नवीन लेखन...

समाजाचं मन बदलायला हवं !

तुझ्या मागच्या भावाच किंवा बहिणीच लग्न झालं त्यांना पोरही झाली आता तू लग्न कधी म्हातारं झाल्यावर करणार की करणारच नाहीस ? अश्या टोमण्याचा मारा कित्येक अविवाहीत तरूण तरूणींना हल्ली विनाकारण सहन करावा लागतोय !

हल्ली समाजात प्रेमप्रकरणांच प्रमाण वाढलय त्यामुळे एखाद्यांच्या लहान भावा – बहिणींची लग्ने अगोदर होणे ही काही आश्चर्याची बाब राहिलेली नाही. लग्न झाल की पोर ती होणारच त्यात लग्न झालेल्या मोठ्या भावंडांचा काय दोष ? तरीही समाज अशा मोठ्या भावंडांकडे संशय भरल्या नजरेने पाहत असतो त्यात कहर म्हणजे त्यातील काहींना असही वाटत असत की हिच्या किंवा त्याच्या भावंडानी त्यांच्या अगोदर लग्न केली म्हणून ते लग्न करीत नाहीत. त्यांच्या आई – वडिलांना तर समाज सतत त्यांच्या विनाकारण विचारून भांबावून सोडत असतो. मग अशा अविवाहीत तरूण तरूणींच्या आई- वडिलांकडून त्यांच्यावर अवास्तव दबावतंत्र सूरू होत अशा अविवाहीत तरूण तरूणींना लग्नाच्या बाबतीत तडजोड करण्याचे सल्ले दिले जातात. आपल्या आवडी निवडींना मुरड घालण्याचे सल्ले दिले जातात. लवकरात लवकर लग्नाला तयार होण्यासाठी मानसिक दबाव वाढवला जातो. हे अस केल्यामुळे एखाद्याच मानसिक संतूलन ढासलूही शकत याचा साधा विचारही केला जात नाही. लग्नापेक्षाही काहींच्या आयुष्यात इतर गोष्टी ही महत्वाच्या असू शकतात हे भारतीय समाज आजही मानायलाच तयार नाही. रोजही खटखट दूर व्हावी म्हणून काही लोक तडजोड करतातही पण ! ती तडजोड नकळत दोन जिवांच आयुष्य बरबाद करते हे समाज मनाच्या कधीच लक्षात येत नाही.

काही तरूण तरूणींना त्यांच्या आवडीच्या कार्यक्षेत्रात काही तरी भरीव कार्य करायच असत. विवाह ही त्यांना त्या कामी अडचन वाटत असते किंवा वाटू शकते. त्यामुळे जर ते विवाह करीत नसतील तर ते समाज हिताचच आहे. हे समाज मनाच्या कधी लक्षात येणार ? प्रत्येक स्त्री – पुरूषाने विवाह केलाच पाहिजे अस कोणताही धर्म सांगत नाही. विवाह ही ज्यांची गरजच नसेल अशा स्त्री – पुरूषांनी विवाह केला नाही तर त्यामुळे समाजाचं काय नुकसान होत ते कळ्त नाही उलट स्वतःच्या वयक्तीक हितापेक्षा समाज आणि देश हिताला प्राधान्य देत कोणी अविवाहीत राहून समाज आणि देशहितासाठी समाजातच राहून काही विधेयक कार्य करण्यास प्रयत्नशील असेल तर समाजाने त्याचं स्वागतच करायला हवं नाही का ? पण ! दुदैवाने तस होताना दिसत नाही. विवाह करूनही लोक आयुष्यात यशस्वी होतात पण ! कोण ज्यांच्या जोडिदाराची निवड चुकलेली नसते ते ! प्रेम विवाह करणार्यांनीही आपल्यासाठी योग्य जोडीदार निवडलेला असतो अस म्हणायलाही वाव नाही. त्यामुळे उच्चतम ध्येय साध्य करण्यासाठी एखाद्या तरूण तरूणींने निदान ते ध्येय साध्य होईपर्यत तरी अविवाहीत राहण्याचा निर्णय घेतला तर त्याला विरोध न होता त्या निर्णयाच समर्थनच व्हायला हवं !

मुंबईसारख्या शहरातही काही भागात आजकाल एकट्या अविवाहीत स्त्री – पुरूषांना भाड्याने घरं दिली जात नाहीत हा त्यांच्यावर अन्याय नाही का ? एकीकडे समाज समलिंगी विवाहांना मान्यता देतो. पण ! दुसरीकडे स्त्री – पुरूषांना एकट राहण्याचा अधिकार मात्र नाकारतो. एकलेपणामुळे माणूस मनोरूग्न होऊ शकतो पण ! कधी जर तो एकलेपणा त्यांच्यावर लादला गेलेला असेल तर ! अध्ययनासाठी एकांतवास महत्वाचा मानला जातो. समाजमनाला आज स्त्री – पुरूष यांचा एकत्रीतपणे विचार करायचा सोडून देत त्यांच्या स्वतंत्रपणे विचार करायला सुरूवात करायला हवी. तरच आपल्या देशात स्त्री- पुरूष समानता कर्या अर्थाने अस्तित्वात येईल .एकमेकात कोणतही नात किंवा सबंधही नसताना स्त्री-पुरूष एकत्र राहू शकतील असा दिवस आपल्या देशात जेंवा येईल तेंव्हा येईल तूर्त अविवाहीत तरूण – तरूणींना त्यांच्या मनाविरूद्ध त्यांची मानसिक तयारी नसताना लग्नासाठी भरीस घालण्याच. जोडिदाराच्या बाबतीत त्यांना तडजोड करायला भाग पाडण आणि ध्येला लग्नासमोर तुच्छ मानण्याचा सल्ला देण जरी समाज मनान थांबवल तरी नसे थोडकं असंच म्हणावे लागेल……आणि ध्येयासाठी विवाहापासून दूर पळणार्या असंख्य तरूण- तरूणींवर त्याचे अनंत उपकारच होतील असं म्हणायला कहीच हरकत नाही , नाही का ?

— निलेश बामणे

Avatar
About निलेश बामणे 421 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..