चला झाली एकदाची महागाई, अहो कसली ?
काय विचारताय ? अहो आपल्या घरगुती गॅसची. १ रुपया वाढवून आता राज्यसरकार ०.०५ पैसे कमी करणार खरोखर आपल्यावर उपकारच नाही का ? पण असो.
आज मला काही सांगायचे आहे. कोणीच ऐकत नाही म्हणा
पण मराठीसृष्टीने दिलेली संधी का सोडावी म्हणतो मी.
तर ज्यावेळी कुठलेही भाव सरकार वाढवते त्याची अंमलबजावणी ताबडतोब होते. म्हणजे हेच आपले सरकार भ्रष्टाचार करायला मदतच करते. आता कसे
१) आज माझ्याकडे समजा १०० सिलेंडर आहेत ते मी जुन्या किमतीने खरेदी केलेले आहेत आणि अचानक सरकारने भाव वाढविल्यामुळे मी हेच सिलेंडर जास्त दराने विकतो. माझी जबाबदारी आहे कि मी हेच सिलेंडर जुन्या भावात विकले पाहिजे पण तसे होत नाही कारण मीच तुम्हाला अक्कल शिकवितो आजचा पेपर वाचलात का ? अशी उद्धत भाषा आपल्याशी बोलतो.
२) मी शक्यतो ८ दिवस आधीच माझ्याकडे माल नाही असा बोबाटा करतो, आणि मला माहित आहेच आपली सामान्य जनता काहीच बोलणार नाही म्हणून|,
आणि भाव वाढले कि मग काय मी मालामाल.
आपण स्वतः अनुभव घ्या (पेट्रोल पंप – आदल्यादिवशीच पेट्रोल कसे संपते आजपर्यंत याचे कोडे काही उलगडलेले नाही)
मग खरोखर काय करायला पाहिजे जेणेकरून याला आला बसेल.
ज्यावेळी सरकारला भाव वाढवायचे आहेत त्याची अंमलबजावणी जर १५-२० दिवसांनी केली तर नक्कीच याला बऱ्याच प्रमाणात आला बसेल.
— अनाम
Leave a Reply