नवीन लेखन...

संगीतकार, गीतकार आणि पार्श्वगायक ए आर रहमान

ए आर रहमान हे तामीळ मुदलियार परिवारातील ते आहेत. त्यांचा जन्म ६ जानेवारी १९६७ रोजी चेन्नई येथे झाला. त्यांचे वडील आर. के. शेखर हे तामीळ आणि मल्याळम चित्रपटांचे निर्माते होते. रहमान लहानपणापासून आपल्या वडिलांच्या कामात हातभार लावत असे. रहमान नऊ वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबाची परिस्थितीच बदलली. त्यावेळी आपल्या वडिलांची वाद्ये भाड्याने देऊन त्यांनी अक्षरश: आपल्या कुटुंबाचा गाडा चालवला. त्यांचे खरे नाव ए. एस. दिलीप कुमार असे आहे. त्यांचे आई वडील हिंदू होते. रहमान नऊ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांची आई त्यांच्या वडिलांचे म्युझिकल इन्स्ट्रूमेंट्‌स भाड्याने देत असे. याच काळात एका पीर बाबांच्या संपर्कात रहमान यांचे कुटुंबीय आले. त्यांच्या आई पीरबाबांची सेवा करायच्या. तेही त्यांच्या आईला अगदी मुलीप्रमाणे मानायचे. पीरबाबांचे रहमान यांच्यासोबतही घट्ट नाते जुळले होते. दरम्यान रहमान यांना त्यांचे दिलीप कुमार हे नाव कधीच आवडले नव्हते. हे नाव आपल्या प्रतिमेला शोभेसे नसल्याचे त्यांना वाटायचे. ते आपल्या आई सोबत बहिणीच्या लग्नाच्या निमित्ताने तिची जन्मपत्रिका दाखवायला एका हिंदू ज्योतिषाकडे गेले होते. याचदरम्यान रहमान यांनी त्या ज्योतिषाकडे आपले नाव बदलण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी रहमानला दोन नावे सुचवली. एक अब्दुल रहमान आणि दुसरे अब्दुल रहीम. मात्र रहमान यांनी त्यांच्या आईच्या सल्ल्याने अल्लारक्खाो रहमान म्हणजेच ए. आर. रहमान हे नाव ठेवले.” वडिलांच्या निधनाच्या दहा वर्षांनी रहमान यांनी आपले नाव आणि धर्म बदलला. रहमान हे त्यांना एका हिंदू ज्योतिषाने दिलेले नाव आहे तर अल्लारखा हे त्यांच्या आईने त्यांना दिलेले नाव आहे. रहमान यांच्या पत्नीचे नाव सायरा बानो असून या दाम्पत्याला दोन मुली आणि एक मुलगा आहे. खतीजा आणि रहीमा ही त्यांच्या मुलींची तर अमीन हे मुलाचे नाव आहे.

आधी तमिळ, मग हिंदी असं करता करता रहमानने केव्हाच हॉलिवूडसुद्धा पादाक्रांत केलेय. त्याचे इराणी आणि मँडरिन साऊंडट्रॅक्ससुद्धा तितकेच लोकप्रिय आहेत. असं म्हणतात, रहमानचं कोणतंही गाणं किमान ४ वेळा तरी ऐकलंच पाहिजे, तरच मगच कुठे ते गाणं समजू लागतं. आणि मगच ते गाणं आवडूसुद्धा लागतं. ए आर रहमान पुन्हा एकदा मानाच्या ऑस्कर पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट झाला आहे. ‘पेले: बर्थ ऑफ लिजंड’ या चित्रपटाच्या संगीतासाठी ए आर रहमान 89 व्या ऑस्कर पुरस्कारांच्या शर्यतीत आहे.यापूर्वी ए आर रहमानला स्लमडॉग मिलिनेअरमधील ‘जय हो’ गाण्यासाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर रहमान पुन्हा एकदा रहमान ऑस्करवर नाव कोरतो का, हे लवकरच स्पष्ट होईल. बेस्ट ओरिजनला स्कोअर आणि बेस्ट ओरिजनल सॉन्ग अशा दोन गटात रहमानला शॉर्टलिस्ट करण्यात आलं आहे. ‘पेले: बर्थ ऑफ लिजंड’ या चित्रपटाचं संगीत आणि त्यातील जिंगा हे गाणं ऑस्करच्या शर्यतीत असेल. ब्राझिलियन सिंगर अॅना बिट्रीझने हे गाणं स्वरबद्ध केलं आहे.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..