नवीन लेखन...

सध्याचा लाल महाल ही मूळ वास्तु नाही.

ब्रिगेडी लेखक कोकाटे म्हणाला,“लाल महाल पुरात्त्वखात्याकडे असला पाहीजे. तो पालीकेच्या अधिकारात का ?”

ब्रिगेडी कोळसे-पाटील म्हणाला, “२००२ मध्ये लाल महालात दादोजी कोंडदेवचा पुतळा बसवला आणि २००४ मध्ये जेम्स लेनने वादग्रस्त पुस्तक लिहीले. या दोन्ही ठरवून केलेल्या गोष्टी आहेत.”

लाल महालाची थोडक्यात माहिती – या वाडयाची

जागा झांब्रे पाटीलकडून विकत घेतली होती आणि त्यावर लाल महाल हा वाडा बांधण्यात आला होता. त्याचा पाया ५२ ½’ x ८२ ½’ या व्यासाचा होता आणि उंची ३० ½’ होती. त्यास १३ ½’ खोलीची तळघरे होती. १६४६-४७ मध्ये शिवाजी महाराजांनी त्यांची राजधानी राजगडला हलवली आणि लालमहालाचा उपयोग प्रशासकीय कामासाठी होऊ लागला. इ.स.१६८९ ते इ.स.१७०७ या धामधूमीच्या काळात लाल महालाची अगदी दुर्दशा झाली. मोडकळीस आलेल्या लाल महालाची १७३४-३५ मध्ये डागडूजी करून थोरल्या बाजीरावांनी तो राणोजी शिंदेंना आणि रामचंद्रपंतांना रहायला दिला. राणोजी शिंदे गेल्यानंतर लाल महालाचा उपयोग गोदाम म्हणुन झाला. त्याला लोकांनी अंबरखाना या नावाने पुकारण्यास सुरुवात केली होती. इ.स.१८१८ मध्ये इंग्रजांनी तो पुर्ण उध्वस्त करून त्याची लाकडं व दगडी ` ३१५ ला विकली. या लाल महालाच्या प्रांगणात एक विहीर होती. दोन करंजे होते. इ.स.१९२५ मध्ये जिजामाता उद्यान बांधण्यात आले. आज जिथे हे जिजामाता उद्यान आहे तिथेच हा वाडा होता. दुर्दैवाने तो कसा दिसत होतो, त्याची रचना कशी होती या बाबत कुणालाच माहिती नाही. १९५० मध्ये पुणे महानगरपालीकेने पुण्याचा सांस्कृतीक वारसा जपण्याचे ठरविले. त्यापैकी पुन्हा लाल महालाच्या प्रतीकृतीची उभारणी हा उपक्रम १९८४ मध्ये हाती घेतला. ही वास्तु इ.स.१९८८ बांधून पुर्ण तयार झाली. सोन्याच्या नांगरच्या प्रकरणामुळे लाल महालला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले होते. म्हणुन त्या प्रसंगाला धरून बाळशिवबाची ब्राँझची प्रतिमा तयार केली. त्याच बरोबर नजर

ठेवून देखरेख करणार्‍या राजमाता जिजाबाईसाहेब तसेच प्रशासकीय आणि शिवबाच्या प्रशिक्षणाची बाजू संभाळणारे दादोजी कोंडदेव लाल महालाशी निगडीत असल्या कारणाने त्यांचेही पुतळे उभारले. २००४ मध्ये दादोजींचा प
तळा उभारला गेला हा कोळसे-पाटलाचा कपोलकल्पीत आरोप बिनबूडाचा आहे. हा मूळ लाल महाल नसल्याने पुरातत्त्वखात्याचा या वर काहीच अधिकार नाही. ती पालीकेची मालमत्ता आहे. स्वत:ला इतिहास लेखक म्हणुन प्रसिद्धी मिळवू पाहणार्‍या कोकाटयाला एवढेसुद्धा माहीत नाही ?

— राजेश खिलारी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..