समलिंगी संबंध ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावनी करताना नुकताच दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निणर्याच्या विरोधात आणि समर्थनातही बरेच लोक समोर आले आहेत. पण याबाबतीत कोणाच्याही विचारात एक वाक्यता आणि स्पष्टता दिसली नाही. समलिंगी संबंधाना नैसर्गिक ठरविण्याचा अट्टहास आपल्या देशात का केला जातोय तेच कळत नाही. परदेशातून हे समलिंगी संबंधाच वार भारतात वाह्त आलं आणि आपल्या देशातीलच काही लोकांनी त्याला ह्वा देण्याच काम केल. भारतातील काही प्राचिन शिला चित्रे या अश्या संबंधांच समर्थन करतात अस ही मत काही लोक व्यक्त करताना दिसतात. पण ती शिला चित्रे अशा संबंधाच्या समर्थनातच तयार केली गेली होती असा अर्थ होत नाही . मानवअधिकाराच्या नावाखाली अशा चुकीच्या नाही म्ह्टल तरी समाज स्वाथ्यावर दुरगामी वाईट परीणाम करणार्या गोष्टींच समर्थन नाही ना करता येणार . आपल्या देशातील बहुसंख्य तरूणांचा या अशा गोष्टींना पाटींबाच आहे अस काही मंडळी गृहीतच धरूनच चाललेल्या दिसतात. प्रेमाचा आणि समलिंगी संबंधाचा काय संबंध आहे ते लक्षातच येत नाही. प्रेमाचा आणि शरीर संबंधाचा काही संबंध नाही. विवाहाचा आणि शरीर संबंधांचा संबंध आहे म्ह्णून समलिंगी विवाहाला कायद्याने मान्यता ह्वी.
समलिंगी विवाहाला मान्यता देण म्ह्णजे अनैसर्गिक शरीर संबंधांना मान्यता देण्यासारख आहे. अशा अनैसर्गिक असणार्या बर्याच गोष्टी परदेशात होत असतात. पण परदेशात असणारी विभक्त कुटुबपद्धती आणि लयाला गेलेले नातेसंबंध त्यास कारणीभूत आहेत. आपल्या देशातील निम्मी जनता आजही धर्म संस्कृती आणि संस्कार यांना बिलगलेली आहे त्यामुळे काही लोकांनी केलेल एखाद्या गोष्टीच समर्थन म्ह्णजे देशातील करोडो लोकांच समर्थन असा अर्थ काढता येत नाही. असा अर्थ सोयिस्कपणे काढला जातो म्ह्णूनच आपल्या देशात न्यायालयाने केलेल्या कायद्यांची आंमलबजावनी प्रभावीपणे होताना दिसत नाही. आपल्या देशात आपल्या सोयीप्रमाणे समलिंगी आणि विषमलिंगी अशा दोन्ही प्रकारचे शरीर संबंध ठेवणार्यांचीही कमी नाही. ही अशी लोक समाजातील काही स्त्री-पुरूषांना भरीस घालून हे असे संबंध प्रस्थापित करण्यास कृत्रिम रित्या अथवा काही लाज देऊनही तयार करत असल्याची शक्यताही नाकारता येत नाही. विषमलिंगी जोडीदार काही कारणाने उपलब्ध न झाल्यामुळेही काही लोक समलिंगी संबंधाचा मार्ग स्विकारत असल्याची शक्यताही नाकारता येत नाही. या अशा संबंधामुळे मैत्री ही संकल्पनाही धोक्यात आलेय .एकत्र राह्णार्या दोन समलिंगी व्यक्तींमध्ये तसे संबंध असावेत असा समज ही ह्ल्ली बर्याचदा करून घेतला जातो. अविवाहीत स्त्री-पुरूषही त्याला अपवाद नाहीत. यापूर्वीच या अशा संबंधाना मान्यता देताना त्याचा गार्भियाने विचार व्हायला ह्वा होता. आता भविष्यात जर अशा संबंधाना मान्यता द्यायचीच झाली तर काही आवश्यक तपासण्यातूनच पार गेल्यावच द्यायला हवी त्यातच समाजाच आणि पर्यायाने देशाचही हित आहे.
— निलेश बामणे
Leave a Reply