काय डॉक्टर ह्या विषयावर कोणी लेख लिहितं का? आता हे सुद्धा तुम्ही आम्हला सांगणार का? काही का राव? असे तुम्हला विषय वाचतांना वाटू शकेल परंतु आज हे सांगणे गरजेचे झाले आहे.
शी/मलत्याग करताना बसण्याची स्थिती हि योग्य असणे अत्यंत महत्वाचे आहे. अन्नाचे व्यवस्थित पचन झाल्यावर बनलेला मल हा आतड्यांमधून पुढे पुढे येतो आणि मलाशयात आल्यावर आपल्याला ‘शी’ ची संवेदना होते. शी करताना मलाशय हे रिलॅक्स व त्याचा अँगल योग्य असणे महत्वाचे आहे. ज्याने मालत्याग सहज होतो व हा अँगल जर चुकीचा असेल तर जोर लावून आणि थांबत थांबत मालत्याग होतो आणि बराच वेळ बसावे लागते आणि पूर्ण शौच्चानंद मिळत नाही.
‘शी’ ला अनेकांना बराच वेळ बसून राहावं लागते आजच्या कमोडच्या युगात अत्यंत सुविधा दायक असा कमोड बसायला आरामदायी वाटतो. तासन्तास पेपर वाचत काही बसलेले असतात. हि चुकीची पद्धत आहे. ह्यात शौच्चानंद मिळत नाही. उलट अर्श/पाईल्स, फिशर, इत्यादी विकार होतात.
मग योग्य स्थिती कुठली?
भारतीय पद्धती प्रमाणे उकिडवे/ उक्कड/sqatting स्थिती हि योग्य स्थिती आहे. ह्यात मलाशयातून मल सहज बाहेर येतो आणि शौच्चानंद मिळतो. मन आणि शरीर दोन्ही निरोगी राहतात. आयुर्वेदसुद्धा ह्याच स्थितीचे समर्थन करते.
महत्वाचे- ज्यांना भारतीय पद्धतीत बसूनही जोर लावून शी करावी लागते त्यांना पचना संबधीचे विकार असू शकतात, मालबद्धतेचा त्रास असू शकतो. ज्यांना हा त्रास आहे त्यांना सुद्धा ह्या स्थितीचा फायदा होतो. परंतु जास्त त्रास असल्यास आपल्या वैद्यांचे मार्गदर्शन घ्यावे.
तुम्ही अनेक आनंद ऐकले होते…. शौच्चानंद पहिल्यांदाच ऐकला. आदरणीय वैद्य नाना हा शब्द वापरतात. ते बस्ती चे महत्व सांगताना ते म्हणतात ज्यांना मालबद्धतेचा त्रास आहे त्यांनाच कळू शकेल शौच्चानंद काय असतो.
तर भारतीय पद्धतीतच बसा आणि शौच्चानंद घ्या.
वैद्य.भूषण मनोहर देव.
ज्योती आयुर्वेद,जळगाव 8379820693
(`आरोग्यदूत ७’ या WhatsApp ग्रुपवरुन साभार)
Leave a Reply