिण ! आपल्या दोघांच्या मध्ये उभी आहे
समाजाने आखलेली भिंत विषुववृत्त नावाची
जी तापलेलीच असते नेहमी तुला शक्य न मला जाने तिच्या पलीकडे
आपल्या स्वप्नातील ग्रीनीज येथील काल्पनिक ठिकाणीच आपल भेटन शक्य आहे
पण ! तेथेही रेखावृत्ते आणि अक्षवृत्ते निरखून पाहत असतील आपल्याकडे
आपला सखा सूर्यच त्याच्या किरणांच्या माध्यमातूनच
तुझा प्रेमाचा संदेश पोहचवू शकतो माझ्याकडे
ज्या प्रेमाच्या अक्षा भोवती आपण दोघे फिरतोय त्यानेच आपल्याला बांधून ठेवलंय
संस्काराच्या नियमांच्या बंधनात आपल्या इच्छे पलीकडे
आपण दोघेही कमालीचे थंड प्रेमाच्या गुलाबी
स्वप्नातच जगणार पाहत एक-मेकांकडे
तुझ्या आणि माझ्या मनाच्या अंतरंगात एक ठिकाण असेल जिथे फक्त प्रकाश किव्हा अंधार
आता आपल्या हातात काहीच नाही त्याचा शोध घेण्यापलीकडे
कवी – निलेश बामणे
Leave a Reply