फार वर्षापूर्वी इराकमध्ये घडलेली ही घटना आहे. बगदादजवळील एका छोट्या गावी एकमहिला व तिचा लहान मुलगा राहत होते. ती महिला मोलमजुरी करून आपल्या मुलाचे संगोपन करीत होती. आपल्या मुलाने शिकून मोठे व्हावे हीच तिची प्रामाणिक इच्छा होती. परंतु त्या छोट्या गावात तो मुलगा किती शिकणार? म्हणून तिने त्याला बगदादला शिक्षणासाठी पाठविण्याचे ठरविले.खरे तर त्या मुलाला आईला एकटे सोडून जाण्याची इच्छा नव्हती. मात्र आईच्या इच्छेला मान देऊन तो बगदादला एका सौदागराच्या काफिल्याबरोबर निघाला. जाताना त्याच्या आईने त्याला अडीअडचणीला लागेल म्हणून एक दिनार दिला होता. तसेच कोणतेही संकट आले तरी घाबरू नकोस व खोटे बोल नकोस, असा उपदेशही केला होता. त्या सौदागराचा काफिला जात असताना वाटेत लुटारूंनी त्या काफिल्यावर हल्ला केला. जवळचे असेल ते सर्व द्या नाहीतर प्राणाला मुकाल असे त्या लुटारूंच्या टोळी प्रमुखाने सर्वांना सांगितले व सर्वांची लूट घेत तो लुटारुंचा सरदार त्या मुलाजवळ आला. त्याने त्या मुलाला तुझ्याजवळ काय आहे असे विचारले. त्यावर त्या मुलाने आपल्या फाटक्या सदराच्या खिशातून एक दिनार काढला व त्याला दिला. तो सरदार त्याकडे तुच्छतेने पाहत म्हणाला, ‘ एकच दिनार?’ तो मुलगा त्याला म्हणाला, ‘ माझ्याजवळ एवढा एकच दिनार होता. आणि तो मी तुला दिला आहे. ‘ त्या मुलाच्या निर्भयतेचे त्या सरदाराला कौतुक वाटले. त्याने त्याला विचारले, की तू कोठे जात आहेस? मुलगा म्हणाला, बगदादला मी शिक्षणासाठी जात आहे. त्यावर सरदार त्याला म्हणाला, ‘ तू आमच्याबरोबर चल. मी तुझे सारे शिक्षण करीन. ‘ त्या मुलाने लगेच, ‘मला तुमचे – शिक्षण नको कारण मला चोर-लुटारू व्हायचे नाही, ‘ असे निर्भयतेने सांगितले. त्या मुलाची ती सत्य व निर्भय वाणी पाहून तो लुटारूचा सरदार ओशाळला व त्याचक्षणी त्याने लुटलेली सर्व संपत्ती ज्याची त्याला परत करून तो तेधून निघून गेला. हाच मुलगा म्हणजे मौलाना कादिर खिलानी जो पुढे इराकचा धर्मगुरु बनला.
Be the first to comment
महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची
गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य
राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत
अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...
अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर
अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
Leave a Reply