नवीन लेखन...

समाधानाचे मूळ

१९९६ साली मी जव्हार गांवच्या सरकारी रुग्णालयात प्रमुख वैद्यकीय अधिकारी होतो.

हाताखाली बराच कर्मचारी व अधिकारी वर्ग होता. एक तरुण वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राठोड यांची नेमणूक नुकतीच झालेली होती. ते M. B. B. S. शिकलेले होते. पुढे सर्जरी हा विषय घेऊन सर्जन होण्याची मह्त्वाकांक्षा बाळगून होते. आपल्या मनमिळाऊ, प्रेमळ स्वभावाने रुग्णामध्ये थोड्याच काळात ते सर्वाना हवे हवेसे वाटू लागले. वैद्यकीय कामकाजामध्ये अतिशय मेहनती, उत्साही, सतर्क आणि निष्णात होते. सर्व प्रकारच्या केसेस आत्मविश्वासाने व यशस्वी रीत्या ते हाताळत. हे सारे माझ्या लक्षत आले होते. भविष्यात ते चांगले सर्जन होतील हा विश्वास मला आलेला होता. एक दिवस संध्याकाळी ते माझ्या घरी आले. त्यांनी M. S. ह्या पदव्युतर शीक्षणासाठी अर्ज केलेला होता. तो Bombay हॉस्पिटलच्या प्रशासनाने मान्य केला असून, २४ तासाचे आंत त्यांना रुजू होण्याची सूचना आली होती. मी त्यांना सध्याच्या रुग्णालयातून पदमुक्त ( Releave ) केले असे पत्र मिळणे हे त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचे होते. त्यांच्या पुढील नेमणुकीसाठी ते गरजेचे होते.

प्रसंग आणि वेळेचे महत्व ओळखून मी त्यांची फाइल मागविली. मी एका धर्म संकटात सापडलो होतो. वरिष्ठांकडून आलेल्या त्यांच्या appointment letter वरून त्यांनी सध्याच्या नोकरीचा बॉण्ड दिलेला होता. ते फक्त तीन महिन्याच्या नोटीशीनंतरच ही नोकरी सोडून जाऊ शकत होते. माझ्या कार्यालइन सल्लागारांनी आपण डॉक्टरना वरिष्ठांच्या परवानगी शिवाय रिलीव्ह करू शकत नसल्याचे सुचविले. याचा अर्थ त्याचे पोस्ट ग्राजुयेषण केवळ वेळेच्या चक्रामुळे गमावले जाणार. मी हे सारे जाणून अशांत झालो. एका अत्यंत महत्वाच्या संधीला ते वंचित होतील ह्याची खंत वाटली. मी बराच विचार केला. मनन केले. शेवटी विचारावर भावनेने मत केली. मी त्याची रुग्णालय सोडण्याविषयची विनंती मान्य केली. माझे आभार मानीत ते निघून गेले. शंके प्रमाणे एक तुफान निर्माण झाले. वरिष्ठ नाराज झाले. चौकशी झाली. मला माझ्या घेतलेल्या निर्णयावर टिपणी होऊन मेमो दिला गेला. पुन्हा असे घडू नये याची समज दिली गेली.
बऱ्याच वर्षानंतर एक मित्राला भेटण्यासाठी Bombay हॉस्पिटलला गेलो होतो. अचानक डॉक्टर राठोड यांची भेट झाली. त्यांनी आग्रहाने मला त्यांच्या केबिन मध्ये नेले. मला आश्चर्य वाटले ते त्यांनी वाकून माझ्या पायांना स्पर्श करून नमस्कार केला.
” सर मी येथे Assistant Hon. Surgeon म्हणून काम बघतो. हे फक्त तुमच्या आशीर्वादामुळे. “ त्याचे डोळे पाणावले होते.
घटना ह्या घडतच असतात. ते एक निसर्ग चक्र आहे. परिणाम हे त्याच प्रमाणे होत असतात. परंतु खोलवर दडून बसलेल्या उदेशामुळेच त्या घटनांचे खरे मूल्यमापन होत असते. वरकरणी जरी निराश्या व्यतीत होत असली, तरी त्या घटनांची मुळे आत्मिक समाधानाकडे रुजलेली असतात. हाच खरा जीवनाचा आनंद नव्हे काय?
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..