भज मना शिवशंकरा अविनाशी ।।धृ।।महादेव तो, तो मृत्युंजय, आदि अन्त ना त्यासी
भस्म विलोपित धवल तनूवर नागसर्प वेष्टिले निरंतरभाळी शोभे शीतल राशी ।।१।।
शुभ्र धवल ते नंदी वाहन, धवलचि हाती त्रिशूल जाणमस्तकी धरी धवल गंगेसी ।।२।।
शार्दूलचर्म वसन ते लेवून, रुंदमाल कंठी करी धारण शोभते गिरीजा वामांगासी ।।३।।
महातपस्वी महान योगी, करुणाकर तो अतिअनुरागीपावतो, शिव भोळ्या भक्तिसी ।।४।।
तैसे घडता स्मरण शिवाचे, पाप ताप ते जळते साचेनेतो खाचेताचि निजपदासी ।।५।।
शिवा सारखे दैवत भजता, हवी कशाला भवभय चिंता अकारण व्यर्थचि कां शंकिसी ? ।।६।।
— किशोर रामचंद्र करवडे
Leave a Reply