नवीन लेखन...

सचिनच्या आयुष्यातल्या ‘जरा हटके’ गोष्टी



सचिनचं नाव प्रसिद्ध संगीतकार सचिन देव बर्मन यांच्या नावावरून ठेवण्यात आलेलं आहे.- सचिन जेव्हा पाकिस्तानच्या दौऱ्यावर पहिल्यांदा गेला होता (१९८९) तेव्हा त्याचा मोठा भाऊ अजित तेंडुलकर त्याच्यासोबत गेले होते. या टूरवर असताना सचिनने स्वतच्या हाताने ऑम्लेट बनवलं होतं.- सचिनचं पहिल्यांदा फास्ट बॉलर बनायचं स्वप्न होतं यासाठी त्याने एमआरएफ पेस अ‍ॅकडमी, चेन्नई येथे जाऊन डेनिस लिली यांच्याकडून ट्रेनिंगही घेतलं होतं.- १९९० यशस्वी दौऱ्यानंतर त्याने तो राहात असलेल्या साहित्य सहवास सोसायटीमधील लोकांना बांद्रा इंटरनॅशनल हॉटेलमध्ये जेवणाची पार्टी दिली होती.- पहिली इंग्रजी विलोची बॅट दिलीप वेंगसरकर यांनी त्याला दिली होती. – सचिनने रणजी, इराणी आणि दिलीप ट्रॉफीतील पहिल्याच सामन्यात शतक झळकावलं होतं.- थर्ड अंपायर आऊट दिला गेलेला सचिन पहिला बॅट्समन आहे.- सचिन अंजलीला १९९० मध्ये भेटला. एका मुलाखतीत त्यांने सांगितलं होतं की, मला ती आवडली कारण तिला लाजता येत होतं.- १७ व्या वर्षी सचिनने पहिल्यांदा कार खरेदी केली. निळ्या रंगाची मारूती ८०० घेऊन आपल्या मित्रांना बांद्रा स्टेशनला सोडायला तो गेला होता तेव्हा आपल्याकडून दंड आकारला जाणार अशी भीती त्याच्या मनात होती.- भारत आणि न्यूझीलंडमध्ये १९८९-९० मध्ये झालेल्या नेपियर टेस्टमध्ये तो ८८ रन्सवर असताना जॉन राईट यांनी त्याचा झेल पकडला आणि सर्वात कमी वयात कसोटी शतक झळकावण्याचा विक्रम चुकला.- १९९० च्या इंग्लंड दौऱ्यात त्याला मनोज प्रभारकने पोहायला शिकवलं होतं तेही अवघ्या अध्र्या तासात- घरी आलेल्या पाहुण्यांसाठी सचिन कधी कधी स्वत: चहा बनवितो.- सचिनला वांग्याचे भरीत बनविता येते.- त्याला आईच्या हातचं जेवण खूप आवडतं त्यातल्या त्यात मच्छी म्हणजे काही विचारायलाच नको.- त्याला घडय़ाळं प
रचंड आवडतात, त्याच्याकडे अनेक देशी विदेशी

कंपन्यांची घडय़ाळं आहेत.- मुंबईसाठी खेळायला सुरूवात केल्यानंतर त्याचा लोकल ट्रेनचा प्रवास थांबला.- वरळीच्या सत्यम सिनेमागृहात

लागलेला ‘रोजा’ हा सिनेमा पहाण्यासाठी त्याने वेशांतर केले होते.- टेस्ट मॅचच्या पहिल्या अवघड अनुभवानंतर टेस्ट क्रिकेट आपण खेळू शकणार नाही असं वाटलं होतं- मार्शल, रॉबर्ट्स, होल्डिंग आणि गार्नर या वेस्ट इंडिजच्या महान बॉलर्सचा सामना करण्याची संधी न मिळाल्याची खंत त्याला नेहमीच जाणवते.- सचिनने त्याच्या आयुष्यातली पहिली एका वर्तमानपत्राला दिलेली मुलाखत एका इराण्याच्या हॉटेलात दिली होती.- एकदा पत्रकारांच्या फोन कॉल्सला कंटाळून तो सोसायटीतील आपल्या एका मित्राकडे गेला आणि तिथे त्याने चित्रपट पाहत अनेक दिवस एकांतात घालवले होते.- जाने भी दो यारो हा त्याचा सर्वात आवडता चित्रपट आहे.- अमिताभने सचिनला ‘देश की धडकन’ म्हटलं होतं- फैसलाबाद टेस्ट इम्रान खानच्या एका इनस्विंगरवर तो आऊट झाला होता. तेव्हा त्याने ‘फुटभर आत आला’ असे उद्गार काढले होते.- सचिन हा एक खवैय्या आहे. सलील अंकोलासोबत तो नेहमी खाण्याची शर्यत लावायचा आणि जिंकायचाही.- सचिनला टेबल टेनिस चांगलं खेळता येतं. तो दोन्ही हातांनी खेळू शकतो. टूरवर जाताना त्याच्या बॅगमध्ये रॅकेट असतेच.- त्याच्या किटबॅगमध्ये त्याची मुलगी सारा आणि मुलगा अर्जुन यांनी बनविलेलं एक कार्ड असतं ज्यावर ऑल द बेस्ट पापा’ असं लिहिलेलं आहे.-सचिन आजही आई रजनी तेंडुलकर यांचे आशीर्वाद घेतल्याशिवाय घराबाहेर पडत नाही.- सचिन मुंबईत असताना त्याला वडापाव खायला आवडतं.

— नेटसोअर्स

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..